9
प्रेषितसना अधिकार अनी काम
1 मी मोकळा नही शे का? मी प्रेषित नही शे का? आपला प्रभु येशु याले मी दखं नही का? प्रभुमा मना कामनं प्रतिफळ तुम्हीन नही शेतस का?
2 जर मी दुसरासकरता प्रेषित नही पण तुमनाकरता तर शे; कारण तुमनी प्रभुमा एकता हाईच मना प्रेषितपणानं प्रमाण शे.
3 मनी चौकशी करनारासले मनं हाईच उत्तर शे.
4 आमले कष्ट करीसन खावापेवाणा अधिकार नही का?
5 दुसरा प्रेषित, प्रभुना भाऊ अनं केफा यानाप्रमाणतीन आमले बी ईश्वासु बहिणले पत्नी करीसन सोबत लई जावाना हक्क नही काय?
6 मी अनं बर्णबाचं आम्हीनच कामधंदा करीसन खावानं का?
7 आपला पैसा खर्च करीसन सैन्यमा सेवा करस, असा कोण शे? द्राक्षमया लाईन त्यानं फळ खास नही अस कोण शे? असा कोण शे, जो मेंढरं पाळस अनं त्यासनं दुध पेस नही?
8 मी माणुसना रितप्रमाणे हाई बोलस का? नियमशास्त्र बी अस नही सांगस का?
9 मोशेना नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, “बैल मळणी करस तवय त्याले त्यानं तोंड नही बांधाणं” काय देवले फक्त बैलसनीच चिंता शे का?
10 का तो सर्वकाही आपलाकरताच सांगस; हा, आमनाकरताच लिखेल व्हतं; असा अर्थतीन की जो नांगरस त्यानी आशा धरीन नांगराणं, अनी जो कापणी करस त्यानी ती, त्यामातीन वाटा भेटी ह्या आशातीन कराले पाहिजे.
11 आम्हीन तुमनाकरता अध्यात्मिक वस्तुसनी पेरणी करेल शे, तर आम्हीन तुमना जगीक वस्तुसनी कापणी करी तर त्यानामा काय मोठी गोष्ट शे?
12 जर तुमनावर दुसरा लोक अधिकार गाजाडतस तर काय तुमनावर आमना अजुन अधिकार नही? तरी बी आम्हीन ह्या अधिकारना वापर नही करा, पण ख्रिस्तना सुवार्ताले काही अडचण येवाले नको म्हणीन आम्हीन सर्वकाही सहन करतस.
13 मंदिरमा सेवा करनारा मंदिरमाधल खातस अनी वेदीजोडे सेवा करनारा वेदीवर जे अर्पण करेल शे त्याना भागीदार व्हतस हाई तुमले माहीत नही का?
14 याप्रमाणे देवनी आज्ञा करेल शे की, ज्या सुवार्ता सांगतस त्यासनी सुवार्तावर आपलं जिवन जगानं.
15 मी यातीन कोणताच अधिकारना वापर करेल नही अनं यानाप्रमानं माले भेटाले पाहिजे म्हणीसन मी हाई लिखं नही कारण हाऊ स्वाभिमान कोणी व्यर्थ करी यानांपेक्षा मी मरी जायेल हाई बरं.
16 जर मी सुवार्ता सांगस तर माले गर्व करानं कारण नही; ती सांगानं माले आज्ञा प्राप्त शे, मी सुवार्ता सांगस नही तर मना धिक्कार असो.
17 मी हाई मना ईच्छातीन करस तर माले वेतन मिळी, अनी मी कर्तव्य म्हणीसन करस, कारण माले देवनी कारभार सोपेल शे.
18 तर मंग मनं वेतन काय? हाईच की मी सुवार्ता फुकट सांगाले पाहिजे अनी सुवार्ताबद्दल जो मना अधिकार शे तो मी पुरा वापराले नको.
19 मी सर्वासपाईन मोकळा व्हतु तरी जास्त लोकसले देवना राज्यमा आनाकरता मी स्वतःले दुसरासना दास बनाडी लेयल शे.
20 यहूदी लोक मिळावाकरता मी यहूदी लोकसले यहूदी लोकसमायक व्हयनु; मोशेना नियमशास्त्रले अधीन नव्हतु तरी नियमशास्त्र अधीन असा व्हयनु.
21 ज्यासले नियमशास्त्र नही असा गैरयहूदीसले मिळाडाकरता असासले मी नियमशास्त्र नही असा व्हयेल शे तरी देवना नियमशास्त्र बाहेर व्हतु असा व्हयनु नही, मी ख्रिस्तना नियममा व्हतु
22 दुर्बळ लोकसले मिळावाकरता मी दुर्बळसले दुर्बळ व्हयनु. मी सर्वासकरता सर्वकाही व्हयनु, याकरता की, कश तरी बराच लोकसनं तारण कराले पाहिजे.
23 मी सर्वकाही सुवार्ताकरता करस, याकरता की मी दुसराससंगे तिना भाग व्हवाले पाहिजे.
24 शर्यतमा पयणारा सर्वाच पयतस, पण एकलेच बक्षीस मिळस हाई तुमले माहीत नही का? तुमले ते मिळी अस पळा.
25 स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण अविनाशी बक्षीस मिळडाकरता करतस.
26 मी पण तसाच पयस, म्हणजे अनिश्चीतपणातीन मी धावत नही. तशी कुस्तीपण करस, म्हणजे वारावर मी बुक्क्या मारस नही.
27 तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.