इफिसकरांस पत्र
लेखक
इफिस 1:1, प्रेषित पौलाला इफिस पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखते. मंडळीच्या आरंभापासून इफिसकरांस पत्र पौलाने लिहिलेले होते आणि प्रेषितीय वडिलांना-रोमचे सौम्य, इग्नाटियस, हर्मास आणि पॉलीकार्प यांचे सर्वात जुने भाष्य केले होते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 60.
रोममध्ये तुरुंगात असताना पौलाने हे पत्र लिहिले असावे.
प्राप्तकर्ता
प्राथमिक प्राप्तकर्ता म्हणून इफिस येथील मंडळी. पौल स्पष्ट संकेत देतो की त्याचे हेतू वाचक लोक अन्य जातीय आहेत. इफिस 2:11-13 मध्ये, तो स्पष्टपणे सांगतो की त्याचे वाचक “जन्मतःच अन्य जातीय” होते (2:11) आणि म्हणूनच यहूदी लोकांनी अन्य जातीय लोकांना “वचनबद्ध कराराचे अनोळखी” असे मानले (2:12). त्याचप्रकारे, इफिस 3:1 मध्ये, पौलाने हे वाचकांना सांगितले की तो तुरुंगातील कैदी आहे.
हेतू
पौलाने असा निष्कर्ष काढला की ख्रिस्तासारखी परिपक्वता असलेले सर्वजण हे लेख प्राप्त करतील. इफिस पुस्तकामध्ये असलेल्या सोहळ्यामध्ये परमेश्वराच्या खऱ्या मुलांना विकसित करण्यासाठी आवश्यक शिस्त आहे. शिवाय, इफिसमधील अभ्यासाचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यास मदत होईल जेणेकरून ते उद्देश आणि परमेश्वराने त्यांना दिलेले बोलावणे पूर्ण करू शकतील. पौलाने इफिसच्या विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या ख्रिस्ती विश्वासात बळकट करण्याचे आणि मंडळीचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट करून हे स्पष्ट केले पाहिजे. पौलाने इफिसमधील अनेक शब्दांचा वापर केला जे त्यांचा पूर्वीचा धर्म, मुख्य-शरीर, परिपूर्णता, गूढ, वय, शासक, इत्यादी त्यांच्या यहूदी ख्रिस्ती लोकांशी परिचित असतील. त्याने या शब्दांचा उपयोग वाचकांना दाखवून दिला की ख्रिस्त देव आणि अध्यात्मिक प्राण्यांच्या कोणत्याही श्रेणीपेक्षा श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ आहे.
विषय
ख्रिस्तामध्ये आशीर्वाद
रूपरेषा
1. मंडळीतील सदस्यांसाठी सिद्धांत — 1:1-3:21
2. मंडळीतील सदस्यांसाठी कर्तव्ये — 4:1-6:24
1
इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो.
ईशस्तवन
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे. देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे. देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. 10 देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.
11 देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, 12 ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. 14 त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.
देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना
15 म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून 16 मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. 17 मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, 19 आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे.
ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य
20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले. 21 त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. 22 देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. 23 हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.