11
पौल अनी खोटा प्रेषित
1 मना थोडासा येडापणा तुम्हीन सहन कराले पाहिजे; अनी ते तुम्हीन करीच राहिनात. 2 माले ईश्वरी आस्थाप्रमाणे तुमनाबद्दल आस्था वाटस; कारण मी एक माणुससंगे म्हणजे ख्रिस्तसंगे तुमनी योजना करेल शे, यानाकरता की तुमले शुध्द कुवारी अस ख्रिस्तले सादर करीसन देवानं. 3 पण माले भिती शे की, जसं सापनी कपटतीन हवाले फसाडं तसच तुमनं मन ख्रिस्तनी भक्तीना सरळपणा अनं शुध्दपणा यासना पाईन भटकाले नको, 4 कारण कोणी ईसन दुसऱ्या येशुना प्रचार करतस ज्याना प्रचार आम्हीन करा नही, किंवा तुमले दुसरा आत्मा मिळना, जो पहिले नही भेटेल व्हता, किंवा अशी दुसरी सुवार्ता तुम्हीन स्विकारी जी तुम्हीन पहिले नही स्विकारी, म्हणजे तुम्हीन कितला सरळपणतीन त्यान्या गोष्टी मानी लेतस.
5 मी स्वतःले महाप्रेषितस पेक्षा कोणताच प्रकारमा कमी समजस नही, 6 जरी बोलामा मी अनपड शे, पण ज्ञानमा तसा नही; हाई आम्हीन तुमनाबद्दल सर्व लोकसमा अनं सर्व प्रकारे प्रकट करेल शे.
7 तुम्हीन उंच व्हवाले पाहिजे म्हणीन स्वतःले नम्र करीसन देवनी सुवार्ता सांगी, मी हाई पाप करं का? 8 मी तुमनी सेवा कराले पाहिजे म्हणीन दुसऱ्या मंडळीसपाईन पगार लिसन त्यासले लुबाडं; 9 ✡११:९ फिलप्पै ४:१५-१८जवय मी तुमनासंगे व्हतु तवय माले कमी पडणं तरी बी कोणवरच भार नही टाका; कारण मासेदोनियामातीन येल भाऊसनी मनी गरज पुर्ण करी; अनी कोणताच प्रकारमा मना तुमनावर भार पडाले नको म्हणीन मी सांभाळं अनी सांभाळसु. 10 ख्रिस्तनं सत्य मनामा शे, यावरतीन सांगस की मना या अभिमानले अखया प्रांतमा प्रतिबंध व्हणार नही. 11 का बर? यामुये की, मी तुमनावर प्रेम नही करस, म्हणीसन का? देवले तर माहित शे मी करस.
12 जे मी करस ते करतस ऱ्हासु; यानाकरता की ज्यानामा आम्हीन गर्व करतस त्यानामा गर्व करानी संधी ज्यासले महाप्रेषीत म्हणतस त्यासले मी भेटू देवावु नही. 13 असा लोके खोटा प्रेषित, कपटी, कामदार, ख्रिस्तना प्रेषितसना रूप धारण करनारा असा शेतस. 14 यानामा आश्चर्य वाटासारखं काही नही शे, सैतानबी स्वतः तेजस्वी देवदूतनं रूप धारण करस. 15 यामुये त्याना सेवकसनी बी धार्मीकताना सेवकसनं रूप धारण करं त्यानामा मोठी गोष्ट नही; त्यासना शेवट कामप्रमाणे व्हई.
पौल अनं त्याना विरोधक यासनामा तुलना
16 मी परत सांगस, कोणी माले मूर्ख समजु नका; जर तुम्हीन तसं समजतस तर जशा मुर्खना तसा मना स्विकार करा, म्हणजे मी बी थोडासा गर्व करसु. 17 गर्वतीन मी हाई बोलस, पण ते प्रभुले धरीन नही तर मुर्खसारख बोलस. 18 बराच लोक शरिरप्रमाणे गर्व करतस म्हणीन मी बी करसु. 19 तुम्हीन शहाणा शेतस म्हणीन खूशीतीन मुर्खनं सहन करतस. 20 कोणी तुमले दास बनाडी टाकं, तुमना फायदा उचला, तुमले फसाडी लिधं अनी स्वतःले उंच करी लिधं, कोणी तुमना तोंडमा मारी, ते सर्व तुम्हीन सहन करतस. 21 माले हाई सांगाले लाज वाटस की मनाकरता कमजोरी शे, हाई मी सहन करू शकस नही, तरी ज्या कसामा कोणी धीट व्हई, त्यामा मी पण धीट शे, हाई मनं बोलनं मुर्खपणनं शे. 22 त्या इब्री शेतस का? मी बी शे. त्या इस्त्राएली शेतस का? मी बी शे. त्या अब्राहामना संतान शेतस का? मी बी शे. 23 ✡११:२३ प्रेषित १६:२३त्या ख्रिस्तना सेवक शेतस का? मी जास्त शे हाई मी येडानामायक बोलस; कष्ट करामा, बंदिवास सोसामा; बेसुमार फटका खावामुये अनं बराच येळ मरणसंकट सोसामुये; मी जास्त शे. 24 पाच दाव मी यहूद्यासना हाततीन एकोणचाळीस फटका खादात. 25 ✡११:२५ प्रेषित १६:२२; प्रेषित १४:१९तीनदाव काठीन मारा खादा; एकदाव माले दगडमार व्हयना; तीनदाव मनं जहाज अपघातमा फसनं, समुद्रमा मी रातनंरात राहिनु. 26 ✡११:२६ प्रेषित ९:२३; प्रेषित १४:५मी कितलातरी प्रवास करा त्यामा; नदीवरना संकट, लुटारूसना संकट, स्वतःना जातना लोकसनं संकट, गैरयहूदी लोकसनं संकट, नगरमाधला संकट, जंगलमाधला संकट, समुद्रमाधला संकट, खोट्या बंधुसना संकट. यासनामा मी राहिनु. 27 श्रम अनं कष्टमा, कितलातरी दाव करेल जागरणमा, भूक तहानमा, कितला दाव उपाशी, 28 शिवाय ह्या अनी असा बऱ्याच गोष्टीस शिवाय मना रोजना मी रगडाई राहिनु, म्हणजे सर्व मंडळीसनी चिंता हाई शे. 29 एखादा अशक्त व्हयना तर मी अशक्त व्हस नही का? एखादा अडखळणा तर माले राग येवावु नही का?
30 माले अभिमान करानं भाग पडनं तर मी आपला अशक्तपणाना गोष्टीसना अभिमान करसु. 31 देव आपला प्रभु येशुना पिता जो युगानुयुग धन्यवादित शे, त्याले माहित शे की मी खोटं बोलावं नही. 32 ✡११:३२ प्रेषित ९:२३-२५दिमिष्क शहरमा अरीतास राजाना पदाधिकारी यानी माले धराकरता दिमिष्क शहर दारवर शिपाई ठेयल व्हता. 33 तरी माले टोपलीमा बसाडीसन गावकुसवरतीन खिडकीमाईन खाल सोडं अनी त्यासना हातमा येवापाईन वाचनु.