2
यरुशलेमला परतलेल्या लोकांची यादी 
  1 आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.   2 जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह):   
यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली पुरुषांची नावे ही:  
 3 पारोशचे वंशज 2,172,   
 4 शफाट्याहचे 372,   
 5 आरहचे 775,   
 6 पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812,   
 7 एलामचे 1,254,   
 8 जत्तूचे 945,   
 9 जक्काईचे 760,   
 10 बानीचे 642,   
 11 बेबाईचे 623,   
 12 अजगादचे 1,222,   
 13 अदोनिकामचे 666,   
 14 बिग्वईचे 2,056,   
 15 आदीनचे 454,   
 16 हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,   
 17 बेसाईचे 323,   
 18 योराहचे 112,   
 19 हाशूमचे 223,   
 20 गिब्बारचे 95,   
 21 बेथलेहेमचे 123,   
 22 नटोफाहचे 56,   
 23 अनाथोथचे 128,   
 24 अजमावेथचे 42,   
 25 किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743,   
 26 रामाह व गेबाचे 621,   
 27 मिकमाशचे 122,   
 28 बेथेल व आयचे 223,   
 29 नबोचे 52,   
 30 मग्बिशचे 156,   
 31 दुसऱ्या एलामचे 1,254,   
 32 हारीमचे 320,   
 33 लोद, हादीद व ओनोचे 725,   
 34 यरीहोचे 345,   
 35 सनाहाचे 3,630,   
 36 याजकांचे वंशज:  
यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,   
 37 इम्मेरचे 1,052,   
 38 पशहूरचे 1,247,   
 39 हारीमचे 1,017,   
 40 लेवीचे वंशज:  
येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,   
 41 संगीतकार:  
आसाफचे वंशज 128,   
 42 मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः  
शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,   
 43 मंदिराचे सेवकांचे वंशज:  
झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,   
 44 केरोसचे, सीआहाचे, पादोनचे,   
 45 लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,   
 46 हागाबचे, शलमाईचे, हानानचे,   
 47 गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे,   
 48 रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे,   
 49 उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,   
 50 अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे,   
 51 बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,   
 52 बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,   
 53 बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,   
 54 नसीयाहचे व हतीफाचे.   
 55 शलोमोनच्या सेवकांचे वंशज:  
सोताईचे, हसोफरतचे, परूदाचे,   
 56 यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,   
 57 शफाट्याहचे, हत्तीलचे,  
पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे व आमीचे.   
 58 मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.   
 59 पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.   
 60 यांचे वंशज: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 652.   
 61 आणि याजक पितृकुळातील वंशज:  
हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.)   
 62 यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले.   63 राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणांतील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.   
 64 सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते.   65 याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या.   66 त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 खेचरे,   67 435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती.   
 68 जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली.   69 प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार जितके देणे शक्य होते तितके दिले. या कामासाठी 61,000 दारिक सोने*अंदाजे 500 कि.ग्रॅ., 5,000 मीना चांदी†अंदाजे 2.8 मेट्रिक टन व 100 याजकीय झगे भांडारात आणले.   
 70 इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.