स्तोत्रसंहिता
लेखक
स्तोत्र व गीतांच्या कवितांचा संग्रह हा जुन्या करारातील पुस्तकांपैकी एक आहे, ज्याला स्वतःला एक समग्र लेखन म्हणून संबोधले जाते ज्यात एकापेक्षा जास्त लेखक असतात, हे बहुविध लेखकांद्वारे लिहिलेले आहे; दाविदाने 73 स्तोत्रसंहिता लिहिल्या, आसाफने 12, कोरहाचे मुलगे यांनी 9, शलमोनाने 3 लिहल्या, एथान आणि मोशेने प्रत्येकी एक लिहिली (स्तोत्र. 90), आणि 51 स्तोत्रसंहिता ह्या अज्ञात आहेत. शलमोन आणि मोशेचा अपवाद वगळता, हे सर्व अतिरिक्त लेखक हे याजक व लेवी होते जे दाविदाच्या कारकिर्दीत अरण्यात आराधनेकरिता संगीत सादर करण्यासाठी जबाबदार होते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1440 - 430.
वैयक्तिक स्तोत्रे मोशेच्या काळातील दावीदाचा काळ, आसाफ आणि शलमोन यांच्याद्वारे इतिहासात लिहून ठेवण्यात आली होती, बाबेलच्या बंदिवासानंतर बहुतेक लोक राहत असलेल्या इझ्रातेच्या काळात, याचा अर्थ पुस्तक लिहिणे एक हजार वर्षे चालले.
प्राप्तकर्ता
इस्त्राएलाचे राष्ट्र, देवाने त्यांच्यासाठी काय केले होते आणि इतिहासात विश्वास ठेवणाऱ्यांची आठवण करून दिली आहे.
हेतू
स्तोत्रे देव आणि त्याची निर्मिती, युद्ध, आराधना, शहाणपण, पाप व दुष्टता, न्याय, निःपक्षपातीपणा आणि मसीहाच्या येण्यासंबंधीच्या विषयांशी संबंधित आहेत. त्याच्या अनेक पृष्ठांदरम्यान, स्तोत्रांनी आपल्या वाचकांना परमेश्वर कोण आहे आणि त्याने काय केले आहे त्याबद्दल प्रशंसा करण्यास प्रोत्साहन दिले. स्तोत्र आपल्या परमेश्वराची महानता ठळकपणे नमूद करते, संकटाच्या वेळी आमच्याशी त्याची निष्ठा दाखविल्याबद्दल आणि आपल्याला त्याच्या वचनातील पूर्ण केंद्रीयत्वाची आठवण करून देतात.
विषय
स्तुती
रूपरेषा
1. मसीहाचे स्तोत्र — 1:1-41:13
2. इच्छेचे स्तोत्र — 42:1-72:20
3. इस्त्राएलचे स्तोत्र — 73:1-89:52
4. देवाच्या नियमाचे स्तोत्र — 90:1-106:48
5. स्तुतीचे स्तोत्र — 107:1-150:6
1
नीतिमान व अनीतिमान
प्रेषि. 4:23-31
आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या,
ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.
परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो.
परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.