7
इस्साखार 
  1 इस्साखारचे पुत्र:  
तोला, पुआह, याशूब व शिम्रोन; एकूण चार पुत्र.   
 2 तोलाचे पुत्र:  
उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.   
 3 उज्जी पुत्र:  
इज्राह.  
इज्राहचा पुत्र:  
मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते.   4 त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती.   
 5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.   
बिन्यामीन 
  6 बिन्यामीनचे तीन पुत्र:  
बेला, बेकेर व यदिएल.   
 7 बेलाचे पुत्र:  
एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.   
 8 बेकेराचे पुत्र:  
जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ.   9 ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.   
 10 यदिएलाचा पुत्र:  
बिल्हान.  
बिल्हानाचे पुत्र:  
यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.   11 हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.   
 12 ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.   
नफताली 
  13 नफतालीचे पुत्र:  
यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम*इतर मूळ प्रतींनुसार शल्लूम. ही बिल्हाची संतती.   
मनश्शेह 
  14 मनश्शेहचे वंशज:  
त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला.   15 माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.   16 माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.   
 17 ऊलामाचा पुत्र:  
बदान.  
हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.   
 18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.   
 19 शेमीदाचे पुत्र:  
अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम.   
एफ्राईम 
  20 एफ्राईमचे वंशज:  
एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद,  
त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह,  
त्याचा पुत्र तहथ,   21 त्याचा पुत्र जाबाद,  
त्याचा पुत्र शुथेलह.  
(आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.   22 यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.   23 तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह†म्हणजे शोकांतिका असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.   24 त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)   
 25 त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ,  
रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन,   
 26 त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद,  
त्याचा पुत्र एलीशामा,   27 त्याचा पुत्र नून  
व त्याचा पुत्र यहोशुआ.   
 28 त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती.   29 त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.   
आशेर 
  30 आशेराचे पुत्र:  
इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.   
 31 बरीयाहचे पुत्र:  
हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.   
 32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.   
 33 यफलेटाचे पुत्र:  
पासख, बिह्माल व अश्वाथ.   
ही यफलेटाची संतती होती.  
 34 शोमेराचे पुत्र:  
अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम.   
 35 शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र:  
सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.   
 36 सोफहाचे पुत्र:  
सूहा, हर्नेफेर, शूआल, बेरी, इम्राह,   37 बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान‡दुसरे नाव येथेर व बैरा.   
 38 येथेराचे पुत्र:  
यफुन्नेह, पिस्पाह व अरा.   
 39 उल्लाचे पुत्र:  
आरह, हन्निएल, रिस्याह.   
 40 आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.