4
1 आते मी हाई सांगस की, वारीस जोपावत बाळ शे तोपावत तो सर्वासना धनी राहिसन बी त्यानामा अनं नोकरमा काही भेद ऱ्हास नही.
2 पण बापनी ठरायेल मुदतपावत तो पालकसना अनं कारभारीसना स्वाधीन ऱ्हास.
3 तसच आपण बी बाळ व्हतुत तवय जगमातील प्राथमिक शिक्षणना दास्यमा व्हतुत.
4 परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता.
5 ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे.
6 तुम्हीन देवना पोऱ्या अनी पोरी शेतस, म्हणीन देवनी अब्बा, बाप्पा, अशी हाक मारणारा आपला पोऱ्याना आत्माले तुमना आमना अंतःकरणमा धाडेल शे.
7 म्हणीन तुम्हीन आतेपाईन नोकर नहीत तर पोर अनी पोऱ्या शेतस; अनी पोर अनी पोऱ्या शे म्हणीन तर देवनाद्वारा वारीस बी शेतस.
गलती शहरना लोकसबद्दल पौलनी चिंता
8 सुरवातले तुम्हीन देवले वळखत नव्हतात, तवय जे वास्तवमा देव नहीत त्यासना तुम्हीन नोकर व्हतात.
9 पण आते तुम्हीन देवले वळखतस, अनी देवनी तुमनी वळख करी लियेल शे; तर मंग दुर्बळ अनं निसत्व अस प्राथमिक शिक्षणकडे परत कसं वळतस? त्यासना गुलाम व्हवानं ईच्छा का नविनतीन करतस?
10 काही खास वार, महिना, सणना काळ, अनं वरीस हाई तुम्हीन पाळतस.
11 तुमनाकरता मी करेल श्रम कदाचित व्यर्थ व्हयना व्हतीन, अस माले तुमनाबद्दल भिती वाटस.
12 भाऊ अनी बहिणीसवन, मी तुमले ईनंती करस की, जशा मी शे तसा तुम्हीन बी व्हा, कारण जशा तुम्हीन व्हतात तसा मी पण व्हतु. तुम्हीन मना काही वाईट करेल नही.
13 तुमले सुवार्ता सांगानी पहिला प्रसंग माले मना शारिरीक व्याधीमुये मिळना हाई तुमले ठाऊक शे.
14 अनी तुमनी परिक्षा व्हवाएवढी मनी प्रकृतीमा जे व्हतं त्याना तुम्हीन धिक्कार अथवा कंटाळा करा नही, तर देवना दूतनामायक, ख्रिस्त येशुनामायक, मना स्विकार करा.
15 तवयनी तुमनी ती धन्यता कोठे शे? मी तुमनाबद्दल साक्ष देस की, शक्य राहिनं तर तुम्हीन आपला डोया उपटीसन त्या माले दि टाकतात.
16 मंग मी तुमले खरं ते सांगस, म्हणीन मी तुमना वैरी व्हयनु शे का?
17 त्या लोके तुमले मित्र मिळायाकरता धडपड करतस पण ते शुध्द हेतुतीन नही; तर तुम्हीन त्यासले मित्र मियाडा करता धडपड कराले पाहिजे म्हणीन त्या तुमले वेगळा ठेवाले दखतस.
18 तुमले योग्य बाबतमा मित्र मियाडी लेवाकरता सर्वदा धडपड कराले पाहिजे हाई चांगले शे, अनी हाई फक्त मी तुमना जोडे शे तवयच कराले पाहिजे अस नही.
19 मना पोऱ्यासवन, तुमनामा ख्रिस्तना स्वरूप निर्माण व्हस तोपावत माले परत तुमनाबद्दल प्रसूतीवेदना व्हई राहिना शेतस.
20 या येळले मी तुमनासोबत हजर ऱ्हातु अनं मना स्वर बदलीसन तुमनासंगे बातचीत करता येतात तर माले बरं वाटतं, कारण तुमनासंबधी मी बुचकळमा पडनु शे.
सारा अनी हागारनं दृष्टांत
21 ज्या तुम्हीन नियमशास्त्रनाधीन व्हवाले दखतस त्या तुम्हीन नियमशास्त्र ऐकतस नही का, हाई माले सांगा.
22 कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, अब्राहामले दोन पोऱ्या व्हतात, एक दासीपाईन व्हयेल अनं एक स्वतंत्र स्त्रीपाईन व्हयेल.
23 तरी दासीपाईन व्हयेल शरिरस्वभावनुसार जन्मना अनी स्वतंत्र स्त्रीपाईन व्हयेल वचननामुये जन्मना.
24 ह्या गोष्टी दृष्टांतरूप शेतस, त्या स्त्री म्हणजे दोन करार शेतस; एक सिनाय पर्वतवरीन करेल; तो गुलामगिरीकरता पोऱ्यासले जन्म देनारा करार, म्हणजे हागार शे.
25 हागार हाई अरबस्तानामधलं सिनाय पर्वत शे, अनी ती आजनी यरूशलेमनी जोडीनी शे; ती आपला पोऱ्यासोऱ्यानासंगे गुलामगिरीमा शे.
26 वर असेल यरूशलेम हाई स्वतंत्र ऱ्हाईन ती आपली माय शे.
27 शास्त्रमा असं लिखेल शे की, अगं वंध्ये तुले पोऱ्या नही ऱ्हाइनात तरी आनंद कर! ज्या तुले प्रसुतिवेदना व्हस नही ती तु आनंदमा जयघोष कर! आनंदमा वरड! कारण जिले नवरा शे तिना पोऱ्यापेक्षा आशा सोडेल स्त्रीना पोऱ्या पुष्कळ शेतस.
जुनं करारमाधलं दृष्टांत
28 भाऊ अनी बहिणीसवन, इसहाकाप्रमाणे तुम्हीन अभिवचनना संतती शेतस.
29 परंतु त्या येळले शरिरना स्वभावनुसार जन्मेल पोऱ्यानी आत्मानानुसार जन्मेल पोऱ्यासना छळ करात, तस आते बी व्हई ऱ्हाईना शे.
30 पण शास्त्रलेख काय सांगसं? “त्या दासीले अनं तिना पोऱ्याले हकली दे; कारण दासीना पोऱ्या स्वतंत्र स्त्रीना पोऱ्यासोबत वारीस व्हवावं नही.”
31 म्हणीन भाऊ अनी बहिणीसवन, आपण दासीना पोऱ्या नही शेतस, तर स्वतंत्र स्त्रीना पोऱ्या शेतस.