पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र
लेखक
पौलाने करिंथकरांस दुसरे पत्र त्याच्या जीवनात एका कमकुवत वेळी लिहिले. त्याला कळले होते की करिंथमध्ये मंडळी संघर्ष करत होती, आणि त्याने विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक मंडळीचे ऐक्य राखण्यासाठी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पौलाने पत्र लिहिले तेव्हा करिंथमधील विश्वासू लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे त्याने दुःख आणि त्रास देखील अनुभवला होता. दुःखाने मनुष्याच्या भागात दुर्बलता दिसून येते, परंतु परमेश्वरप्राप्तीसाठी “माझी कृपा तुम्हाकरिता पुरेशी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणामध्ये परिपूर्ण आहे” (2 करिंथ. 12:7-10). या पत्रात, पौलाने त्याच्या सेवाकार्याचा आणि प्रेषितीय अधिकाराचे जोरदारपणे समर्थन केले. त्याने हे पत्र पुन्हा सुरु केले आणि हे सत्य पुन्हा सिद्ध केले की तो देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्ताचा प्रेषित आहे (2 करिंथ. 1:1). पौलाने लिहिलेले हे पत्र प्रेषित व ख्रिस्ती विश्वासाबद्दल बरेच काही प्रकट करते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 55 - 56.
करिंथ येथील पौलाच्या दुसऱ्या भागाचे पत्र मासेदोनियाहून लिहिले आहे.
प्राप्तकर्ता
या पत्रावर करिंथमधील देवाच्या मंडळीला व अखयातील रोम प्रांताला संबोधित केले गेले, ज्याची करिंथ राजधानी होती (2 करिंथ 1:1).
हेतू
पौलाने या पत्रांत लिहून ठेवलेल्या काही उद्देशांना पौलाने सांत्वन व आनंद व्यक्त करण्यास सांगितले कारण करिंथ मंडळींनी त्यांच्या वेदनादायक पत्रांना प्रतिसाद दिला होता (1:3-4; 7:8-9, 12:13), त्यांना समजले की त्यांनी आशिया प्रांतातील अडथळा पार केला होता (1:8-11), त्यांना आक्षेपार्ह क्षमा करण्यास सांगावे (2:5-11), अविश्वासणाऱ्यांना एकत्र न ठेवण्यासाठी त्यांना सावध करणे (6:14; 7:1), ख्रिस्ती सेवाकार्याचे खरे स्वरूप आणि उच्च बोलावणे त्यांना स्पष्ट करण्यासाठी (2:14-7:4), देणगीच्या कृपेबद्दल करिंथ लोकांना शिकविण्यासाठी आणि यरूशलेममध्ये गरीब ख्रिस्ती लोकांचे संकलन पूर्ण करण्याबाबत खात्री करणे (अध्याय 8, 9).
विषय
पौल आपल्या प्रेषितांचे संरक्षण करतो.
रूपरेषा
1. सेवाकार्यावरील पौलाचे स्पष्टीकरण — 1:1-7:16
2. यरूशलेममधील गरीबांसाठी संकलन — 8:1-9:15
3. पौल आपल्या अधिकाराचा बचाव करतो — 10:1-13:10
4. आशीर्वादासह निष्कर्ष — 13:11-14
1
नमस्कार व धन्यवाद
1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
5 कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
6 आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
9 खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
10 त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
11 तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
पौलाचे शुद्ध हेतू
12 आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
13 कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
14 त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
त्याची भेट पुढे ढकलण्यात आली
15 आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
17 असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
18 पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
19 कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
21 आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
22 तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
24 आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.