15
परंपराना प्रश्न
(मार्क ७:१-१३)
1 मंग यरूशलेमतीन परूशी अनं शास्त्री येशुकडे ईसन बोलणात, 2 तुमना शिष्य पुर्वजसना रितीरिवाज का बर मोडतस? कारण जेवणना पहिले त्या हात धोतस नही. 3 त्यानी त्यासले उत्तर दिधं, तुमना रितीरिवाजकरता तुम्हीन बी देवनी आज्ञा का बर मोडतस? 4 कारण देवनी सांगेल शे की, तु “तुना बाप अनी तुनी माय यासना मान ठेव,” अनी जो कोणी बापनी किंवा मायनी निंदा करस त्याले मरणदंडनी शिक्षा व्हई; 5 पण तुम्हीन सांगतस की, जो कोणी स्वतःना माय बापले अस सांगी, मी जे तुमले देणार व्हतु, ते मी देवले अर्पण करी टाकं. 6 त्यानी स्वतःना मायबापना मान नही ठेवा तरी चाली, हाई सांगीन तुम्हीन तुमना रितीरिवाजकरता देवनं वचन मोडी टाकेल शे. 7 अरे ढोंगीसवन, यशया संदेष्टानी तुमनाबद्दल बरोबर भविष्य करेल शे की, 8 ह्या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे. 9 त्या माणुसनी बनाडेल विधीसले मनं शास्त्र मानिसन शिकाडतस अनं बिनकामनी मनी भक्ती करतस.
अशुध्द करनारी गोष्ट
10 तवय त्यानी लोकसनी गर्दीले जवळ बलाईन सांगं, ऐका अनं समजी ल्या. 11 जे तोंडमा जास ते माणुसले अशुध्द करस नही, तर जे तोंडमाईन निंघस ते माणुसले अशुध्द करस. 12 नंतर शिष्य ईसन त्याले बोलणात, हाई वचन ऐकीन परूशी नाराज व्हयनात, हाई तुमले समजनं का? 13 त्यानी उत्तर दिधं की, ज्या ज्या रोपटा मना स्वर्ग माधला बापनी लायेल नही, त्या त्या उपटाई जातीन. 14 ✡लूक ६:३९त्यासले राहु द्या; त्या आंधया मार्गदर्शक शेतस, अनी आंधया आंधयाले ली जाई तर दोन्ही बी खड्डामा पडतीन. 15 पेत्र त्याले बोलना, हाऊ दृष्टांत आमले फोडीन सांगा, 16 तो बोलना, तुमले बी अजुन समजनं नही का? 17 जे तोंडमा जास ते पोटमा उतरस अनं नंतर शरिरबाहेर टाकाय जास, हाई तुमले समजत नही का? 18 ✡मत्तय १२:३४जे तोंडमाईन निंघस ते मनमातीन येस अनं माणुसले अशुध्द करस. 19 मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस. 20 ह्या गोष्टी माणुसले अशुध्द करतस; हात न धोता जेवण करानं हाई माणुसले अशुध्द करस नही.
कनानी बाईना ईश्वास
(मार्क ७:२४-३०)
21 नंतर येशु तठेन निंघीन सोर अनं सिदोन प्रांतमा गया; 22 अनी दखा, त्या प्रांतमातीन एक कनानी बाई ईसन वरडीन बोलनी, प्रभु, दावीदना पोऱ्या, मनावर दया कर, मनी पोरले दुष्ट आत्मा भलताच तरास दि ऱ्हाईना शे. 23 तरी तो तिले काहीच नही बोलना; तवय त्याना शिष्यसनी जोडे ईसन त्याले ईनंती करी की, तिले परत धाडी द्या; कारण ती आमनामांगे वरडत ई राहिनी. 24 त्यानी उत्तर दिधं, माले इस्त्राएलना खानदानमधला दवडायेल मेंढरसशिवाय दुसरा कोणाचकरता धाडेल नही शे. 25 तवय ती ईसन त्याना पाया पडीन बोलनी, प्रभुजी, माले मदत करा. 26 येशुनी उत्तर दिधं, पोऱ्यासनी भाकर लिसन कुत्राले टाकानी हाई बराबर नही शे. 27 ती बोलनी, बराबर शे, प्रभु; पण कुत्रा बी आपला मालकना ताटमातीन पडेल उष्ट खातस. 28 तवय येशुनी तिले उत्तर दिधं, बाई, “तुना ईश्वास मोठा शे, जशी तुनी ईच्छा शे तस तुनाकरता होवो; अनी त्याच येळले तिनी पोर बरी व्हयनी.”
बराच रोगी बरा व्हतस
29 नंतर येशु तठेन निंघीन गालील समुद्रजोडे वना, अनं डोंगरवर जाईन बठना 30 मंग लोकसनी गर्दी त्यानाकडे वनी; त्यासनासंगे लंगडा, पांगया, आंधया, मुक्का अनं दुसरा बराच जण व्हतात; त्यासले त्यासनी त्याना पायजोडे ठेई दिधं अनी त्यानी त्यासले बरं करं. 31 लोकसनी गर्दीनी हाई दखं की मुक्का बोलतस, पांगया बरा व्हतस, लंगडा चालतस अनं आंधया दखतस तवय लोके आश्चर्यचकीत व्हयनात अनी त्यासनी इस्त्राएलना देवना गौरव करा.
चार हजार लोकसले जेवण
(मार्क ८:१-१०)
32 मंग येशुनी आपला शिष्यसले बलाईन सांगं, माले लोकसनी किव ई राहीनी, कारण तिन दिनपाईन त्या मनासंगे शेतस अनी त्यासनाजोडे खावाले काहीच नही; कदाचित त्या वाटमा मरगळेलना मायक पडतीन; म्हणीन त्यासले भूक्या धाडानी मनी ईच्छा नही शे. 33 शिष्यसनी त्याले सांगं, असा जंगलमा इतला लोकसनी भूक मिटी इतल्या भाकरी आमनाजोडे कोठेन येतीन? 34 येशुनी त्यासले ईचारं, तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस? त्या बोलणात सात भाकरी अनं काही धाकला मासा. 35 मंग त्यानी लोकसनी गर्दीले जमीनवर बठाले सांगं. 36 नंतर त्यानी त्या सात भाकरी अनं धाकला मासा लिसन देवना उपकार मनीन; त्या मोडीसन शिष्यसले दिध्यात अनी शिष्यसनी ते लोकसले वाटी दिध्यात. 37 मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हयनात अनी उरेल तुकडसना सात टोपला भरी लिधात. 38 जेवढासनी खादं त्यानामा बाया अनं पोऱ्या सोडीसन चार हजार माणसे व्हतात. 39 मंग लोकसनी गर्दीले घर धाडावर तो नावमा बशीन मगदानना प्रांतमा वना.