स्तोत्र 131
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही,
माझी नजर उन्मत्त नाही;
मला समजत नाही अशा महान
आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
दूध तुटलेले मूल
जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते;
दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.
 
हे इस्राएला, तू देखील शांतपणे,
आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.