23
परमेश्वर माझा मेंढपाळ
दाविदाचे स्तोत्र.
1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे*यहोवा-रोही, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो,
तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे.
माझा प्याला भरुन वाहत आहे.
6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.