4
योनाना राग अनी निनवेवर देवनी दया.
1 यामुये योनाले भलतं वाईट वाटनं अनं त्याले भलतं राग वना. 2 ✡4:2 निर्गम 34:6 योना देवले प्रार्थना करीसन सांगाले लागना “माले हाई पहिलेच माहीत व्हतं की, अस व्हई. मी मना देशमा व्हतु, तू माले आठे येवाले सांगं, म्हणीन मी तार्शीशसले पळी जाई राहींतु, माले माहीत व्हतं की तु कृपाळु, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न देव शे. माले माहीत व्हतं, ह्या लोकसनी पाप करानं सोडात म्हणजे तू त्यासना नाश करावू नही. 3 तर आते हे परमेश्वर मनी तुले ईनंती शे की, मना जिव ले. कारण आते माले जगापेक्षा मरनं बरं वाटस!” 4 तवय देव योनाले बोलना, “हाई गोष्टसाठे तुले राग ई राहीना हाई चांगलं शे का?” 5 मंग योनानी शहरना बाहेर पुर्व दिशाले जाईन एक मंडप बनाडा अनी तठे सावलीमा बशीन शहरना काय व्हस हाई दखाले लागना. 6 योना व्हता तठे देवनी एक वेल उगाडा. त्या वेलनी सावली योनाना डोकावर वनी. त्यामुये त्यानं दु:ख दुर व्हई अस देवनी करं म्हणीन त्याले भलता आनंद व्हयना. 7 दुसरा दिन पहाटले देवनी एक किडा वेल खावाकरता धाडा. किडानी वेलले खाई टाकं अनी वेल सुकी गया. 8 मंग सुर्य उगायना तवय देवनी पुर्व दिशातीन झळना वारा सोडा. तवय योनाले डोकाले भलतं ऊन अनी झळा लागन्यात. योना पुरा थकीन गळी गया. तवय तो देवले बोलना, “माले मारी टाक अस जगापेक्षा मरेल बरं.” 9 मंग देव योनाले बोलना, “हाई वेल सुकी गयं म्हणीन तुले राग वना. हाई तुले चांगलं वाटस का? मंग योना बोलना, हा, संतापमुळे मना जिव गया तरी माले चाली.” 10 मंग देव बोलना, “तु हाऊ वेलनाकरता काहीच करं नही, तु त्याले वाढायं नही, तो एक रातमा वाढना अनं दुसरा दिन सुकी गया, मंग त्या वेलनाकरता तुले कसाले काळजी वाटी राहीनं.” 11 मंग त्या निनवे शहरमा एक लाख विस हजारपेक्षा जास्त लोके अनी गुरेढोरे शेतस, त्यासले काय चांगलं शे? काय वाईट शे हाई कळस नही? त्यासनी काळजी मी का बरं कराले नको?