36
एसावाचे गोत्र 
  1 एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही:   
 2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह   3 आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.   
 4 एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.   5 एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले.   
 6 मग एसाव*अर्थात् एदोम आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला.   7 कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती.   8 म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.   
 9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.   
 10 एसावाच्या पुत्रांची नावे:  
एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.   
 11 एलीफाजचे पुत्र:  
तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.   12 एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.   
 13 रऊएलाचे पुत्र:  
नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.   
 14 एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला,  
यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.   
 15 एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्या कुळांचे प्रमुख झाले:  
एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र:  
त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,   16 कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.   
 17 एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज:  
नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.   
 18 एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून:  
यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.   
 19 हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.   
 20 एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही:  
लोटान, शोबाल, सिबोन, अनाह,   21 दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.   
 22 लोटानाचे पुत्र:  
होरी व होमाम†किंवा हेमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.   
 23 शोबालाचे पुत्र:  
अलवान, मानहथ, एबाल, शेफो व ओनाम.   
 24 सिबोनाचे पुत्र:  
अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)   
 25 अनाहचा पुत्र:  
दिशोन असून त्याची कन्या ओहोलीबामाह ही होती.   
 26 दिशोनाचे पुत्र:  
हेमदान, एश्बान, इथरान व करान.   
 27 एसराचे पुत्र:  
बिल्हान, जावान व आकान.   
 28 दिशोनाचे पुत्र:  
ऊस व अरान.   
 29 होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही:  
लोटान, शोबाल, सिबोन, अना,   30 दिशोन, एसर व दीशान.   
ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते.  
एदोम देशाचे राजे 
  31 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:   
 32 बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.   
 33 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.   
 34 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.   
 35 हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.   
 36 हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.   
 37 सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला.   
 38 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.   
 39 अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.   
 40 एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता:  
तिम्ना, आल्वा, यतेथ,   
 41 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,   
 42 केनाज, तेमान, मिब्सार,   
 43 मग्दीएल व ईराम.   
हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी बनले. त्यांनी ज्या जागेचा ताबा घेतला होता त्याप्रमाणे.  
हा सर्व एदोमाचा पिता एसावाचा वंश आहे.