17
येशुनं दिव्य रूप
(मार्क ९:२-१३; लूक ९:२८-३६)
1 मंग येशु सव दिन नंतर पेत्र, याकोब अनं त्याना भाऊ योहान यासले एक उंच डोंगरवर एकांतमा लई गया. 2 तवय त्याना रूप त्यासनासमोर बदलनं; त्याना चेहरा सूर्यनामायक तेजस्वी व्हयना, त्याना कपडा धवळा शुभ्र व्हयनात. 3 तवय दखा, मोशे अनं एलिया ह्या त्यानासंगे बोलतांना त्यासले दखायनात. 4 मंग पेत्र येशुले बोलना, प्रभुजी आपण आठे राहसुत तर कितलं भारी व्हई; तुमनी ईच्छा व्हई तर मी आठे तिन मंडप बनाडस; तुमनासाठे एक, मोशेकरता एक, अनं एलियाकरता एक. 5 ✡मत्तय ३:१७; १२:१८; मार्क १:११; लूक ३:२२✡२ पेत्र १:१७,१८तो बोली राहिंता तेवढामा, दखा, तेजस्वी ढगनी त्यासले झाकी दिधं अनी दखा, ढगमातीन अशी वाणी व्हईनी; हाऊ मना पोऱ्या, माले परमप्रिय शे, ह्यानावर मी खूश शे; तुम्हीन यानं ऐका. 6 हाई ऐकीन येशुना शिष्य भलता घाबरणात अनं पालथा पडी गयात. 7 तवय येशु त्यासनाजोडे ईसन हात लाईन बोलना, ऊठा, घाबरू नका. 8 मंग त्यासनी वर दखं तवय त्यासले येशुशिवाय कोणीच दखायनं नही. 9 नंतर त्या डोंगरवरतीन खाल उतरी राहींतात तवय येशुनी त्यासले आज्ञा करी की, मनुष्यना पोऱ्या मरेल मातीन परत जिवत व्हई तोपावत हाई गोष्ट कोणलेच सांगु नका. 10 त्यावर त्याना शिष्यसनी त्याले ईचारं की, एलिया पहिले येवाले पाहिजे अस शास्त्री का बर म्हणतस? 11 येशुनी उत्तर दिधं, “एलिया” ईसन सर्वकाही सुधारी हाई खरं शे. 12 ✡मत्तय ११:१४पण मी तुमले सांगस की, एलिया येल शे अनी त्यासनी त्याले न वळखता त्यासना मनले पटनं तसं त्यानासंगे करं; तसच मनुष्यना पोऱ्याले बी त्यासनाकडतीन छळ सहन करना पडी. 13 तवय शिष्यसले समजनं, हाऊ बाप्तिस्मा करनारा योहानबद्दल बोली राहीना.
दुष्ट आत्मा लागेल पोऱ्या बरा व्हस
(मार्क ९:१४-२९; लूक ९:३७-४३)
14 नंतर त्या लोकसजोडे वनात तवय एक माणुस येशु समोर ईसन गुडघा टेकीन बोलना, 15 प्रभुजी मना पोऱ्यावर दया करा, कारण त्याले मिर्गी येस, त्याले भलता तरास व्हस; तो घडीघडी आगमा अनं पाणीमा पडस. 16 म्हणीन मी त्याले तुमना शिष्यसकडे आणं, पण त्यासनाघाई तो बरा व्हयना नही. 17 तवय येशुनी उत्तर दिधं, अरे ओ भ्रष्ट पिढी, कोठपावत मी तुमनासंगे ऱ्हासु? कोठपावत तुमनं सहन करसु? त्या पोऱ्याले मनाकडे लई या. 18 मंग येशुनी दुष्ट आत्माले आज्ञा दिधी, तवय त्या पोऱ्यामातीन तो निंघी गया अनी त्याच येळले पोऱ्या बरा व्हयना. 19 नंतर शिष्य एकांतमा येशुजोडे ईसन बोलणात, आमनाघाई तो दुष्ट आत्मा का बर नही निंघना? 20 ✡मत्तय २१:२१; मार्क ११:२३; १ करिंथ १३:२त्यानी त्यासले सांगं, तुमना बिनईश्वासमूये; कारण मी तुमले सत्य सांगस की, जर तुमनामा राईना दाणा एवढा जरी ईश्वास व्हई तर हाऊ डोंगरले आठेन तिकडे सरक अस तुम्हीन सांगं तर तो सरकी; अनं तुमले काहीच अशक्य ऱ्हावाव नही. 21 तरी बी हाई भूतनी जात प्रार्थना अनं उपासशिवाय निंघस नही.
दुसरांदाव येशुनी स्वतःना मृत्युबद्दल करेल भविष्य
(मार्क ९:३०-३२; लूक ९:४३-४५)
22 त्या गालील नगरमा गोया व्हयनात तवय येशु त्यासले बोलना, मनुष्यना पोऱ्याले लोकसना हातमा धरीन देतीन. 23 त्या माले मारी टाकतीन अनी तिसरा दिनले तो परत जिवत व्हई, तवय त्या भलताच नाराज व्हयनात.
मंदिरना कर
24 जवय त्या कफर्णहुम गावमा वनात तवय मंदिरना कर गोया करनारानी पेत्रले ईचारं, तुमना गुरू मंदिरना कर नही देस का? 25 तो बोलना, हा देस, मंग तो घरमा येवावर काही बोलाना पहिलेच येशुनी त्याले ईचारं, शिमोन, तुले काय वाटस? पृथ्वीवरला राजा कोणाकडतीन कर लेतस? आपला पोऱ्यासकडतीन की परकासकडतीन? 26 तो बोलना, परकासकडतीन मंग येशु त्याले बोलना, म्हणीन पोऱ्या कर भरापाईन मुक्त शेतस. 27 पण त्यासनाकरता आपण अडथळा बनाले नको, म्हणीन तु समुद्रमा जाईसन गळ टाक; अनी जो मासा पहिले वर ई, तो मासा धरीन त्यानं तोंड उघाड; म्हणजे तुले दोन रूपया सापडतीन त्या लिसन मनाबद्दल अनं तुनाबद्दल त्यासले दे.