3
योना परमेश्वरनी आज्ञा पायस निनवेना पश्चाताप
1 मंग देव योनासंगे दुसरांदाव बोलना,
2 “ऊठ; त्या मोठा निनवे शहरमा जा अनी मी तुले सांगस तो संदेश त्याले सांग.”
3 मंग योना देवनी आज्ञा मानीन निनवेले गया. देवना नजरमां निनवे हाई इतलं मोठं शहर व्हतं की, त्याले पायी फिराले तिन दिन लागी जाये.
4 एक दिन चालानंतर योना शहरना मध्यभागमा वना अनी त्यानी प्रचार करा की, “चाळीस दिन बाकी शेतस मंग निनवेना नाश व्हई.”
5 तवय निनवे माधला लोकसनी देवना संदेशवर ईश्वास ठेया, मंग श्रीमंत असो की गरीब सर्वासनी काही दिन उपास करानं ठराय. अनी गोंटया घालीन शोक करा.
6 निनवेना राजाले पण हाई बातमी समजनी. तवय तो राजासन वरीन ऊठना अनी राजानी पण गोंटीना कपडा घालात अनं राखमा बशीन शोक करा.
7 राजा अनी राज्यकर्तासनी मिळीन एक जाहिरनामा काढीन सांगं की, सर्व निनवेमाधला लोकसनी, पशुसनी, गुरढोरसनी, बकऱ्या-मेंढयासनी काहीच खावानं-पेवानं नई.
8 प्रत्येक माणुसले अनी पशुले गोंटया घाली देवानं, अनी प्रत्येकनी रडीसन देवले प्रार्थना करानी, आपला वाईट कामे सोडी द्या, पाप करानं सोडी द्या, अनी पश्चाताप करा.
9 कदाचित देव आपलावर दया करी अनी जे तो कराव शे, ते तो कराव नही, त्याना भडकेल क्रोध शांत व्हई जाई अनी आपला नाश व्हवाव नही.
10 त्या लोकसनं वागनं बदली गयं अनी वाईट कामे त्यासनी सोडी दिधात. हाई देवनी दखं, मंग देवले त्यासनावर दया वनी. अनी त्यानी जे ठरायल व्हतं ते करं नही. देवनी त्या लोकसना नाश करा नही.