6
एकमेकसनं वझ उचलनं
1 भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे.
2 एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात.
3 कारण आपण काहीच नही राहीसन बी कोणी तरी शेतस अस कल्पना करनारा स्वतःलेच फसाडस.
4 तर प्रत्येकनी आपला स्वतःना कामनी परिक्षा करानी म्हणजे त्याले दुसरानाबद्ल नही, तर फक्त स्वतःना बद्दल अभिमान बाळगाकरता जागा भेटी.
5 कारण प्रत्येकनी आपला स्वतःना भार वाहाले पाहिजे.
6 ज्याले वचनना शिक्षण भेटेल शे त्यानी ते शिक्षण देनाराले सर्व चांगला वस्तुसना वाटा देवानं.
7 फसु नका; देवले कोणी मुर्ख बनाडू शकस नही; कारण माणुस ज्या काही पेरस त्यानाच पिक त्याले भेटी.
8 जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.
9 चांगला करानं ते आपण कटाळा करानं नही; कारण आपण जर खचनुत नहीत तर योग्य येळले आपला पदरमा पिक पडी.
10 तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.
शेवटली सुचना अनी सलाम
11 दखा, मी आपला हातघाई कितला मोठा अक्षरसघाई तुमले लिखी ऱ्हायनु शे.
12 जेवढा दैहिक गोष्टीसना डौल मिरवाले दखतस, तेवढा ख्रिस्तना क्रुसखांबमुये स्वतःना छळ व्हवाले नको म्हणीसन त्या तुमले सुंता करी लेवाले भाग पाडतस;
13 कारण सुंता करी लेनारा स्वतःबी नियमशास्त्र पाळतस नही, तर तुमना शरिरवरीन नावाजीसन लेवाकरता तुमनी सुंता व्हवाले पाहिजे अशी ईच्छा धरतस.
14 आपला प्रभु येशु ख्रिस्त याना क्रुसखांबना अभिमानाशिवाय कशाना बी अभिमान बाळगाना मना हाततीन नको व्हवाले; त्यानाद्वारा जग मनाकरता अनी मी जगकरता क्रुसखांबवर खिळेल शे.
15 कारण सुंता व्हवामा किंवा नही व्हवामा काहीच नही, तर नवी उत्पत्ति हाईच ती शे.
16 जेवढा ह्या नियमतीन वागतीन तितलासवर अनं देवना लोकसवर शांती अनं दया असो.
17 पत्रले सरावाना पहिले मी तुमले ईनंती करस की, ह्यानापुढे कोणी माले त्रास नही देवो; कारण मी पहिलेच मना शरिरवर ज्या येशुना घाव शेतस त्या दखाडतस की, मी त्याना दास शे.
18 भाऊ अनं बहिणीसवन, आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानी कृपा तुमनासंगे राहो. आमेन.