75
देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो
आसाफाचे स्तोत्र
हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;
आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो;
लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत,
मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका,
आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका;
आपले डोके उंच करून बोलू नका.
विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून
किंवा रानातूनही येत नाही.
पण देव न्यायाधीश आहे;
तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे,
त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो.
खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन;
मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे *तोडून टाकीन,
पण नितीमानाची शिंगे उंच करीन.
* 75:10 सामर्थ्य 75:10 सामर्थ्य