45
योसेफ त्याना भाऊसले वळख देस
तवय योसेफना आजुबाजूले लोके उभा व्हतात त्यासनासमोर त्याले स्वताले रोकता वना नही; तो मोठा आवाजमा बोलना, की, सर्वा लोकसले बाहेर काढी द्या, मंग योसेफनी आपला भाऊसले वळख दिधी तवय त्यानाजोडे दुसरा कोणी बी नव्हतं. तवय तो इतलं जोरजोरमा रडाले लागना की, ते मिसरी लोकसनी आयकं, अनी फारोना घरनासना बी यानाबद्दल आयकं. तवय योसेफ आपला भाऊसले बोलना, मी योसेफ शे! मना बाप अजून जिवत शे का? त्याना भाऊसना तोंडतीन काही उत्तर निंघना नही, कारण त्यानापुढे सर्वा घाबरी जायेल व्हतात. योसेफ त्याना भाऊसले बोलना, मनाजोडे या; तवय त्या जोडे गयात, तवय तो त्यासले बोलना, तुमना भाऊ मी योसेफ शे, ज्याले तुम्हीन मिसर देशमा ईकी टाकं व्हतं, तो मीच शे. तुम्हीन माले हाई देशमा ईकी टाकं यानाबद्दल आते काही दु:ख करानं नही; अनी संताप करी लेवानं नही, कारण तुमना जीव वाचाडवा म्हणीन देवनी माले तुमनापुढं धाडेल शे. हाऊ देशमा अजून दोन वरीस दुष्काळ पडाव शे; अनी आखो पाच वरीस अशच येवाव शेतस की, त्यामा नांगराणी अनं कापणी काहीच व्हवाव नही. देवनी माले तुमनापुढे यानाकरता धाडं की, पृथ्वीवर तुमना वंशजना सांभाळ व्हवाले पहिजे, अनी मोठी सुटका करीसन तुमना जिव वाचाडाले पाहिजे. म्हणीन आते माले आठे धाडनारा तुम्हीन नहीत तर देव शे, अनी माले त्यानी फारोना बापना समान करीन त्याना सर्वा घरदारना मालक अनी सर्वा मिसर देशना शासक बनाडी ठेयेल शे.
तुम्हीन लवकर उठीन मना बापकडे जावा अनी त्याले सांगां, तुमना पोऱ्या योसेफ अश सांगस की, देवनी माले सर्वा मिसर देशना सत्ताधीस बनाडेल शे, तर मनाकडे लवकर निंघी या उशीर करानं नही. 10 तुम्हीन गोशेन प्रांतमा वस्ती करीन रावानं; तुम्हीन तुमना पोऱ्यासोऱ्या, नातवंडं, शेरडंमेंढरं, गुरंढोरं अनं तुमना सर्वा काही लिसन मनाजोडे रावानं. 11 कारण अजून पाच वरीस दुष्काळ पडनार शे, अनी तुमले लागनारं सर्वा वस्तु मी तुमले पुरावसु; अशमा तुम्हीन, तुमना घरना लोके, अनं तुमना सर्वा परीवार भुका मरावुत नही. 12 दखा, मी योसेफ तुमनासंगे प्रत्यक्ष बोली राहिनु शे, हाई तुमना डोळासले अनी मना भाऊ बन्यामिनले बी दखाय राहिना शे. 13 मिसर देशमाधलं मना सर्वा वैभव तुम्हीन दखेल शे, हाई मना बापले जाईसन सांगा, अनी मना बापले लवकर आठे लई या. 14 तो आपला भाऊ बन्यामिन याना गळामा पडीसन रडना, अनी बन्यामिन बी त्याना गळामा पडीन रडना. 15 मंग तो सर्वा भाऊसना मुका लिसन त्यासना गळामा पडीन तो रडना; तवय त्याना भाऊ त्यानासोबत बोलाले लागनात.
16 योसेफना भाऊ येल शेतस अशी बातमी फारोना राजवाडामा पोहचनी, ती ऐकीन फारोले अनं त्याना चाकरंसले आनंद व्हयना. 17 फारो योसेफले बोलना, तू तुना भाऊसले सांग, एक काम करा की, आपला जनावरं लादीसन निंघा अनं कनान देशमा जावा. 18 अनी आपला बाप अनं आपला पोऱ्यासोऱ्या लिसन मनाजोडे या, मिसर देशनी जी सर्वासमा चांगली जागा ती तुमले दिसु अनी तुमले हाई देशमाधलं उत्तम पदार्थ खावाले भेटतीन. 19 आते तुले सांगस की, त्यासले सांग, एवढं काम करा, आपला बायका पोऱ्यासकरता मिसर देशमाईन गाड्या लई जावा, अनी आपला बापले बी लई या. 20 आपला मालमत्ता बद्ल चिंता करानं नही, कारण मिसर देशनी जी बी चांगली जमीन शे, ती तुमनी शे.
21 याकोबना पोऱ्यासनी तसंच करं; अनी फारोना हुकूमप्रमाणे योसेफनी त्यासले गाड्या अनं प्रवासकरता भोजन वस्तु दिधं. 22 त्यानी प्रत्येकले एक एक नवा कपडा दिधा अनी बन्यामिनले तीनशे रूपये अनी पाच नवा कपडा दिधात. 23 तसंच त्यानी आपला बापकरता मिसर देशमाधलं उत्तम पदार्थ लादेल दहा गाढवं अनी धान्य, भाकरी अनं प्रवासकरता बाकीना अन्नधान्य लादेल दहा गाढवी धाडात. 24 अश प्रकारं त्यानी आपला भाऊसले निरोप देवावर त्या प्रवासमा निंघनात; त्या जावाले लागनात तवय तो त्यासले बोलना, प्रवासमा भांडण करानं नही. 25 त्या मिसर देशमाईन निंघीसन कनान देशमा आपला बाप याकोब यानाजोडे पोहचनात. 26 योसेफ अजून जिवत शे, सर्वा मिसर देशमा त्यानी सत्ता शे अश त्यासनी त्याले सांगं, तवय तो गप्पच राहिना, कारण त्यासनी सांगेल गोष्टवर त्यानं ईश्वास बशी नही राहिंता. 27 मंग योसेफनी त्यासले सांगेल व्हतं ते सर्वा त्यासनी त्याले सांगात; अनी त्यासना बाप याकोब याले आणाकरता योसेफनी धाडेल गाड्या दखात तवय त्याना जीवमा जीव वना. 28 अनी याकोब बोलना, पुरं व्हयना, मना पोऱ्या योसेफ अजून बी जिवत शे, मी मराना पहिले जाईसन त्याले दखसु.
45:1 प्रेषित 7:13 45:9 प्रेषित 7:14