7
लगीनबद्दल प्रश्न
आते त्या गोष्टीसबद्दल ज्या तुम्हीन माले लिखेल शेतस. माणुसनी बाईले हात लावाले नको हाई त्यानाकरता चांगलं शे. व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे. नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको. तरी मी हाई परवानगी दिसन सांगी राहीनु आज्ञा दिसन नही. मी जसं शे तस सर्वासनी ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे; तरी प्रत्येकले ज्यानं त्यानं कृपादान देवपाईन मिळेल शे, एकले एक प्रकारनं अनं दुसराले दुसरा प्रकारनं. ज्या बिन लगीन व्हयेल शेतस अनं ज्या विधवा शेतस त्यासले मी सांगस, की, तुम्हीन मनामायक राहीनात तर ते तुमनासाठे चांगलं शे; पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
10 लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. 11 सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
12 बाकिनासले प्रभु नही मी सांगस, जर एखादा भाऊले ईश्वासहिन बायको शे, अनी ती त्यानासंगे नांदाले तयार शे, तर त्यानी तिले सोडानं नही. 13 ज्या बाईले अईश्वासु नवरा शे तो जर तिनासंगे ऱ्हावाले तयार शे, तर तिनी त्याले सोडानं नही. 14 कारण बायकोकडतीन अईश्वासु नवरा पवित्र व्हयेल शे, अनी नवराकडतीन बिनईश्वासु बायको पवित्र व्हयेल शे; अस नसतं तर तुमना पोऱ्यासोऱ्या अशुध्द राहतात; पण आते त्या पवित्र शेतस. 15 जर अईश्वासु व्यक्तीनी वेगळी व्हवानी ईच्छा शे त्यानी वेगळं होऊ द्या, असा परिस्थीतिमा भाऊ किंवा बहिण बांधेल नही शेतस, पण देवनी आपलाले शांतीमा ऱ्हावाले बलायेल शे. 16 हे पत्नी, तु तुना नवराले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का? हे पती, तु तुनी पत्नीले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का?
देवनी सांगेल प्रमाणे जगानं
17 तर जश प्रत्येकले प्रभुनी वाटी देयल शे, जश प्रत्येकले देवनी बलायेल शे, तस त्यानी चालाले पाहिजे अनी सर्व मंडळीसले मी हाईच आज्ञा देस. 18 सुंता व्हयेल माणुसले जर पाचारण व्हयनं तर त्यानी बेसुंतीसनामायक वागाले नको; एखादा बेसुंती माणुसले पाचारण व्हयनं तर त्यानी सुंता करी लेवाले नको. 19 सुंता काहीच नही अनं बेसुंता बी काही नही, तर देवन्या आज्ञा पाळा हाईच काय ते सर्व शे. 20 तुमले ज्या परिस्थीतीमा देवनी बलायेल शे, त्याच स्थितीमा ऱ्हा. 21 जर तु सेवक व्हता तवय तुले बलायेल शे का? त्यानी चिंता करू नको; पण तुले जर स्वतंत्र व्हता ई, तर व्हई जा. 22 कारण दास राहीसन बी ज्याले प्रभुमा पाचारण व्हयनं, तो गुलामगिरीमातीन मोकळा व्हयेल देवना माणुस शे; तसच मोकळ असतांना ज्याले पाचारण व्हयनं; तो ख्रिस्तना दास शे. 23 तुम्हीन किंमत दिसन विकत लेयल शे, तुम्हीन मनुष्यना सेवक होऊ नका. 24 बंधुसवन, ज्या परिस्थीतिमा तुमले प्रत्येकले बलायेल शे, त्याच परिस्थीतिमा तुम्हीन देवजवळ ऱ्हा.
बिन लगीन व्हयेल अनी विधवा
25 आते कुवारीसबद्दल माले प्रभुकडतीन माले आज्ञा भेटनी नही, पण प्रभुना दयातीन ईश्वासु ऱ्हावामुये मी मनं मत सांगस. 26 ते अस की, आतेनी परिस्थीतिमा माणुसकरता हाई चांगले शे की, जो ज्या स्थितीमा शे, त्यानी त्याच स्थितीमा ऱ्हावाले पाहिजे. 27 तु बायकोले बांधेल शे का? बांधेल शे तर मोकळा व्हवाले दखु नको; बायकोपाईन मोकळा शे का? मोकळा शे तर बायको कराले दखु नको. 28 पण तु जर लगीन करस तर पाप नही करस; अनी जर कुवारी लगीन करस तर पाप नही करस. तरी बी असासले ह्या जिवनमा कष्ट व्हई अनी तुमनं रक्षण व्हवाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे.
29 भाऊसवन, मी हाईच म्हणस; येळ कमी करामा येल शे, याकरता की आतेपाईन ज्यासले बायका शेतस, त्यासनी अस ऱ्हावाले पाहिजे जश त्यासले बायको नही; 30 ज्या रडतस त्यासनी रडतस नही, ज्या आनंद करतस त्यासनी आनंद नही करतस; ज्या विकत लेतस त्यासनी आपलाजोडे काहीच नही; 31 अनं ज्या जगना उपयोग करतस त्यासनी आपण त्याना उपयोग नही करतस अस ऱ्हावाले पाहिजे; कारण या जगनं रूपांतर व्हई राहीनं.
32 तुम्हीन निश्चित ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे, बिन लगीन व्हयेल माणुस, प्रभुले कश खूश करानं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस. 33 पण लगीन व्हयेल माणुस, आपली बायकोले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करस; 34 लगीन व्हयेल अनं बिन लगीन व्हयेल बाई यासनामा बी फरक शे. बिन लगीन व्हयेल ऱ्हास ती शरीरतिन अनं आत्मातीन बी कश पवित्र व्हवाणं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस; पण लगीन व्हयेल ऱ्हास ती आपण आपला नवराले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करतस.
35 हाई मी तुमना चांगला करता सांगस; तुमनावर फास टाकाकरता नही, तर तुमना हातघाई उत्तम तेच व्हवाले पाहिजे अनं प्रभुनी सेवा एकचित्ततीन व्हवाले पाहिजे.
36 जर कोणले अस वाटस की, तो त्याना कुवारी पोरना अपमाननं कारण व्हई राहीना, ती उपवर व्हयेल शे अनी तसा अगत्यच शे, तर जशी ईच्छा व्हई तसं त्यानी करानं, तो पाप करस नही, त्यानी लगीन करी लेवानं. 37 पण ज्यानी कुवारीसंगे लगीन नही कराना निर्णय लियेल शे, ज्याले कसानी बळजबरी नही अनं ज्यानी ईच्छावर सत्ता शे अनी अस ज्यानी मनमा ठरायेल शे तो चांगलं करस. 38 म्हणीसन जो कुवारी पोरंन लगीन करी देस तो चांगला करस, पण लगीन करी देस नही तो अधिक चांगला करस. 39 नवरा जिवत शे तोपर्यंत बायको बांधेल शे; नवरा मरानंतर तिनी ईच्छा शे त्यानाबरोबर, पण फक्त प्रभुमा लगीन कराले मोकळी शे; 40 जर ती लगीन न करता तशीच ऱ्हायनी तर मना ईचारतीन ती जास्त सुखी राही; अनी माले वाटस, देवना आत्मा मनामा बी शे.
7:10 मत्तय ५:३२; १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८