87
सीयोनेत राहण्याचा मान
परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास
सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
राहाब * मिसर देशआणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.
पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;
आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
लोकांची नोंदणी करताना,
ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की,
माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”

*87:4 मिसर देश