2
ख्रिस्त आमना मदतगार
अहो मना पोऱ्यासवन, तुम्हीन पाप कराले नको म्हणीसन हाई पत्र तुमले लिखी राहिनु. जर कोणी पाप करं, तर नितीसंपन्न असा जो येशु ख्रिस्त तो पितानाजोडे आपला मदतगार शे, अनी तोच आपला पापसनी क्षमा करस; फक्त आपलाच पापसबद्दल नही तर सर्व जगना बी पापबद्ल शे.
आपण जर त्याना आज्ञा पाळसुत तर त्यावरतीन आपले समजी जाई की, आपण त्याले समजी लिधं. मी त्याले वळखस अस म्हणीसन जो त्याना आज्ञा पाळस नही तो लबाड शे, अनी सत्य त्यानामा नही शे. जो कोणी त्याना वचनप्रमाणे चालस, त्यानामा देवनी प्रिती खरच पुर्ण व्हयेल शे. यानावरतीन आपले समजी जाई की, आपण त्यानामा एक शेतस. मी त्यानामा ऱ्हास, अस जो सांगस त्यानी येशु ख्रिस्त जसं चालना तसा स्वतः बी चालाले पाहिजे.
नवी आज्ञा
मना प्रिय लोकसवन, मी तुमनाकरता नवी आज्ञा लिखस नही; तर जी आज्ञा सुरवात पाईन तुमले देवामा येल शे तिच जुनी आज्ञा लिखस; जे वचन तुम्हीन ऐकं तीच ती जुनी आज्ञा शे. मी तुमले एक प्रकारे नवी आज्ञा लिखस. ती ख्रिस्तमा अनं तुमनाबाबतमा खरच तसच शे; कारण अंधार आते नष्ट व्हई ऱ्हायना, अनं खरा प्रकाश आते चमकाले लागेल शे. मी प्रकाशमान शे अस म्हणीसन जो आपला भाऊ अनी बहिणीसना व्देष करस तो अजुन अंधारमाच शे. 10 आपला बंधुवर प्रिती करनारा प्रकाशमा ऱ्हास, अनी तो दुसरासकरता अडखळण व्हस नही; 11 पण जो आपला बंधुना व्देष करनारा शे तो अंधारमा शे अनं अंधारमाच चालस; तो कोठे चाली राहिना हाई त्यानं त्यालेच समजस नही, कारण अंधारनी त्याना डोया आंधया करेल शेतस.
12 पोऱ्यासवन, मी तुमले लिखस, कारण त्याना नावमुये तुमना पापसनी तुमले क्षमा व्हयेल शे. 13 बापसवन, मी तुमले लिखस, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस तरूणसवन, मी तुमले लिखस, कारण जो दुष्ट शे त्याले तुम्हीन हरायेल शे. 14 पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.
15 जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे. 16 कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस; 17 जग अनी त्यानी वासना हाई नष्ट व्हई ऱ्हायनं शे; पण पिताना ईच्छाप्रमाणे करनारा सर्वकाळ ऱ्हास.
ख्रिस्तविरोधी
18 पोऱ्यासवनं, हाई शेवटली येळ शे, अनी ख्रिस्तविरोधक ई अस तुम्हीन ऐकेल शे त्यानाप्रमाणे आत्तेच बराच ख्रिस्तविरोधक ऊठेल शेतस; ह्यानावरतीन आपले दखाई जाई की, हाई शेवटली येळ शे. 19 आपलामाईनच जर त्या निंघनात तर त्या आपला नव्हतात; त्या आपला जर ऱ्हातात तर आपलासंगेच ऱ्हातात; त्यासनामाईन कोणी बी आपला नही हाई दिसाले पाहिजे म्हणीन त्या निंघनात. 20 जो पवित्र आत्मा त्यानाकडीन तुमना अभिषेक व्हयेल शे, म्हणीन तुमले सर्वासले ज्ञान शे.
21 तुमले सत्य समजस नही म्हणीसन मी अस लिखी नही ऱ्हायनु; तुमले ते समजस अनी कोणतं बी लबाडी सत्यपाईन नही, म्हणीसन हाई मी लिखं. 22 येशु हाऊ ख्रिस्त शे अस जो नाकारस त्यानाशिवाय कोणी लबाड नही? जो पिताले अनं पुत्रले नाकारस तोच खरा ख्रिस्तविरोधी शे. 23 जो कोणी पोऱ्याले नाकारस त्याले पिता लाभस नही; तर जो पोऱ्याना स्विकार करस त्याले पिता लाभेल शे. 24 तुमनाबद्दल सांगस, जो संदेश तुम्हीन सुरवात पाईन ऐकेल शे तो तुम्हानामा राहो. जे तुम्हीन सुरवात पाईन ऐकं ते जर तुम्हानामा राहिनं तर तुम्हीन बी पुत्रमा अनं पितामा ऱ्हाशात. 25 हाई अभिवचन त्यानी स्वतः आपले देयल शे, तेच सार्वकालिक जिवन शे.
26 तुमले भयकाडणारा लोकसबद्ल मी हाई तुमले लिखी ऱ्हायनु शे. 27 तुमनाबद्दल सांगानं तर त्यानाकडना पवित्र आत्मा जो तुम्हानामा ऱ्हास, तवय तुमले कोणी शिकाडानं यानी गरज नही, त्याना पवित्र आत्मा सत्य शे, खोटा नही शे, तुमले सर्व गोष्टीसबद्दल शिकाडं तसच तुम्हीन त्यानामा एक राहतस.
28 तर आते पोऱ्यासवनं, त्यानामा एक ऱ्हा, यानाकरता की, तो जवय प्रकट व्हई तवय आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे, अनी त्याना येवाना येळले त्यानापाईन लाजीसन माघार लेवानी गरज पडाले नको. 29 तो न्यायसंपन्न शे हाई जर तुमले माहित शे तर जो कोणी नीतितीन चालस तो देवपाईन जन्मेल शे हाई बी तुमले माहित शे;
2:7 योहान १३:३४