5
जगवर विजय मिळाडानं
1 येशु हाऊ ख्रिस्त, असा जो कोणी ईश्वास धरस तो देवपाईन जन्मेल शे, अनी जो कोणी जन्मदातावर प्रिती करस, तो त्यानापाईन जन्मेल वर बी प्रिती करस.
2 आपण देववर प्रिती करतस अनं त्याना आज्ञा पाळतस तवय त्यानावरिन आपले समजस की, आपण देवना लेकरसवर प्रिती करतस.
3 देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस.
4 कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
5 येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?
येशु ख्रिस्तबद्दल साक्ष
6 जो पाणीनाद्वारा अनं रक्त द्वारा वना तो हाऊच येशु ख्रिस्त; फक्त पाणीनाद्वारा नही, तर पाणीघाई अनं रक्तघाई बी वना. आत्मा हाऊ साक्ष देणारा शे, कारण आत्मा सत्य शे.
7 साक्ष देणारा तिनच शेतस;
8 आत्मा, पाणी अनं रंगत; ह्या तिन्हीसनी साक्ष एकच शे.
9 आपण माणसंसनी साक्ष स्विकारतस पण तिनापेक्षा देवनी साक्ष मोठी शे, जी साक्ष देवनी त्याना पोऱ्याबद्ल दिधी; तिच हाई त्यानी साक्ष शे.
10 जो देवना पोऱ्यावर ईश्वास ठेवस त्याना मनमा साक्ष ऱ्हास; जो देववर ईश्वास ठेवस नही तो त्याले लबाड ठरावस, कारण जी साक्ष देवनी आपला पोऱ्याबद्ल देयल शे तिनावर त्यानी ईश्वास ठेवा नही.
11 ती साक्ष हाईच शे की, देवनी आपले सार्वकालिक जिवन देयल शे अनी हाई जिवन त्याना पोऱ्यामा शे.
12 ज्याले देवना पोऱ्या लाभेल शे त्याले जिवन लाभेल शे; ज्याले देवना पोऱ्या लाभना नही त्याले जिवन लाभना नही.
अनंत जिवन
13 देवना पोऱ्याना नाववर ईश्वास ठेवनारा तुमले अनंत जिवन लाभेल शे हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी हाई तुमले लिखी ऱ्हायनु शे.
14 देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
15 जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.
16 ज्याना परिणाम मरण नही असा पाप करतांना आपला भाऊले किंवा बहिणले कोणी दखं तर त्यानी त्यानाकरता देवनाजोडे मांगानं म्हणजे तो त्याले जिवन देई; अर्थात ज्याना परिणाम मरण नही असा पाप करनारासले ते दी, ज्याना परिणाम मरण शे असा बी पाप शे; अनी यानाविषयी मांगानं अस मी म्हणस नही.
17 सर्व प्रकारना अनिती पापच शे; तरी पण ज्याना परिणाम मरण नही. अस बी पाप शे.
18 जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही, हाई आपले माहित शे; जो देवपाईन जन्मेलसले तो त्याले सुरक्षित ठेवस अनी त्या दुष्टना संपर्क त्याले व्हस नही.
19 आपण देवपाईन शेतस हाई आपले माहित शे; सर्व जग त्या दुष्टले वश व्हयेल शे.
20 आपले माहित व्हयेल शे की, देवना पोऱ्या येल शे, अनी जो सत्य देवले वळखानी बुध्दी आपले देयल शे. जो सत्य शे त्यानाठायी, म्हणजे त्याना पोऱ्या येशु ख्रिस्तमा आपण एकत्र राहतस. हाऊच खरा देव अनी सार्वकालिक जिवन शे.
21 पोऱ्यासवनं, तुम्हीन स्वतःले खोटा देवसपाईन दूर ठेवा.