फिलिप्पैकरांस पत्र
लेखक
पौल हे पत्र लिहिल्याचा दावा करतो (1:1) आणि सर्व भाषा, शैली, आणि ऐतिहासिक तथ्ये, अंतर्गत वैशिष्ट्ये, यांची पुष्टी करतो. प्रारंभिक मंडळी पौलाचे लेखकत्व आणि अधिकार याबद्दल सातत्याने बोलते. फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्राने ख्रिस्ताचे मन स्पष्ट केले जाते (2:1-11). पौलाने फिलिप्पैला एक पत्र लिहिले तेव्हा तो कैदेत होता पण तो आनंदाने भरला होता. फिलिपैकरांस पत्र आम्हाला शिकविते की आपण कठोर परिश्रम आणि दुःखात असतानासुद्धा ख्रिस्ती लोक आनंदी होऊ शकतात. ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा असल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 61.
तुरुंगात असताना पौलाने रोममध्ये फिलिपैकरांस पत्र लिहिले (प्रेषित 28:30). फिलिप्पैकरांना लिहिलेले पत्र एपफ्रदीत द्वारे देण्यात येणार होते, जे रोममध्ये पौल फिलिप्पै येथील मंडळीकडून आर्थिक मदत घेऊन येथे आले होते (फिलिप्पै. 2:25; 4:18). पण रोममध्ये आपल्या काळात एपफ्रदीत आजारी पडला, ज्याने परत घरी येण्यास विलंब लावला आणि म्हणून हे पत्र (2:26-27).
प्राप्तकर्ता
फिलिप्पै शहरातील ख्रिस्ती मंडळी हे मासेदोनिया जिल्ह्यातील एका प्रमुख शहरात होते.
हेतू
पौलाला वाटत होते कि त्याच्या तुरुंगात त्याच्यासाठी गोष्टी कशा जात होत्या हे मंडळीला हे समजले पाहिजे (1:12-26) आणि त्याच्या योजना काय होत्या, त्याला मुक्त करायला हवे (फिलिप्पै 2:23-24). मंडळीमध्ये काही विसंगती आणि विभाजन झाले असल्यासारखे दिसते आणि त्यामुळे प्रेषित एकता या दृष्टिकोनासह नम्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी लिहितात (2:1-18; 4:2-3). पौल जो मंडळीचा मुख्य धर्मोपदेशक, नकारात्मक शिकवण आणि काही खोटे शिक्षकांच्या परिणामांपासून दूर राहण्यासाठी लिहतो (3:2-3), पौलाने तीमथ्याला तसेच मंडळीला एपफ्रदीतच्या आरोग्य आणि योजनांबद्दल अहवाल देण्यास सांगितले (2:19-30) आणि पौलाने त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या देणग्यांबद्दल मंडळीचे आभार मानायला सांगितले. (4:10-20).
विषय
जीवनाला आनंदाने भरले
रूपरेषा
1. नमस्कार — 1:1, 2
2. मंडळीसाठी पौलाची परिस्थिती आणि उत्तेजन — 1:3-2:30
3. खोटया शिकवणी विरुद्ध चेतावणी — 3:1-4:1
4. अंतिम उपदेश — 4:2-9
5. धन्यवादाचे शब्द — 4:10-20
6. अंतिम अभिवादन — 4:21-23
1
नमस्कार
पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम; देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
पौलाची कृतज्ञता व आनंद
मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे. देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, 10 यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
पौलाच्या बंदिवासाचे परिणाम
12 माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. 13 म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले; 14 आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. 15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. 16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. 17 पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.
ख्रिस्तघोषणा होत असल्याबद्दल पौलाला झालेला आनंद
18 ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच. 19 कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
जीवन की मरण, कोणते चांगले?
21 कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. 22 पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. 23 कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे; 24 तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. 26 हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.
धैर्य धरावे म्हणून बोध
27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता. 28 आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. 30 मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.