पौलाने लिहलेले करिंथकरास पहिले पत्र
पौलनी लिखेल करिंथकरसले पहिलं पत्र
वळख
हाई पत्र प्रेषित पौल यानी येशु ख्रिस्तना जन्मनंतर ५५ सालमा लिखं१:१ पौलनी करिंथकर मंडळीले ज्या दोन पत्र लिखात त्यानापैकी हाई पहिलं पुस्तक. मासेदोनिया प्रांतकडे जातांना अनं परत येतांना जी भेट त्यानी ठरायेल व्हती त्याना पहिले इफिस शहरमा असतांना त्यानी हाई पत्र लिखेल व्हई१६:५-९पौलले करिंथ मंडळीमा चालणारा चुकीन्या चालीरीतीसबद्दल, गटबाजी, व्यभिचार, जारकर्म याबद्दलना अहवाल भेटेल व्हता त्याले उत्तर म्हणीसन त्यानी हाई पत्र लिखं. हाई शहर व्यभिचारकरता प्रसिध्द व्हतं म्हणीसन हाई स्वभावीक व्हतं की हाई समस्या तठला मंडळीमा बी घुसन्यात, करिंथकरसले पहिला पत्रमा एक प्रसिध्द अध्याय जो प्रितीवर आधारीत शे. १३
रूपरेषा
१. पौलनी करिंथकरसले शुभेच्छा अनी त्यानाकरता देवना आभार. १:१-९
२. पौलनी जो अहवाल करिंथना मंडळीसबद्दल ऐका, त्यानं उत्तर. १:१०; ४:२१
३. लैंगिक अनैतीकतानी अडचण अनी एकमेकसले न्यायालयमा खेचनं याबद्दल तो चर्चा करतो. ५–६
४. लगीननी अडचण अनी मुर्तिना नैवेद्य, एकत्र आराधना, आत्माना दानं, पुनरूत्थान यानाद्दल सुचना. ७–१५
५. काही व्यवहारीक अनी वैयक्तीक गोष्टीसले पौलनं उत्तर अनी पत्रना शेवट. १६
1
1 देवनी ईच्छातीन येशु ख्रिस्तना प्रेषित व्हवाकरता बलायेल मी पौल अनं आपला भाऊ सोस्थनेस यांच्याकडून,
2 करिंथ गावमाधला देवनी मंडळीले, म्हणजे ख्रिस्त येशुमा पवित्र करेल अनं पवित्र व्हवाकरता बलायेल एकत्र लोकसले अनी आपला प्रभु येशु ख्रिस्त, म्हणजे त्यासना अनं आपला बी प्रभु, यानं नाव सर्व जागावर लेणारा सर्वासले;
3 देव आपला अनं त्यासना पिता प्रभु येशु यापाईन तुमले कृपा अनं शांती असो.
येशुमा एकत्र व्हवामुये आशिर्वाद
4 ख्रिस्त येशुमा तुमनावर व्हयेल देवना अनुग्रहमूये मी कायम तुमनाबद्दल आपला देवनं उपकारस्मरण करस.
5 यामुये की तुम्हीन येशु ख्रिस्तमा एकत्र व्हवामुये प्रत्येक गोष्टीसमा म्हणजे सर्वकाही बोलामा अनी सर्व ज्ञानमा संपन्न व्हयनात;
6 जसं की ख्रिस्तबद्दलना संदेश तुमनामा भक्कम व्हयना.
7 अस की, आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी प्रकट व्हवानी वाट दखणारा तुम्हीन कोणता बी कृपादानमा कमी पडवुत नही.
8 तो तुमले शेवटपावत भक्कम करी ठी; यामुये की आपला प्रभु येशुना परत येवाना दिनले तुम्हीन निर्दोष ठरशात.
9 तो देव ईश्वसनीय शे. ज्यानी तुमले त्याना पुत्र म्हणजे आमना प्रभु येशु ख्रिस्तना सहभागीतामा बलावं.
ख्रिस्ती मंडळीसमा फुट
10 भाऊ बहिणीसवन, आपला प्रभु येशु ख्रिस्त याना नावतीन मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन सर्वासनी सारखंच बोलाले पाहिजे, म्हणजे तुमनामा फुट पडाले नको, पण तुम्हीन एक मन अनी एकच ईचारतीन ऱ्हावाले पाहिजे.
11 भाऊ बहिणीसवन, तुमनामा भांडणं शेतस अस माले खिया परिवार कडतीन माहीत पडेल शे.
12 मनं सांगनं अस शे की; तुमनामाधला प्रत्येकजण म्हणस, “मी पौलना, मी अपुल्लोसना, मी केफाना अनी मी ख्रिस्तना शिष्य शे.”
13 ख्रिस्तना असा भाग पडेल शेतस का? पौलले तुमनाकरता क्रुसखांबवर खिळेल व्हतं का? पौलना नावतीन तुमना बाप्तिस्मा व्हयना का?
14 क्रिस्प अनं गायस यासना शिवाय मी तुमना मातीन कोणाच बाप्तिस्मा करा नही,
15 हाई यानाकरता व्हयनं की तुमना बाप्तिस्मा मना नावमा व्हयना अस कोणी म्हणाले नको.
16 अनी हो, मी स्तेफनना घरनासना बी बाप्तिस्मा करा; त्यासनाशिवाय मी दुसरासना बाप्तिस्मा करा की नही हाई मना ध्यानमा नही.
17 ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा कराले नही, तर सुवार्ता सांगाले धाडेल शे, पण ख्रिस्तना क्रुसखांबवरलं मरण अनी त्यानं सामर्थ्य वाया जावाले नको म्हणीसन ती मनुष्यनी बुध्दीनी भाषामा सांगाले नही धाडं.
ख्रिस्तनं ज्ञान अनी सामर्थ्य
18 कारण ज्यासना नाश व्हणार शे त्यासनं क्रुसखांबबद्दल शिक्षण मुर्खपण शे; पण ज्यासले तारण प्राप्त व्हई राहीना असा आपलासले ते देवनं सामर्थ्य शे.
19 “मी ज्ञानीसनं ज्ञान नष्ट करसु अनं बुध्दिवानसनी बुध्दी व्यर्थ करसु, असा शास्त्रलेख शे.”
20 या युगना, ज्ञानी, शास्त्री, वाद करनारा कोठे शेतस? देवनी जगनं ज्ञान मुर्खपणनं ठरायं की नही?
21 कारण जग देवना ज्ञानतीन वेढायेल शे तरी या जगनी आपला ज्ञानतीन देवले वळखं नही, तवय देवले हाई चांगलं वाटनं की हाई वार्ताना प्रचारना मुर्खपणतीन ईश्वास ठेवणारा लोकसना उध्दार कराना.
22 कारण यहूदी चिन्ह चमत्कार मांगतस अनी हेल्लेणी ज्ञानना शोध करतस.
23 आम्हीन क्रुसखांबवर खियेल ख्रिस्तले गाजाडतस; हाऊ यहूदी लोकसले अडखळण अनी गैरयहूदी लोकसकरता मुर्खपण शे.
24 पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे.
25 कारण देवना मुर्खपणा मनुष्यसना ज्ञानपेक्षा जास्त ज्ञानवान शे, अनी देवना अशक्तपणा मनुष्यसना शक्तीतीन जास्त शक्तीशाली शे.
26 हे बंधुसवन, तुमले बलायेल शे यानावर ईचार करा, मनुष्यना दृष्टीतीन तुमनामातिन कोणी जास्त बुध्दिमान नही, कोणी जास्त शक्तीशाली नही अनी कोणी मोठा खानदानना नही.
27 तरी ज्ञानीसले लाजाडाकरता ज्यासले जगनी मुर्ख समजा देवनी त्यासले निवाडं अनी शक्तीशालीसले लाजाडाकरता देवनी दुबळासले निवाडं;
28 अनी देवनी असा गोष्टीसले निवड्यात ज्या संसारनी दृष्टीमा काहीच कामना नहीत, धिक्कारेल असासले देवनी यानाकरता निवाडं की ज्या गोष्टी संसारनी दृष्टीमा महत्त्वन्या गोष्टी शेतस त्यासले नष्ट करानं.
29 म्हणीसन देवनी अस करं की, कोणताच प्राणी देवना समोर गर्व कराले नको.
30 पण देवनी आमले येशुमा एकत्र करेल शे, देवनी येशु ख्रिस्तले आमनं ज्ञान बनाडं, आम्हीन त्यानाद्वारा देवसमोर न्यायी ठरनुत, पवित्र, स्वतंत्र बनाडं,
31 यानाकरता की, “जो गर्व करस त्यानी तो प्रभुबद्दल कराले पाहिजे असा शास्त्रलेख शे.”