134
रात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेश
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या,
जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा;
आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर
तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.