2
योनानी प्रार्थना
1 जवय योना मासाना पोटमा व्हता तवय त्यानी देवले प्रार्थना करी; 2 तो बोलना, “मी संकटमा व्हतु तवय मी देवना धावा करा, तवय देवनी मन ऐकं; अधोलोकमाईन मदतसाठे मी हाक मारी तवय तु मना आवाज ऐका. 3 तु माले समुद्रमा फेकं, तु सोडेल लाटा मनावरतीन गयात. मी खोल समुद्रमा गऊ, मना चारीमेर पाणीच पाणी व्हतं. 4 मी ईचार करा, मी तुना नजरमातीन पडी जायेल शे, तरी बी मी तुना पवित्र मंदिरकडे दखत ऱ्हासु? 5 समुद्रना पाणीने माले चारीमेर घेरेल व्हतं. अनं मना जिव गुदमरी राहींता, मना गळापाईन वर पुरा डोकाले शेवाळ गुंढाळाई जायल व्हतं. 6 मी समुद्र तळले, समुद्रमाधला डोंगरना पायथाले व्हतु. पृथ्वीनी माले समुद्रमा कायमनं कोंडी देल व्हतं. तरी पण मना देव यहोवा तु माले मरण मातीन वाचाडं! 7 मी तर जगानी आशाच सोडी देल व्हती, तवय माले देवनी आठवण वनी; अनं मनी प्रार्थना तुना पवित्र मंदिरमा तुनाजोडे पोहचनी. 8 काही लोके स्वतःसाठे देव बनाडीसन त्यासनी पुजा करतस, त्यासनी जो कृपाळु देव शे, असा खरा देवले सोडी देल शे. 9 पण मी तुना धन्यवादना गाणं म्हणीसन यज्ञ करसु; मी तुले करेल नवस फेडसु; कारण परमेश्वर देव तुनापाईनच तारण शे.” 10 मंग देवनी मासाले आज्ञा करी तवय मासानी योनाले किनारावर वकी टाकं.