23
परमेश्वर माझा मेंढपाळ
दाविदाचे स्तोत्र.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे*, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
तो माझा जीव ताजा-तवाना करतो,
तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे.
माझा प्याला भरुन वाहत आहे.
खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
* 23:1 यहोवा-रोही