4
अब्राहामनं उदाहरण
1 तर मंग आपला पुर्वज अब्राहाम याले शारिरीक दृष्टीतीन त्याले काय मिळनं असं आपन म्हनाले पाहिजे. 2 कारण अब्राहाम त्याना कर्मसमुये न्यायी ठरी जाता, तर त्याले अभिमान मिरावाले कारण व्हत; पन देवनापुढे नही. 3 ✡४:३ गलती ३:६कारण शास्त्रलेख काय म्हनस? अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा, अनी त्या त्याना बाजुतिन न्यायीपण म्हणीसन मोजामा वना. 4 आते जो कोणी काम करस त्याना मोबदला कृपा म्हणीसन मोजामा येवाव नही, पन हक्क म्हणीसन मोजामा येस. 5 पन जो कामवर ईश्वास करस नही, पन जो धर्माचरण करनाराले न्यायीपण ठरावस अनं त्यानावर ईश्वास ठेवस, त्याना ईश्वास त्याना बाजुतीन न्यायी म्हणीसन मोजामा येस. 6 देव ज्याना बाजुतीन कर्मसशिवाय न्यायीपण मोजस असा माणुसना आशिर्वाद दावीद राजा बी त्याना वर्णन करस, तो असं सांगस की,
7 *4:7 स्तोत्र 32:1-2“ज्यासना अपराधनसनी क्षमा व्हयेल शे,
ज्यासना पाप झाकाई जायेल शेतस त्या धन्य.
8 ज्यासना हिशोबमा परमेश्वर पाप मोजस नही तो मनुष्य धन्य शे.”
9 मंग ह्या आशिर्वादन्या गोष्टी दावीद राजा सांगस, त्या सुंता व्हयेलसकरता शे की, सुंता न व्हयेलसकरता शे? कारण आपन असं वचन ऐकतस की, अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा अनी त्याना ईश्वास मिळता न्यायी असं मोजामा येल व्हतं. 10 मंग हाई कवय व्हयनं? त्यानी सुंता व्हवानंतर किंवा सुंता व्हवाना अगोदर? सुंता व्हवानंतर नही, तर सुंता व्हवाना अगोदर. 11 अनी तो सुंता व्हयेल नव्हता तवय ईश्वातीन त्याले भेटेल न्यायीपणना शिक्का म्हणीन त्याला सुंता हाई खुण भेटनी. म्हणजे ज्या ईश्वास ठेवतस, त्या सुंता न व्हयेल राहीनात तरी त्यानी त्या सर्वासना पिता व्हावाले पाहिजे म्हणजे त्यासना बी बाजुकडीन न्यायी मोजाई जावो. 12 अनी ज्या सुंता व्हयेल शेतस त्या फक्त सुंता व्हयेल शेतस असं नही, पन आपला पिता अब्राहाम हाऊ सुंता व्हयेल नव्हता तवय त्यानामा राहेल त्याना ईश्वासले ज्या धरीसन चालतस त्यासना बी त्यानी पिता व्हवाले पाहिजे.
ईश्वासनाद्वारा देवना वचननी प्राप्ती
13 ✡४:१३ गलती ३:२९कारण तु जगना वारिस व्हसी, हाई देवाना वचन अब्राहामले किंवा त्याना संतानले नियमशास्त्रानाद्वारा देयल नव्हता, पन देववरला ईश्वासातीन न्यायीपणनाद्वारा देयल व्हता. 14 ✡४:१४ गलती ३:१८जर आपण हाई मानतस देवनी देयल वचन नियमशास्त्रले पाळनारासमुये भेटेल शे तर आपला ईश्वास निरर्थक अनी देवनं वचन बी व्यर्थ शे. 15 कारण नियमशास्त्र देवना क्रोधले कारण ठरस. पन जठे नियमशास्त्र नही तठे उल्लंघन नही शे. 16 ✡४:१६ गलती ३:७अनी म्हणीन हाई वचन ईश्वासनाद्वारा देयल शे अनी हाई देवना विनामुल्य देयल दान शे; ते यानाकरता की, नियमशास्त्र पाळणारा ज्या शेतस त्यासलेच ते पाहिजे असं नही. पन अब्राहामना ईश्वासमुये ज्या शेतस त्यासले बी म्हणजे सर्वा संतानले ते दान खात्रीमा मिळाले पाहिजे. तो आपला सर्वासना आत्मिक पिता शे. 17 कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, “मी तुले बराच राष्ट्रासना पिता करेल शे.” ज्या देववर अब्राहामनी ईश्वास ठेवा, जो मरेलसले जिवत करस अनी ज्या अस्तित्वमा नहीत, त्यासले वास्तवमा शेतस असं आज्ञा दिसन बलावस, त्या देवना नजरमा तो असा शे. 18 †4:18 उत्पत्ति 15:5“तसं तुनं संतान व्हई” ह्या वचनना प्रमाने त्यानी “तु बराच राष्ट्रासना पिता व्हशी,” अशी आशा नसता, त्यानी आशेमा ईश्वास ठेवा. 19 ‡4:19 उत्पत्ति 17:7 अनी ईश्वासमा दुर्बळ न रावामुये तो शंभर वरीसना ऱ्हाईसन बी त्यानी आपला निर्जीव शरिरकडे अनं सारा ना उदरना वांझपण यानाकडे ध्यान दिधं नही. 20 त्यानी देवना वचनाविषयमा अईश्वासतीन शंका पकडी नही; तो ईश्वासमा स्थिर ऱ्हावामुये देवले गौरव दी राहिंता. 21 अनी त्यानी पुर्ण खात्री व्हती की, देव आपला अभिवचन पुर्ण कराले बी समर्थ शे 22 अनी म्हणीन “तो ईश्वास त्याना बाजुतीन देवनाद्वारा न्यायी म्हणीन मोजामा वनं.” 23 आते, ते वचन त्याना “ईश्वासात नितीमत्व मोजामा वनं,” हाई फक्त त्यानाकरता लिखामा वनं असं नही. 24 पण आपला प्रभु येशु खिस्त याले ज्यानी मरेलमाईन ऊठाडं, त्यानावर आपन ज्या ईश्वास ठेवनारा शेतस, ह्या ज्या न्यायी ठरेल शेतस त्या आपलाकरता बी लिखेल शे. 25 तो प्रभु येशु आपला अपराधसाठे धरीन देवामा वना अनं आपन न्यायी ठराले पाहिजे म्हणीन तो परत ऊठेल शे.