70
मुक्ततेसाठी प्रार्थना
स्तोत्र. 40:13-17
दाविदाचे स्तोत्र
हे देवा, मला सोडव.
हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
जे माझा जीव घेऊ पाहतात,
त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक;
माझ्या यातनेत आनंद मानणारे
माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात,
ते आपल्या लाजेने मागे फिरोत.
जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत;
ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
पण मी गरीब आणि गरजवंत आहे;
हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये;
तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस.
हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.