121
परमेश्वर तुझा रक्षक आहे
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो.
मला मदत कोठून येईल?
परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा
त्याकडून माझी मदत येते.
तो तुझा पाय घसरू देत नाही;
जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता
कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे;
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
दिवसा तुला सूर्य किंवा
रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील;
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील,
त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.