स्तोत्र 150
 1 याहवेहचे स्तवन करा.  
त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा;  
त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;   
 2 त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा;  
त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;   
 3 कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा;  
सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;   
 4 डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा;  
तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.   
 5 खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा;  
झणझणणार्या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.   
 6 प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो.  
याहवेहचे स्तवन करा.