7
1 मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
पौलना आनंद
2 तुम्हीन आपला मनमा आमले जागा द्या, आम्हीन कोनावर अन्याय करेल नही, कोणले बिगाडं नही, कोणले फसाडेल नही.
3 तुमले दोषी ठरावाकरता मी हाई सांगस नही; कारण मी पहिले सांगेल शे की, तुमनासंगे मरानं अनी तुमनासंगे जगानं.
4 माले तुमना मोठा भरवसा शे; माले तुमना भलताच अभिमान शे; मी दिलासाघाई भरेल शे; आमना सर्व संकटसमा माले आनंदना भरती येल शे.
5 आम्हीन मासेदोनियामा वनुत तवय बी आमना शरिरले स्वस्तपणा नव्हता. तर आम्हीन चारीमेरतीन संकटमा व्हतुत; बाहेर भांडनतंटा, मजारमा भितीन्या गोष्टी व्हत्यात.
6 तवय दुःखी लोकसनं समाधान करनारा देवनी, तिताना येवामुये आमनं समाधान करं.
7 अनी फक्त त्याना येवामुये नही, तर तुमनी ईच्छा, तुमना शोक, तुमनी मना बद्दलना ईश्वास, ह्यानाबद्दल आमले सांगतस तवय, तुमना बद्दलना त्यासनं जे समाधान व्हयनं त्यानं योगतीन आमनं समाधान व्हईसन माले विशेष आनंद मिळेल शे.
8 मी तुमले मना पत्रमुये दुःख दिधं, याना माले वाईट वाटी नही राहीनं, माले वाईट वाटनं व्हतं खरं; कारण त्या पत्रमुये तुमले थोडा येळ तरी दुःख व्हयन व्हई अस माले समजस.
9 तरी मी आते आनंद करस; तुमले दुःख व्हयनं यानामुये नही तर तुमनं पश्चताप व्हवाकरता दुःख व्हयनं; कारण देवना योजना प्रमानेच तुमना दुःखना हाऊ प्रकार व्हता; आमना हाततीन कोनत्या बी गोष्टीसमा तुमनं नुकसान व्हवाले नको, म्हणीसन अस व्हयनं.
10 जे दुःख देव आनस, तारण देनारा पश्चताप तयार करस; त्यानापाईन पस्तावा व्हस नही; पण संसारिक व्हनार दुःख मरण तयार करस.
11 कारण दखा, देवना योजनाप्रमाने तुमना दुःखना प्रकार व्हता; याच प्रकारना गोष्टिसनी तुमले केवढी कळकळ, स्वतःले वाचाडानी ईच्छा, संताप, भय, उत्कंठा, आस्था, शिक्षा करानी बुध्दी हाई तयार व्हयेल शे! या काममा तुम्हीन सर्व प्रकारे निर्दोष शेतस, ह्यानं प्रमाण तुम्हीन पटाडी देयल शे.
12 मी तुमले लिखेल शे की, ज्यानी अन्याय करा त्यानाकरता नही अनी ज्याना अन्याय व्हयना त्यानाकरता बी नही, तर आमना विषयी तुम्हीन दखाडी राहीनात. त्या कळकळनी जाणीव देवना समोर तुमले व्हवाले पाहिजे म्हणीसन पत्र लिखेल शे.
13 यामुये आमले दिलासा मिळेल शे; तर आमले समाधान मिळनं इतलंच नही तर; विशेष करीसन तिताना आनंदमुये आमले भलता आनंद व्हयना; तुमना सर्वासकडतिन त्याना आत्माले आनंद व्हयेल शे.
14 मी त्यानाजोडे तुमना विषयमा कोणता बी अभिमान करा तरी त्यामुये माले लाज वाटनी असं काही व्हयनं नही; तर आम्हीन तुमनासंगे सर्व गोष्टी खरा पनतिन बोलनुत. तरी त्याना सारखंच तिताजोडे आम्हीन अभिमानतीन करेल भाषण खरं ठरनं;
15 तुम्हीन त्यानं स्वागत भ्यात भ्यात अनी थरथर करीसन करं, तुम्हीन त्यान्या सर्व आज्ञा पाळाकरता तयार व्हयनात तर त्यानं प्रेम तुमनाकरता जास्त वाढी.
16 मी आनंदीत शे की, मी तुमनावर सर्व गोष्टीसवर भरोसा करू शकस.