14
पवित्र आत्माना दानबद्दल जास्त शिक्षण
प्रेमनं अनुकरण कराना प्रयत्न करा; तरी अध्यात्मिक दानसनी अनी देवकडतीन येणारा संदेश देता येवाले पाहिजे यानी मनपाईन ईच्छा धरा. कारण भाषा बोलणारा माणससंगे नही तर देवसंगे बोलस, ते माणुसले समजस नही; तो आत्माघाई गुप्त गोष्टी बोलस, देवकडतीन येणारा संदेश देणारा संदेष्टा हाऊ माणुसले प्रगती, बोध अनं सांत्वन व्हवासारख बोलस. अनोळखी भाषा बोलणारा स्वतःनी प्रगती करस; संदेष्टा मंडळीनी प्रगती करस.
तुम्हीन अनोळखी भाषा बोलाले पाहिजे हाई माले बर वाटस, तरी विशेषकरीन; तुमले देवकडतीन येणारा संदेश देता येवाला पाहिजे अशी मनी ईच्छा शे; कारण; मंडळीना वाढकरता अर्थ नही सांगता जो अनोळखी भाषा बोलस त्यानापेक्षा देवकडतीन येणारा संदेश देणारा संदेष्ठा श्रेष्ठ शे. म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, मी तुमनाकडे ईसन अनोळखी भाषा बोलसु, तर मनाकडतीन तुमले काय फायदा? अनी प्रकटीकरणतीन, विद्यातीन, संदेशतीन किंवा शिक्षणतीन तुमनासंगे बोलावं नही, पावा, विणा, असा आवाज करनारा तसच तुतारी स्पष्ट आवाज काढाव नही तर लढाईले जावानी तयारी कोण करी? त्याप्रमाणे तुम्हीन बी एक आवाजतीन स्पष्ट भाषण नही कर तर जे बोलतस ते कश समजी? तुम्हीन वारासंगे बोलणारा असा व्हशात. 10 जगमा भाषामा बराच प्रकार असतीन, तरी एक बी बिना अर्थनी नही. 11 जर माले कोणतीच भाषाना अर्थ नही माहीत तर मी बोलणारासकरता अनोळखी शे अनी बोलणारा मनाकरता अनोळखी शे. 12 तर ज्या तुम्हीन पवित्र आत्माना दानसबद्दल उतावळा शेतस त्या तुम्हीन, मंडळीना प्रगती करता त्या दान जास्त प्रमाणमा भेटाले पाहिजे म्हणीन प्रयत्न करा.
13 अनोळखी बोलणाराले त्याले अर्थ सांगता येवाले पाहिजे म्हणीन पवित्र आत्माकडे प्रार्थना करा. 14 कारण जर मी अनोळखीमा प्रार्थना करस, तर मना आत्मा प्रार्थना करस, पण मनी बुध्दीना कोणले उपयोग व्हत नही. 15 तर मंग काय? मी प्रार्थना आत्माना सामर्थ्यतीन करसु अनं बुध्दीना सामर्थ्यतीन बी करसु; मी स्तोत्रगान आत्माना सामर्थ्यतीन म्हणसु, अनं बुध्दीना सामर्थ्यतीन बी म्हणसु. 16 तु फक्त आत्मातीन धन्यवाद करा, तर जो अनपड लोकसपैकी शे तो देवना आभारले, आमेन, बोलीन तुमनासंगे सहमत कसा काय राहतीन? 17 तुनं देवनं आभार चांगलं व्हई तरी त्यानाघाई दुसरानी वाढ व्हस नही.
18 तुमना सर्वासपेक्षा मी जास्त अनोळखी भाषा बोलस, म्हणीन मी देवना आभार मानस. 19 तरी बी अनोळखी भाषामा दहा हजार शब्द बोलापेक्षा मी दुसरासले शिकाडाकरता पाच शब्द स्वतः समजीउमजी बोलानं हाई माले आवडस.
20 भाऊसवन अनी बहिणीसवन, दुष्टपणमा बालबुध्दीना मायक व्हा; अनी समजुतदारपणबद्दल मोठं अस व्हा. 21 नियमशास्त्रमा लिखेल शे की, दुसऱ्या भाषा बोलणारा लोकसकडतीन अनं परका माणससना ओठतीन मी या लोकससंगे बोलसु; तरी बी त्या मनं नही ऐकावुत, अस परमेश्वर म्हणस. 22 यामुये ईश्वास ठेवणारासपैकी नही तर ईश्वास नही ठेवणारासपैकी अनोळखी भाषा ह्या चिन्हसकरता शेतस; संदेश हाऊ ईश्वास नही ठेवणारासकरता नही तर ईश्वास ठेवणारासकरता शे.
23 जर सर्वा मंडळ्या एकत्र जमण्यात, अनी सर्व येगळ्या भाषासमा बोलाले लागणात, अनी अनपड किंवा ईश्वास नही ठेवणारा लोके मझार वनात, तर तुम्हीन येडा शेतस, अस त्या सांगाऊ नहीत का? 24 पण जर सर्वाच जण देवकडतीन संदेश देवाले लागणात तर, कोणी ईश्वास नही ठेवणारा किंवा बाहेरना माणुस मझार वना तर तुम्हीन जे काही बोलशात त्यामुये त्याना पाप बद्दल त्याले खात्री व्हई, अनी त्याले समजी की त्याले पक्षतापनी गरज शे. 25 त्याना अंतःकरणमाधल्या गुप्त गोष्टी प्रकट व्हतीन, तवय तो उपडा पडीन देवनी आराधना करी अनी मानी ली की, “खरच देव तुमनामा शे!”
भक्तीमा शिस्त
26 भाऊसवन अनी बहिणीसवन, तर मंग काय? तुम्हीन एकत्र जमतस, तवय तुमनामा कोणाजोडे भक्तीगीत, कोणाजोडे शिक्षण, कोणाजोडे देवकडतीन प्रकटीकरण, कोणाजोडे भाषा, कोणाजोडे तिनी व्याख्या अस ऱ्हावाले पाहिजे; हाई सर्वकाही मंडळीना प्रगती करता ऱ्हावाले पाहिजे. 27 जर कोणी अनोळखी भाषामा पवित्र आत्मातीन बोलस तर दोन किंवा जास्तीत जास्त तिन जणसनी क्रमतीन बोलाले पाहिजे, अनी एकनी अर्थ सांगाले पाहिजे; 28 पण अर्थ सांगणारा नही राहीना तर त्यानी मंडळीमा गप्प ऱ्हावाले पाहिजे; स्वतःसंगे अनं देवसंगे बोलाले पाहिजे. 29 देवना संदेश दोन किंवा तिन जणसनीच संदेश देवाले पाहिजे, अनी दुसरासनी निर्णय कराले पाहिजे. 30 तरी बठेल बाकीनासपैकी कोणले जर देवना संदेश प्रकट व्हयना, तर बोलनारासनी गप्पच ऱ्हावानं. 31 सर्वासले शिक्षण मिळी अनं सर्वासले बोध व्हई अस तुमले सर्वासले एकमांगीन एक संदेश देता ई. 32 परमेश्वर कडतीन संदेश देनारा संदेष्टासना आत्मा त्याना स्वतःना स्वाधीन राहतस. 33 कारण देव अव्यवस्थाना नही, तर शांतीना शे; तसच तो पवित्र लोकसना सर्व मंडळीसमा शे. 34 बाईसनी मंडळीना सभामा शांतच ऱ्हावाले पाहिजे; त्यासले बोलनी परवानगी नही; नियमशास्त्र बी सांगस त्यानाप्रमाणे त्यासनी नियममा ऱ्हावानं. 35 त्यासले काही माहीती करी लेवानी ईच्छा राहीनी तर त्यासनी आपला नवरासले घर ईचारानं; बाईनी मंडळीमा बोलणं हाई योग्य नही.
36 देवनं वचन तुमनापाईन चालु व्हयनं का? का ते फक्त तुमनाकडे वनं? 37 जर कोणी स्वतःले संदेष्टा किंवा अध्यात्मिक दान प्राप्त व्हयेल असा मानस, तर जे मी तुमले लिखेल ती प्रभुनी आज्ञा शे अस त्यानी समजाले पाहिजे; 38 पण कोणी याले नही मानस तर त्याले बी कोणी मानाले नको. 39 यामुये भाऊसवन अनी बहिणीसवन, भाऊसवन तुम्हीन देवनाकडतीन संदेश देवानी मनपाईन ईच्छा धरा अनं अनोळखी भाषा बोलानं मना करू नका. 40 सर्वकाही शोभी अस अनं व्यवस्थीत व्हऊ द्या.