34
दगडन्या दोन नव्या पाट्या
(अनुवाद 10:1-5)
परमेश्वरनी मोशेले सांगं, पहिल्या पाटयासनासारखा दोन दगडी पाटया घडाईसनं तयार म्हणजे तु फोडी टाका व्हतात त्या पहिल्या पाटयासवर ज्या वचन व्हतात त्या मी त्यानावर लिखसू. तु पहाटले तयार व्हयीसनं सीनाय परवतवर चढी जाय अनी पर्वतशिखरवार मनासमोर दाखल व्हय; तुनासंगे कोनीबी चढाले नही पाहिजे; सगळा पर्वतवार कोनताच माणुस दखावाले नही पाहिजे; तशेच शेरडामेंढरा अनी गुरढोरेसले डोंगरना कडाले चारू देवानं नही; तवय मोशेनी पहिल्या पाटयासनासारखा दोन दगडी पाटया घड्यात अनी सकासले उठीसनं त्या हातमां लिसनं परमेश्वरनी आज्ञाप्रमानं तो सीनाय पर्वतवर चढी गया;
तवय परमेश्वर मेघनाद्वारे उतरना अनी तठे त्यानाजोडे उभा राहीना, अनी त्यानी परमेश्वर ह्या आपला नावनी घोषना करी. 34:6 निर्गम 5:6; गणना 14:18; अनुवाद 5:9-10; 7:9-10 परमेश्वर त्यानामोरेतीन आशी घोषना करत गया; परमेश्वर, परमेश्वर दयाळू अनी कनवाळु देव, मंदक्रोध, दयानं अनी सत्यना सागर, हजारो लोकेसवर दया करनारा, अधर्म अपराध अनी पाप यानी क्षमा करनारा, आजीबात दया नही करनारा, आशे तो वडीलासना अधर्मना बारामां पोर्‍यासोर्‍यासना तिसरी चौथी पिढीपावोत समाचार लेस
तवय मोशेनी लगेच भूमीपावोत वाकीसनं नमन करं. 34:9 निर्गम 23:14-19; अनुवाद 7:1-5; 16:1-17अनी तो बोलना, हे प्रभू तुनी मनावर कृपादृष्टी व्हयेल व्हयीते परमेश्वरनी आमनसंगे चालाले पाहीजे; हया माणसे ताठ मानना शेतस; आमना अधर्म अनी पापनी क्षमा कर अनी आपलं वतन समजीसन आमले जोडे कर.
करारना नवनीकरन
(निर्गम 23:14,19; अनुवाद 7:1-5; 16:1-17)
10 देव बोलना, दख, मी एक करार कसर; तुना सर्वा लोकेसनीसमोर आशी अद्भुत कृत्य करसू तशे बठी पृथ्वीवर व्हयेल नही व्हावावुत; ज्या लोकेसमा तु राहाशी त्या बठा परमेश्वरना कृत्य दखतीन, कारन जे मी तुनाकरता करनार शे ते भयानक शे. 11 जी आज्ञा मी तुले दी राहीनू शे ती तुले पायनच पडी; दख, मी तुनासमोर अमोरी, कनानी, हित्ती परिज्जी, हिव्वी अनी यबुसी या लोकेसले काढी टाकसु. 12 तु सावध राय; ज्या देशमां तु जायी राहीना शे तठेना लोकेसनीसंगे करारमदार करानं नही; करं ते तुले पाश व्हई. 13 34:13 अनुवाद 16:21त्यासन्या वेदया पाडी टाक, त्यासना खांब फोडी टाक, त्यासना आशेरन्या मुर्त्यासले तोडीन टाक. 14 कारन तुले दुसरा कोनतेबी देवनी पुजा करानी नही शे, कारन ज्यान नाव ईर्ष्यावान शे, तो परमेश्वर ईर्ष्यावान शे; 15 तु संभायीसनं राय, देशमाधला लोकेसनी तुला करारमदार कराले नही पाहीजे; नाहीते त्या व्यभिचार मनतीन त्यासना देवानामांगे लागीसनं त्यासले बलिदान करतीन; अनी त्यासमासला कोनी तुले बलावं व्हई तु त्यासना बलिदानमासला काही खाशी, 16 त्यासना पोरीसमाईन कोनी तु आपला पोर्‍यासकरता बायको करशी, अनी त्यासन्या पोरी व्यभिचार मनतीन आपला देवसनीमांगे जातीन अनी तुना पोर्‍यासलेबी व्यभिचारी मनतीन त्यासनामांगे लावतीन. 17 34:17 निर्गम 20:4; लेवीय 19:4; अनुवाद 5:8; 27:20तु तुनाकरता घडायेल देव करू नको; 18 34:18 गणना 28:16-25; निर्गम 12:14-20; लेवीय 23:6-8 बेखमीर भाकरनं सण पाळ, मनी आज्ञा पाळीसनं अबीब महिनानं येळले सात रोज तु बेखमीर भाकर खावानं; कारन अबीब महिनामां तु मिसर देशमाईन निंघेल शे. 19 34:19 निर्गम 13:2प्रत्येक पहिला जन्म व्हयेल मना शे; तुना गुराढोरासमासला बैलनं अनी मेंढरासना पहिला जन्म व्हयेल नर मना शेतस. 20 34:20 निर्गम 13:13 गाढवनं पहिलं पिलुबद्दल कोकरुनं दिसनं ते सोडावानं, त्याले तसं सोडायं नही, तर त्यानी मान मोडानी. तुना पोऱ्यासपाईन प्रत्येक मोठा पोऱ्याले मोबदला दिसन सोडाई लेवानं. कोणी रिकामा हाततीन मनासमोर येवानं नही. 21 34:21 निर्गम 20:9; लेवीय 23:3; अनुवाद 5:13-14सव रोज तु तुना कामधंदा करं अनी सातवा रोजले आराम करं, नांगरनीनं अनी हंगामनी येळलेबी आराम कर. 22 34:22 लेवीय 23:15-21; लेवीय 23:39-43तु सप्तानं म्हणजे गहूनं हंगामनं पहिला पिकना सण पाळानं. 23 वरीसमा तीन दाव तुनामाईन बठा माणसासनी इस्त्राएलना देव प्रभु परमेश्वर यानं दर्शन लेवानं. 24 मी ते परराष्ट्रसले तुनामोरे घालाडसूं अनी तुनी सरहद्द वाढावसूं अनी वरीसमां तीनदाव तु आपला देव यहोवा यानं दर्शन लेवाले जाशी तवय कोनीबी तुनी जमीनना लोभ धरावु नही. 25 34:25 निर्गम 12:10मन यज्ञबलीनं रंगत खमीरनी भाकरनीसंगे अर्पानं नही अनी वल्हांडण सणमासला यज्ञबलीमाईन सकायपावोत राहू देवानं नही. 26 34:26 अनुवाद 26:2; 14:21आपली जमीनमासला पहिला पिकना हिसा आपला देव यहोवा याना मंदिरमां लई येवानं; करडुले त्याना मायनं दुधमां शिजाडानं नही. 27 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं हाई वचन लिखी ठेव, कारन हाईच वचनले अनुसरीसनं मी तुनासंगे अनी इस्त्राएल लोकेसनीसंगे करार करेल शे. 28 मोशे तठे परमेश्वरनाजोडे चायीस दिवस अनी चायीस रात व्हतां, तेवढा कायमां त्यानी अन्ननं सेवन करं नही, अनी त्या पाटयासवर त्यानी करारनं वचन म्हणजे दहा आज्ञा लिखी काढयात.
मोशे सीनाय पर्वतवरीन उतरस
29 34:29 २ करिंथ 3:7-16मोशे आज्ञापटन्या दोनी पाटया हातमां लिसनं सीनाय पर्वतवरीन उतरी राहींता तवय त्याना चेहरामाईन, परमेश्वरनासंगे भाषण करामुये, तेजनं किरन निंघी राहीना व्हतात, त्याना त्यालेच भान नही व्हतं. 30 मोशेना चेहरामाई तेजनं किरन निंघी राहिना शेतस आशे अहरोननी अनी बठा इस्त्राएल लोकेसनी दखं तवय त्या त्यानाजोडे जावाले भिवायनात. 31 मंग मोशेनी अहरोन अनी मंडयीनं प्रमुख यासले बलावं तवय त्या बठा त्यानाकडे परत वनात अनी मोशे त्यासनासंगे भाषन कराले लागना. 32 बठा इस्त्राएल लोके जोडे वनात अनी जे काही सीनाय पर्वतवर परमेश्वरनी त्याले सांगं व्हतं ते सर्वा त्यानी त्यासले आज्ञा दिधी. 33 मोशेनी त्यासनासंगे बोलानं व्हवानंतर आपला तोंडवर आच्छादन घालं; 34 पण मोशे परमेश्वरनासंगे भाषण कराले त्यानामोरे मजार जाये तवय तो बाहेर येस तोपावोत आपला तोंडवरला आच्छादन काढी लेय अनी बाहेर ईसनं जीबी आज्ञा त्याले व्हई ती तो इस्त्राएल लोकेसले सांगे. 35 इस्त्राएल लोके मोशेना तोंडकडे दखेत तवय त्याना चेहरामाईन तेजनं किरन दखाये; परमेश्वरनीसंगे संभाषन कराले मोशे मझार जास तोपावोत तो आपला तोंडवर आच्छादन करे.

34:6 34:6 निर्गम 5:6; गणना 14:18; अनुवाद 5:9-10; 7:9-10

34:9 34:9 निर्गम 23:14-19; अनुवाद 7:1-5; 16:1-17

34:13 34:13 अनुवाद 16:21

34:17 34:17 निर्गम 20:4; लेवीय 19:4; अनुवाद 5:8; 27:20

34:18 34:18 गणना 28:16-25; निर्गम 12:14-20; लेवीय 23:6-8

34:19 34:19 निर्गम 13:2

34:20 34:20 निर्गम 13:13

34:21 34:21 निर्गम 20:9; लेवीय 23:3; अनुवाद 5:13-14

34:22 34:22 लेवीय 23:15-21; लेवीय 23:39-43

34:25 34:25 निर्गम 12:10

34:26 34:26 अनुवाद 26:2; 14:21

34:29 34:29 २ करिंथ 3:7-16