45
इस्राएलची संपूर्ण पुनर्स्थापना
1 “ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार*किंवा 13 कि.मी. हात लांब आणि वीस हजार†किंवा 11 कि.मी. हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा. 2 यामधून, पाचशे हात‡किंवा 265 मीटर समचौरस पवित्रस्थानासाठी असावा, आणि त्याच्याभोवती पन्नास हात§किंवा 27 मीटर मोकळी जागा सोडावी. 3 या पवित्र प्रदेशात, पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असा भाग मोजून घे. त्यात पवित्रस्थान, परमपवित्रस्थान असेल. 4 याजक जे पवित्रस्थानात सेवा करतात आणि याहवेहसमोर सेवा करण्यास जे जवळ येतात त्या याजकांसाठी भूमीचा हा भाग पवित्र असेल. त्याचप्रमाणे हे ठिकाण त्यांच्या घरांसाठी आणि पवित्रस्थानासाठी पवित्र ठिकाण असे असावे. 5 पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असलेला हा भाग, जे लेवी लोक मंदिरात सेवा करतात त्यांच्यासाठी त्यांचे वतन म्हणून त्यांना राहण्यासाठी नगरे अशी असतील.*इब्री मूळ प्रतींनुसार 20 खोल्या त्यांचे वतन असे असणार
6 “ ‘पवित्र प्रदेशाला लागून पाच हजार हात रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा जो भाग आहे तो तुम्ही शहराची मालमत्ता म्हणून द्यावी; ती सर्व इस्राएलच्या हक्काची असणार.
7 “ ‘पवित्र प्रदेशाच्या भोवती व शहराची मालमत्ता याला लागून प्रत्येक बाजूची सीमा राजपुत्राची असेल. तिचा विस्तार पश्चिमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्वेकडून पूर्वेकडे असून त्याची लांबी पश्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत एका गोत्राच्या भागाच्या समांतर अशी असेल. 8 ही भूमी इस्राएलमध्ये राजपुत्राचे वतन असेल. आणि यापुढे माझे राजपुत्र माझ्या इस्राएली लोकांवर अत्याचार करणार नाहीत, तर इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार देशाचे वतन घेऊ देतील.
9 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 10 तुम्ही अचूक काटा, अचूक एफाह†अर्थात् एक कोरडे माप घेण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती. आणि अचूक बथ‡अर्थात् एक द्रव पदार्थ मापण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती. वापरावा. 11 एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे. 12 शेकेलमध्ये§म्हणजेच 12 ग्रॅ. वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना*म्हणजेच 60 शेकेल, पण साधारण मीना 50 शेकेल असे, 1 मीनाचे वजन 690 ग्रॅ. समान आहेत.
13 “ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा†म्हणजेच 2.7 कि.ग्रॅ. सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा‡म्हणजेच 2.3 कि.ग्रॅ. सहावा भाग. 14 बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत). 15 इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 16 देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे. 17 हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.
18 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे. 19 याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे. 20 त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे.
21 “ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. 22 त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्हा द्यावा. 23 सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे. 24 धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन§म्हणजेच 3.8 लीटर जैतुनाचे तेल आणावे.
25 “ ‘त्याचप्रमाणे सात दिवसांच्या सणाच्या दरम्यान, ज्याची सुरुवात सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी होते, त्याने पापार्पणे, होमार्पणे व धान्यार्पणे आणि तेल आणावे.
*45:1 किंवा 13 कि.मी.
†45:1 किंवा 11 कि.मी.
‡45:2 किंवा 265 मीटर
§45:2 किंवा 27 मीटर
*45:5 इब्री मूळ प्रतींनुसार 20 खोल्या त्यांचे वतन असे असणार
†45:10 अर्थात् एक कोरडे माप घेण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती.
‡45:10 अर्थात् एक द्रव पदार्थ मापण्याचे साधन ज्याची क्षमता 22 लीटरची होती.
§45:12 म्हणजेच 12 ग्रॅ.
*45:12 म्हणजेच 60 शेकेल, पण साधारण मीना 50 शेकेल असे, 1 मीनाचे वजन 690 ग्रॅ.
†45:13 म्हणजेच 2.7 कि.ग्रॅ.
‡45:13 म्हणजेच 2.3 कि.ग्रॅ.
§45:24 म्हणजेच 3.8 लीटर