12
बेथानी गावले येशुना अभिषेक
(मत्तय २६:६-१३; मार्क १४:३-९)
मंग येशु वल्हांडणना पहिले सव दिन बेथानी गावले वना, ज्या लाजरसले येशुनी मरेलसमाईन जिवत करेल व्हतं तो तठे व्हता. तठे त्यानी त्यासनाकरता जेवण करं, तवय मार्था जेवण वाढी राहींती; अनी लाजरस त्यासना पंगतमा बसेलसपैकी एक व्हता. १२:३ लूक ७:३७,३८तवय मरीयानी अर्ध लिटर शुध्द जटामांसीन मोलवान सुगंधी तेल लिसन येशुना पायले लावं अनी आपला केससघाई त्याना पाय पुसात, तवय त्या सुगंधी तेलना वासघाई ते घर भरी गयं. येशुले धरी देणारा, त्याना शिष्यसमातील यहुदा इस्कर्योत नावना एकजण बोलना, “हाई सुगंधी तेल तिनशे चांदिना शिक्कासमा ईकीसन ते गरीबसले का बरं दिधं नही?” त्याले गरीबसनी काळजी व्हती म्हणीन तो ते बोलना अस नही, तर तो चोर व्हता; त्यानाकडे पैसासनी थैली राहे अनी तीमा जे काही टाकेत ते तो चोरी ले, म्हणीन तो अस बोलना.
यावरतीन येशु बोलना, “मना उत्तरकार्यना दिनकरता ते तिले ठेवु द्या. कारण गरीब तर कायमना तुमना जोडे शेतस, पण मी तुमना जोडे कायम राहसु अस नही.”
लाजरसले मारी टाकाना कट
येशु तठे शे अस बराचसा यहूदी लोकसले समजनं अनी फक्त येशुकरता नही तर ज्या लाजरसले त्यानी मरेल मातीन जिवत करं व्हतं त्याले बी दखाकरता त्या वनात. 10 मुख्य याजकसनी लाजरसले बी मारी टाकाना निश्चय करा. 11 कारण त्यानामुये बराचसा यहूदी लोके त्यासले सोडीन येशुवर ईश्वास ठि राहींतात.
जयोत्सवतीन यरूशलेममा प्रवेश
(मत्तय २१:१-११; मार्क ११:१-११; लूक १९:२८-४०)
12 दुसरा दिन सणले येल मोठी लोकसनी गर्दी येशु यरूशलेमले ई राहीना हाई ऐकीन. 13 खजुरन्या फांद्या लिसन त्यानी भेटकरता बाहेर निंघनात, अनी गजर करीसन बोलनात, “होसान्ना! प्रभुना नावतीन येणारा! इस्त्राएलसना राजा धन्यवादित असो!”
14 येशुले गधडानं धाकलं शिंगरू भेटावर तो त्यानावर बसना, हाई शास्त्रमा लिखेलप्रमाणे घडनं ते अस,
15 “हे सियोननी कन्या! भिऊ नको,
दख तुना राजा,
गाढवना शिंगरूवर बठीन येस.”
16 या गोष्टी त्याना शिष्यसले पहिले समजन्याच नहीत; येशुनं गौरवतीन ऊठना तवय त्यासले याद वनं की, त्यानाबद्दल या गोष्टी लिखेल व्हत्यात तसच लोकसनी त्यानासंगे करं.
17 त्यानी लाजरसले कबरमातीन बलाईन मरेल मातीन जिवत करं त्या येळले जी लोकसनी गर्दी त्यानासंगे व्हती ती गर्दी त्यानाबद्दल साक्ष दि राहींती. 18 यावरतीन बी लोके त्याले भेटाले गयात, कारण त्यानी या चमत्कार करेल शेतस, अस त्यासनी ऐकेल व्हतं. 19 यामुये परूशी लोके एकमेकसले बोलनात, “तुमनं काहीच चाली नही राहीनं हाई ध्यानमा ल्या! दखा, सर्व जग त्यानामांगे चाली राहीनं!”
ग्रीक लोकसनी येशुले ईनंती
20 सणमा उपासना कराले यरूशलेममा येल लोकसमा काही ग्रीक लोके व्हतात. 21 त्यासनी गालीलमातील बेथसैदा गावना फिलीप्प यानाजोडे ईसन ईनंती करी की, “महाराज, आमनी येशुले भेटानी ईच्छा शे.”
22 फिलीप्पनी जाईन अंद्रियाले सांगं तवय त्यासनी ईसन येशुले सांगं. 23 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनुष्यना पोऱ्याना गौरव होवानी येळ ई जायेल शे. 24 मी तुमले खरं सांगस; गहुना दाणा जमीनमा पडीन मरना नही तर तो एकलाच ऱ्हास; अनी तो मरना तर बरंच पिक देस. 25 १२:२५ मत्तय १०:३९; १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४; १७:३३जो आपला जीववर प्रेम करस तो त्याले गमाडी; अनी जो या जगमा आपला जिवना व्देष करस तो त्यानं सार्वकालिक जिवनकरता रक्षण करस. 26 जर कोणी मनी सेवा करस तर त्यानी मनामांगे येवानं, म्हणजे जठे मी शे तठे मना सेवक बी राही; कोणी मनी सेवा करी तर पिता त्याना सन्मान करी.”
येशु स्वतःना मरनबद्दल बोलस
27 “आते मना जीव व्याकुळ व्हई राहीना; आते मी काय बोलु? हे पिता, हाई येळपाईन मनं रक्षण कर; तरी बी मी या येळकरताच येल शे. 28 हे पिता, तु तुना नावना गौरव कर!” तवय अशी आकाशवाणी व्हयनी की, “मी तो गौरव करेल शे, अनी परत बी गौरवसु.”
29 तवय ज्या लोके उभा व्हतात त्या आवाज ऐकीसन बोलनात, ढगसमातीन गर्जना व्हयनी, बाकीना बोलनात, “त्यानासंगे देवदूत बोलनात.”
30 पण येशु त्यासले बोलना, “हाई वाणी मनाकरता नही तर तुमनाकरता व्हयनी, 31 आते या जगना न्याय येळ शे, आते या जगना आधिकारीसले बाहेर टाकाई जाई 32 माले पृथ्वीपाईन उच्च कर तर मी मनाकडे सर्वासले ओढी लिसु.” 33 आपण कोणता मरणघाई मराव शेतस हाई सुचाडाकरता तो अस बोलना.
34 यावरतीन लोके त्याले बोलनात, ख्रिस्त सर्वकाळ ऱ्हावाव शे, अस आम्हीन नियमशास्त्रमा ऐकेल शे; तर मनुष्यना पोऱ्याले उच्च कराले पाहिजे अस तुम्हीन कसं काय म्हणतस? हाऊ मनुष्यना पोऱ्या शे तरी कोण?
35 यावरतीन येशुनी त्यासले उत्तर दिधं, “आखो थोडा येळ तुमनामा प्रकाश शे, तुमले अंधारनी गाठाले नको म्हणीसन तुमनाकडे प्रकाश शे तोपावत चाला, कारण जो अंधारमा चालस त्याले आपण कोठे जाई राहीनु हाई समजत नही. 36 तुम्हीन प्रकाशना पोऱ्या व्हवाले पाहिजे म्हणीसन उजेड शे तोपावत प्रकाशवर ईश्वास ठेवा.”
येशु हाई सर्व बोलीसन निंघी गया अनी त्यासनापाईन गुप्त राहीना.
लोकसना अईश्वास
37 त्यानी त्यांसनासमोर इतला चिन्ह करात तरी त्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा नही. 38 यानाकरता की यशया संदेष्टानी जी गोष्ट सांगेल व्हती ती पुरी व्हवाले पाहिजे ती अशी की; “प्रभु, आम्हीन करेल प्रचारवर कोणी ईश्वास ठेयल शे? परमेश्वरनी शक्ती कोणले प्रकट व्हयेल शे?” 39 यामुये त्यासनाघाई ईश्वास ठेवाई नही राहींता, यशया आखो बोलना; 40 “कधीच अस व्हवाले नको की, त्यासनी डोयासघाई दखु नही, मनपाईन त्यासले समजाले नको, त्यासनी मनाकडे फिराले नको, म्हणीसन त्यानी त्यासना डोया आंधया करेल शे अनं त्यासनं मन कठीण करेल शे.”
41 यशयानी हाई यानाकरता बोलना की, त्यानी येशुनं गौरव दखं अनी त्यानाबद्दल बोलना.
42 अस व्हतं तरी बी यहूदी अधिकारीसमातीन बराच जणसनी त्यानावर ईश्वास ठेवा, पण आपले सभास्थानमातीन काढी टाकाले नको म्हणीसन परूशी लोकससमोर त्यासनी हाई कबुल करं नही. 43 कारण त्यासले देवकडला गौरवपेक्षा माणुसकडलं गौरव जास्त आवडनं.
येशु जगना प्रकाश
44 येशु मोठ्ठा आवाजमा बोलना, “जो मनावर ईश्वास ठेवस तो मनावर ईश्वास ठेवस नही, तर ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ठेवस. 45 अनी जो माले दखस, तो ज्यानी माले धाडेल शे त्याले दखस. 46 मी जगमा प्रकाश म्हणीसन येल शे, यानाकरता की मनावर ईश्वास ठेवणारा कोणी बी अंधारामा ऱ्हावाले नको. 47 मना वचनं ऐकीसन जो पाळस नही तर त्याना न्याय मी करस नही, कारण मी जगना न्याय कराकरता नही तर, जगनं उध्दार कराकरता येल शे. 48 जो मना अनी मना वचनसना स्विकार करस नही त्याना न्याय करनारा एकजण शे, जे वचन मी सांगेल शे तेच शेवटला दिनले त्याना न्याय करी. 49 कारण मी मना मननं बोलनु नही, तर मी काय सांगानं अनं काय बोलानं याबद्दल ज्या पितानी माले धाडेल शे, त्यानीच माले आज्ञा देयल शे. 50 त्यानी आज्ञा सार्वकालिक जिवन जोडे ली जास शे हाई माले माहीत शे, यामुये मी जे बी बोलस ते पितानी सांगेलप्रमाणेच बोलस.”

12:3 १२:३ लूक ७:३७,३८

12:25 १२:२५ मत्तय १०:३९; १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४; १७:३३