26
येशुले माराना कट
(मार्क १४:१,२; लूक २२:१,२; योहान ११:४५-५३)
1 मंग येशुनी ह्या सर्वा गोष्टी शिकाडानं संपाडानंतर आपला शिष्यसले सांगं, 2 तुमले माहित शे की, दोन दिन नंतर वल्हांडण सण शे अनी मनुष्यना पोऱ्याले क्रुसखांबवर खियाकरता धरी देतीन.
3 तवय कैफा नावना प्रमुख याजकना वाडामा मुख्य याजक अनं वडील लोके गोया व्हयनात, 4 अनी येशुले गुपचुप धरीन मारी टाकानी योजना त्यासनी बनाडी. 5 “लोकसमा दंगल व्हवाले नको म्हणीन हाई सणना दिनमा नही करानं, अस त्यासनी सांगं.”
येशुना तेल अभिषेक
(मार्क १४:३-९; योहान १२:१-८)
6 जवय येशु बेथानी गावले जो पहिले कोडरोगी व्हता त्या शिमोनना घर व्हता. 7 ✡लूक ७:३७,३८मंग तो जेवाले बठेल व्हता तवय एक बाई महागडं सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी अनी तिनी ते भांडं फोडीन तेल त्याना डोकावर वती दिधं. 8 हाई दखीन त्याना शिष्य संतापिन बोलनात, हाई का बर नासाडं? 9 हाई “ईकीन बराच पैसा भेटतात अनी त्या गरीबसले देता येतात!”
10 येशुने हाई दखीन त्यासले सांगं, हाई बाईले का बर त्रास देतस? तिनी तर मनाकरता चांगल कार्य करेल शे. 11 गरीब कायमना तुमना जोडे शेतस, पण मी कायमना तुमना जोडे शे अस नही. 12 तिनी मना शरिरवर सुगंधी तेल वतीन मना उत्तरकार्यनी तयारी पहिलेच करी दिधी. 13 मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.
यहुदा ईश्वासघात करस
(मार्क १४:१०-११; लूक २२:३-६)
14 मंग बारा शिष्यसमधला एक यहूदा इस्कर्योत मुख्य याजकसकडे गया. 15 अनी त्यानी सांगं, मी येशुले धरीन तुमले सोपी दिसु तर माले काय दिशात? मंग त्यासनी त्याले तिस रूपया दिधात. 16 तवयपाईन यहूदा त्याले कसं धरी देवाणी यानी संधी दखु लागना.
शेवटलं जेवण
(मार्क १४:१२-२१; लूक २२:७-१३,२१-२३; योहान १३:२१-३०)
17 नंतर बेखमीर भाकरीना सणना पहिला दिन शिष्य येशुकडे ईसन बोलणात, आपलाकरता वल्हांडण सणना जेवणनी तयारी आम्हीन कोठे करानी अशी तुमनी ईच्छा शे?
18 त्यानी सांगं, नगरमा एक माणुसकडे जाईन त्याले सांगा की, गुरू म्हणस, मनी येळ जोडे येल शे; माले मना शिष्यसनासंगे तुना आठे वल्हांडण सण कराना शे.
19 मंग येशुनी सांगेल प्रमाणे शिष्यसनी जाईन वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
20 संध्याकाय व्हयनी तवय तो बारा शिष्यससंगे जेवणले बठना. 21 जवय त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी सांगं, मी तुमले सत्य सांगस, तुमनामधला एकजण माले धरी दि.
22 तवय त्या भलताच नाराज व्हयनात अनी त्या एक एक करीसन त्याले ईचारू लागनात, “प्रभुजी, मी शे, का तो?”
23 येशुनी उत्तर दिधं, ज्यानी मनासंगे ताटमा हात टाकेल शे, तोच माले धरी दि. 24 मनुष्यना पोऱ्याबद्दल जस लिखेल शे तसा तो जाई खरा, पण जो मनुष्यना पोऱ्याले धरी दि, त्या माणुसना धिक्कार असो, तो माणुस जन्मले नही येता तर ते त्याले चांगलं व्हतं!
25 तवय त्याले धरी देणारा यहुदानी त्याले ईचारं, “गुरजी” मी शे का तो? येशुनी त्याले उत्तर दिधं, तु म्हणस तसच.
प्रभुभोजन
(मार्क १४:२२-२६; लूक २२:१४-२०; १ करिंथ ११:२३-२५)
26 मंग त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, “हाई ल्या अनी खा, हाई मनं शरीर शे,”
27 अनी त्यानी प्याला लिधा अनी उपकार मानीन त्यासले दिसन सांगं, “तुम्हीन सर्वा यानामातीन प्या,” 28 हाई मना “करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे. 29 मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस पेवाव नही जोपावत मना पित्याना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही.”
30 मंग देवनं गानं म्हणीसन त्या जैतुनना डोंगरकडे निंघी गया.
पेत्रकरता भविष्यवाणी
(मार्क १४:२७-३१; लूक २२:३१-३४; योहान १३:३६-३८)
31 मंग येशु त्यासले बोलना, “तुम्हीन रातले सर्वा माले सोडीन पळी जाशात, कारण शास्त्र अस सांगस की, ‘देव मेंढपायले मारी टाकी अनी कळपमाधला मेंढरसनी दाणादाण व्हई जाई.’ 32 ✡मत्तय २८:१६पण मी जिवत व्हवानंतर तुमना पहिले गालीलमा जासु.”
33 पेत्र येशुले बोलना, “सर्वा तुले सोडीन पळतीन पण मी तुले सोडीन पळाव नही!”
34 येशु बोलना, “मी तुले सत्य सांगस की, आज रातले कोंबडा कोकावाना पहिले तु माले तिनदाव नाकारशी.”
35 पेत्र त्याले बोलना, “तुनासंगे माले मरणं पडनं तरी मी तुमले नाकारावुच नही!” अनी बाकीना शिष्यसनी पण तसच सांगं.
गेथशेमाने बागमा येशुनी प्रार्थना
(मार्क १४:३२-४२; लूक २२:३९-४६)
36 नंतर येशु त्याना शिष्यससंगे गेथशेमाने नावना बगीच्यामा वना, “मी पुढे जाईन प्रार्थना करस तोपावत तुम्हीन आठे बठा.” 37 मंग त्यानी पेत्र अनं जब्दीना दोन्ही पोऱ्या यासले संगे लिधं अनं तो खुपच खिन्न अनं कष्टी व्हवाले लागना. 38 तवय तो त्यासले बोलना, “मना जीव” मरणप्राय, खुपच खिन्न व्हई जायेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी मनासंगे जागा ऱ्हा.
39 मंग तो थोडा पुढे जावानंतर पालथा पडिन अशी प्रार्थना कराले लागना की, “हे मना पिता व्हई तर हाऊ दुःखनां प्याला मनावरतीन टळी जावो! तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे.”
40 मंग तो शिष्यसना जोडे वना अनी त्या झोपेल शेतस हाई दखीन पेत्रले बोलना, काय! एक तास बी तुमनाघाई जागं ऱ्हावायनं नही का? 41 तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
42 परत दुसरी दाव जाईसन येशुनी हाई प्रार्थना करी की, “हे मना पिता, जर हाऊ प्याला मी पेवाशिवाय टळाव नही तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे.” 43 मंग त्यानी परत ईसन त्यासले झोपेल दखं; कारण झोपमुये त्यासना डोया जड व्हयेल व्हतात. 44 परत तो त्यासले सोडीन गया अनी परत त्यानी तिसरांदाव त्याच शब्दसमा प्रार्थना करी. 45 परत तो शिष्यसकडे ईसन बोलना, काय तुम्हीन अजुन आरामशीर झोपी राहिनात? दखा! येळ जवळ येल शे, मनुष्यना पोऱ्या पापी लोकसना हातमा देवाई जाई राहिना. 46 ऊठा, चला. दखा, माले धरी देणारा जोडे येल शे.
येशुले अटक करतस
(मार्क १४:४३-५०; लूक २२:४७-५३; योहान १८:३-१२)
47 येशु बोली राहींता इतलामा बारा शिष्यसपैकी एक म्हणजे यहूदा तठे वना, त्यानाबरोबर मुख्य याजक, शास्त्री अनी वडील लोकसना माणसे तलवारी अनी टिपरा लई वनात. 48 त्याले धरी देणारानी एक इशारा देयल व्हता तो असा की; “मी ज्यानं चुंबन लिसु तोच तो शे. त्याले धरा!” 49 मंग त्यानी लगेच येशुजोडे ईसन, गुरजी, नमस्कार बोलीन त्याना चुंबन लिधात.
50 येशु त्याले बोलना, “दोस्त! ज्या कामकरता तु येल शे ते कर” तवय त्यासनी जोडे ईसन येशुले धरं अनी अटक करी. 51 मंग दखा, येशुनासंगे ज्या व्हतात त्यासनामातीन एकनी तलवार काढी अनी महायाजकना दासवर चालाडी अनं त्याना कान कापी टाका. 52 तवय येशु त्याले बोलना “तुनी तलवार परत जागावर ठेव,” कारण “तलवार चालाडणारा सर्वजण तलवारघाईच नाश पावतीन.” 53 तुले अस वाटस का की, माले मना पिताजोडे मांगता येस नही, आत्तेना आत्तेच तो मनाकरता देवदूतसना बारा सैन्यपेक्षा जास्त धाडु नही शकस? 54 मंग शास्त्रना शास्त्रलेख कशा पुर्ण व्हई की, हाई व्हणं आवश्यकच शे?
55 ✡लूक १९:४७; २१:३७✡लूक १९:४७तवय येशु लोकसनी गर्दीले बोलना, “जस एखादा नियम तोडणाराले धराकरता तलवार अनी टिपरा लई जातस तसा तुम्हीन माले धराले येल शेतस का? मी रोज मंदिरमा बशीन शिकाडी राहिंतु तरी तुम्हीन माले धरं नही. 56 पण संदेष्टासना लेख पुर्ण व्हवाले पाहिजे म्हणीन हाई व्हयनं.” इतलामा सर्व शिष्य त्याले सोडीन पळी गयात.
मुख्य याजकससमोर येशुनी चौकशी
(मार्क १४:५३-६५; लूक २२:५४,५५,६३-७१; योहान १८:१३,१४,१९-२४)
57 मंग येशुले धरणारासनी त्याले कैफा नावना मुख्य याजक याना घर लई गयात, तठे शास्त्री अनं वडील लोक जमेल व्हतात. 58 पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे मुख्य याजकना वाडापावत गया अनं मझार जाईन त्याना शेवट काय व्हस हाई दखासाठे पहारेकरीसमा बसना. 59 मुख्य याजक अनं सर्व न्यायसभा यासनी येशुले मारी टाकना उद्देशतीन त्यानविरूध्द खोटा आरोप शोधी राहींतात; 60 अनी बराच खोटा आरोप करनारा वनात पण त्यामा त्यासले काहीच भेटनं नही, तरी शेवट दोनजण ईसन बोलणात की, 61 ✡योहान २:१९“देवनं मंदिर तोडीन ते तिन दिनमा बांधाले मी समर्थ शे अस हाऊ बोलना.”
62 तवय मुख्य याजक ऊठीसन येशुले बोलना, “तु काहीच उत्तर देत नही का?” या तुनाविरूध्द कितला आरोप करी राहिनात, 63 पण येशु गप्पच राहिना. यावरतीन मुख्य याजकनी त्याले सांगं, “मी तुले जिवत देवनी शप्पथ घालिन विचारस की; जर तु देवना पोऱ्या ख्रिस्त शे तर तसं आमले सांगं.”
64 येशु त्याले बोलना, “तु सांगस तसच आखो. मी तुमले सांगस; यापुढे तुम्हीन फक्त मनुष्यना पोऱ्याले सर्व समर्थना उजवीकडे बठेल अनं स्वर्गना ढगसवर येतांना दखशात!”
65 तवय मुख्य याजकनी आपला कपडा फाडिसन सांगं, हाऊ देवनी निंदा करी राहिना, आते आमले आखो साक्षीदारसनी काय गरज! तुम्हीन हाई निंदा ऐकेल शे! 66 तुमले काय वाटस? त्यासनी उत्तर दिधं, “हाऊ मृत्यूदंडना योग्य शे.”
67 तवय त्या त्याना तोंडवर थुंकनात; अनं त्यासनी त्याले बुक्क्या माऱ्यात अनी बाकिनासनी त्याले थापड्या मारीन सांगं 68 अरे ख्रिस्त! “भविष्यवाणी करीसन सांगं तुले कोणी मारं!”
पेत्र येशुले नकारस
(मार्क १४:६६-७२; लूक २२:५६-६५; योहान १८:१५-१८,२५-२७)
69 इकडे पेत्र वाडामा बाहेर बठेल व्हता; तवय मुख्य याजकनी एक दासी त्यानाकडे ईसन बोलनी, “तु पण गालीलकर येशुसंगे व्हता.”
70 तो सर्वासना समोर नकारीन बोलना. “तु काय सांगी राहीनी, माले माहीत नही” 71 मंग तो बाहेर वट्टावर गया तवय आखो एक दासी त्याले दखीन तठे ज्या उभा व्हतात त्यासले बोलनी, “हाऊ पण नासरी येशु बरोबर व्हता.”
72 परत “तो शपथ लिसन बोलना मी त्या माणुसले वळखत नही!”
73 नंतर थोडा येळतीन तठे उभा राहणारासनी जोडे ईसन पेत्रले सांगं, खरच तु पण त्यानामाधलाच शे, कारण तुना बोलावरतीन तु कोण शे हाई समजी राहिनं.
74 मंग पेत्र बोलणा, “जर मी खोटं बोली ऱ्हायनु तर, देव माले मारी टाको! अशा शपथा वाहीन बोलु लागणा, हाऊ ज्या माणुसबद्दल तुम्हीन बोली राहिनात त्याले मी वळखत नही!” इतलामा कोंबडा कोकायना, 75 तवय “कोंबडा कोकावाना पहीले तु माले तीनदाव नाकारशी” असा ज्या शब्द येशुनी पेत्रले सांगेल व्हतात त्या त्याले आठवणात अनी तो बाहेर जाईसन हंबरडा फोडीन रडाले लागना.