31
याकोब लाबानना घरतीन पळी जास
नंतर याकोबनी हाई ऐकं, की, लाबानना पोऱ्या अस म्हणतस की, "आमना बापनं व्हतं नव्हतं ते सर्व याकोबनी हडप करी लियेल शे, अनी जे काही आमना बापनं व्हतं त्यानामाईनच त्यानी हाई सर्वी धनसंपत्ती कमाडेल शे." याकोबनी लाबानना तोंड दखीसन वळखी लिधं की, तो पहिलासारखा मनावर खुश नही शे. परमेश्वरनी याकोबले सांगं, की, "तू आपला पुर्वजसना देशले आपला नातेवाईकसकडे परत जाय, मी तुनाबरोबर ऱ्हासु."
तवय याकोबनी राहेल अनं लेआ हिसले निरोप धाडीसन वावरमा आपला कळपकडे बलाई लिधं. त्या तठे वन्यात तवय तो तिसले बोलना, "तुमना बापना व्यवहार मनासंगे आते पहिलासारखा राहिना नही, पण मना बापना देव मनासंगे शे. तुमले ते हाई माहीत शे की, मी तुमना बापनी सेवा बळ लाईसन करेल शे. पण तुमना बापनी माले फसाडीसन दहा येळा मना कमाईमा बदल करा, तरी बी देवनी त्याले मनं नुकसान करू दिधा नही. त्यानी जवय सांगं की, ठिपकादार मेंढ्या बकरीसना तुले वेतन भेटी, तवय सर्वा कळपासमा ठिपकादार पिल्ला व्हवाले लागनात; त्यानी जवय सांगं, की, बांड्या बकऱ्या तुन्या, तवय सर्व कळपासमा बांडी पिल्ला व्हवाले लागनात. अस देवनी तुना बापना जनावरे लिसन माले देल शेतस.
10 कळपसमा मेंढ्या, बकऱ्या गाभन व्हवाना ऋतुमा मी मनी नजर वर करीसन स्वप्नमा दखं की, मेंढ्यासवर उडनारा एडका बांड्या, काबऱ्या अनं करडा व्हतात. 11 तवय परमेश्वरना देवदूतनी स्वपनमां माले सांगं, "याकोबा!" अनी मी बोलनु, "मी आठे शे." 12 तो बोलना, "तुनी नजर वर करीन दख, मेंढ्यासवर उडनारा सर्वा एडका बांडे, ठिपकादार, अनं करडे शेतस; कारण लाबान तुनासंगे कसं वर्तन करी राहिना शे, हाई सर्व मी दखेल शे. 13 31:13 उत्पती 28:18-22बेथेल आठे तू एक स्तंभले तेलना अभ्यंग करीन माले नवस करं तठला मी देव शे; आते तू हावु देशमाईन निंघीसन आपली जन्मभूमीले परत जाय. 14 तवय राहेल अनं लेआ त्याले बोलन्यात, आते आमना बापना घरमा अजून काही वाटा किंवा वेतन आमनाकरता थोडं ठेयेल शे? 15 त्याना नजरमा आमी परक्याच शेतस ना? कारण त्यानी आमले ईकी देयल शे, अनी आमनं धन बी खाई टाकेल शे. 16 यामुये जो सर्वा धन परमेश्वरनी आमना बापपाईन ली लियेल शे, तो आमनं अनं आमना पोऱ्यासना शे, त्यामुये आते जे परमेश्वरनी तुमले सांगेल शे तशे करा.
17 मंग याकोब उठीसन आपला पोऱ्या अनं बायकासले उंटसवर बसाडं. 18 अनी आपली सर्वा जनावरे, अनी पदन-अराममा मियाडेल सर्वी मालमत्ता लिसन तो आपला बाप इसहाक यानाकडे कनान देशमा जावाले निंघना. 19 जवय लाबान आपला मेंढरंसनी कातरणी कराले जायेल व्हता, तवय राहेलनी आपला बापन्या (तेराफीम) गृहदेवत्या चोरी लिधं. 20 अस याकोबनी अरामी लाबानले फसाडं; कारण आपण पळी जाई ऱ्हायनुत हाई त्यानी त्याले समजू दिधं नही. 21 मंग तो त्यानाजोडे जे काही व्हतं, ते लिसन तो पळी गया; अनी पुढं जाईसन त्यानी फरात नदी ओलांडीसन गिलादना डोंगरनी बाजुले जावाना बेत करं.
लाबान याकोबना पाठलाग करस
22 याकोब पळी गया शे, हाई तिसरा दिनले कोणीतरी लाबानले सांगं. 23 तवय त्यानी आपला सर्वा भाऊबंदसले लिसन सात दिनपावत प्रवास करीसन त्याना पाठलाग करं अनी त्याले गिलाद डोंगरवर सापडावं. 24 मंग देवनी अरामी लाबानले रातले सपनमां दर्शन दिसन सांगं, सावधान, तू याकोबले बरं वाईट बोलानं नही. 25 लाबाननी जवय याकोबले सापडावं, तवय याकोबनी डोंगरवर आपला पडाव टाकेल व्हता; लाबाननी बी आपला भाऊबंदनासंगे गिलाद नावना डोंगरवर पडाव टाकं.
26 मंग लाबान याकोबले बोलना, तू हाई काय करं? माले फसाडीसनं मन्या पोरी युध्दमा पाडाव करेलप्रमाण लई वनास. 27 तू गुपचुप पळीसन माले फसाडेल शे; माले काबंर सांगं नही, तू माले सांगता तर मी आंनदमा वाजागाजा करीसन डफ, तुतारी वाद्य वाजाडीसनं तुले निरोप दितु. 28 तू माले आपला पोऱ्यासोऱ्यासना मुका लेवानी सवड बी दिधी नही; हाऊ सर्व तू मुर्खपणा करेल शे. 29 तुना नुकसान करानं सामर्थ्य मनामा शे, पण कालदिन रातले तुना बापना देवनी माले सांगं की, सावधान, याकोबले बरं वाईट बोलानं नही. 30 बरं व्हयनं, तुले आपला बापनी घरनी ओढ लागी व्हती म्हणीसनं तू वनास, पण मन्या गृहदेवता का बरं चोरात? 31 तवय याकोबनी लाबानले उत्तर दिधं, माले भिती वाटनी; मी इचार करं की, तुम्हीन मनाकडतीन तुमन्या पोरीसले हिसकाई लिशात. 32 तुमन्या देवता ज्यानाकडे सापडतीन तो जिवत रावावु नही; तुम्हीन तुमना भाऊबंदनासमक्ष मनी तपासी ल्या अनी तुमना काही सापडनं तर वळखीन लि लेवानं, कारण याकोबले माहित नव्हतं की, राहेलनी देवता चोरी आणेल शेतस.
33 तवय लाबान याकोबना तंबूमा, लेआना तंबूमा अनी त्या दोन दासीसना तंबूमा गया, पण त्याले काहीच सापडनं नही, मंग तो लेआना तंबूमाईन राहेलना तंबूमा गया. 34 राहेल त्या गृहदेवता उंटसना कंठाळीमा ठिसन त्यावर बसेल व्हती, लाबाननी सर्वा तंबू शोधीसन दखा, पण त्याले काही सापडनं नही. 35 ती बापले बोलनी, मना धनी माले तुमनापुढे उभं राहता येवाऊ नही म्हणीसन राग येऊ देवानं नही, कारण माले स्त्रीधर्म प्राप्त व्हयेल शे, त्यानी खुप शोध करा पण त्याले त्या गृहदेवता सापडन्यात नहीत. 36 तवय याकोबले राग वना अनी तो लाबाननासंगे भांडाले लागना; याकोबनी लाबानले सांगं, मी अश कोणता अपराध, कोणता पाप करेल व्हतं? म्हणीसन तुम्हीन मना पाठलाग करनात? 37 तुम्हीन मना सर्वा वस्तुसनी झडती लिधी त्यामा तुमन्या घरना वस्तु सापडन्यात का? सापडन्या व्हईत तर त्या मना अनं तुमना भाऊबंदनासमक्ष ठेवा; म्हणजे त्यासले आपला दोन्हीसना न्याय करता ई. 38 आज तीस वरीसपावत मी तुमनासंगे ऱ्हायनु; इतला काळमा तुमन्या मेंढ्या बकऱ्या गाभटन्या नहीत अनं तुमना कळपासमाधलं एक बी मेंढानं मास खादं नही. 39 ज्यासले जंगली जनावरेसनी मारीन खादं, ती तशच तुमनाजोडे न आणता मी त्यासना बदलामा दुसरी मेंढरंनी भरपाई मी दिधी; दिनरातले चोरी व्हयेल मेंढरं तुम्हीन मनाकडीन भरपाई लिधी. 40 मनी हालत अशी व्हई जायेल व्हती, दिनले उन्हना ताप अनं रातले गारठा यासघाई मनी डोळासनी झोप उडी जाये. 41 वीस वरीसपावत मी तुमना घरमा ऱ्हायनु, चौदा वरीस तुन्या दोन्ही पोरीकरता अनी सहा वरीस तुमना मेंढ्या बकऱ्या करता मी तुमनी सेवा करी अनी दहा येळा तुम्हीन मना वेतनमां बदल करं. 42 मना बापना देव, अब्राहामना देव, इसहाकना धाक मना पाठिराखा नही ऱ्हाता, तर आते बी तुम्हीन माले रिकामा लाई देतात, पण देवनी मना दु:ख अनी मना कष्ट दखेल शे म्हणीसन त्यानी कालदिन रातले तुमले धमकाडं.
याकोब अनं लाबान यासनामा सलोखा
43 तवय लाबान याकोबले बोलना, ह्या पोरी ते मन्या पोरी शेतस, अनी ह्या पोऱ्या ते मना पोऱ्या शेतस; ह्या मेंढ्या बकऱ्या बी मन्या शेतस अनी ज्या काही तू दखी ऱ्हाईना शे, त्या सर्वा मना शे; आते ह्या मन्या पोरी अनं त्यासना पोटना पोऱ्या यासले मी काय करू शकस. 44 तर चल, तू अनी मी एकमेकसंगे करार करूत; अनी तो तुनामा अनी मनामा साक्षी राही.
45 तवय याकोबनी एक धोंडा लिसन त्याना स्तंभ उभा करा. 46 मंग याकोब आपला भाऊबंदसले बोलना, धोंडा गोया करा; अनी त्यासनी धोंडा गोया करीसन त्यासना ढिग करात. अनी तठे त्यासनी जेवण करं. 47 लाबाननी त्या ढिगनं नाव यगर-सहदूथा अश ठेवं, तर याकोबनी तिले गिलाद अश ठेवा. 48 लाबान बोलना, "आते हावु ढिग तुनामा अनं मनामा साक्ष शे, म्हणीन ह्यानं नाव गिलाद ठेवं." 49 तसच मिस्पा हाई बी नाव तिले दिधा; कारण तो बोलना, आपण एकमेकसना नजरआड व्हयनुत तर परमेश्वर तुना अनी मना साक्षी राही. 50 तू मना पोरीसले दु:ख दिधं किंवा दुसरा बाया बायका कऱ्यात तर दख, तुना मनामा कोणी दुसरा माणुस नही राहिना तरी देव साक्षी राही. 51 लाबान याकोबले आखो बोलना, दख, तुना मनामा हाई रास शे, अनं हाऊ स्तंभ मी उभा करेल शे. 52 हाई रास अनं हाऊ स्तंभ साक्षी शे; अनिष्ट कराना हेतुतीन मी तुनाकडे हाई रास ओलांडीसन येवाव नही अनं तू पण हाई रास अनं हाऊ स्तंभ ओलांडीसन मनाकडे येवानं नही. 53 अब्राहामना देव, नाहोरना देव, त्यासना बापना देव आमना न्याय करोत, मंग याकोबनी त्यानी शपथ लिधी ज्याना भय त्याना बाप इसहाक धरी राहिंता. 54 मंग याकोबनी डोंगरवर यज्ञ करं, अनं आपला भाऊबंदसले जेवण कराले बलायं, त्यासनी जेवण करीसन रातले तठेच मुक्काम करात. 55 लाबान मोठी पहाटमाच उठना, त्यानी आपला पोऱ्या पोरीसना मुका लिसन त्यासले आशिर्वाद दिधा, मंग लाबान निंघीसन आपला ठिकानमा वापस गया.

31:13 31:13 उत्पती 28:18-22