Judges
शास्ते
यहूबा आणि शिमोन अदोनी-बेजेक राजाला पकडतात
१ यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्ञाएल लोकांनी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी ? २ परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी; पाहा, हा देश मी त्यांच्या हाती दिला आहे. ३ यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करूं; तुझ्या वतनांत मीहि तुझ्याबरोबर येईन; तेव्हां शिमोन त्यांच्याबरोबर गेला. ४ मग यहूदानें स्वारी केली तेव्हा परमेश्वरानें कनानी व परिज्जी ह्यांस त्यांच्या हाती दिलें व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केलें. ५ बेजेक येथें त्यांची अदोनी-बेजेकाशी गांठ पडली तेव्हां त्यांनी त्याच्याशीं लढुन कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केंला; ६ पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हां त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडलें आणि त्यांचा हातापायांचे आंगठे कापून टाकले. ७ तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, हातापायांचे आंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचीत असत; माझ्या करणीचें फळ देवानें मला दिले आहे. मग ते त्याला यरूशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. यरूशलेम व हेब्रोन हीं यहूदा हस्तगत करतो ८ यहूदाच्या वंशजांनी वंशजांनीं यरूशलेम नगर लढून घेतलें, त्यावर तलवार चालविली व त्या नगराला आग लावली. ९ नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणा-या कनान्यांशी लढावयाला गेले. १० मग हेब्रोनांत राहणा-या कनान्यांवर यहूदा चालून गेला. व त्यानें शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केलें. हेब्रोनाचें पूर्वीचे नांव किर्याथ-आर्बा होतें. अंथनिएल दबीर घेतो. त्याचा अखसाशीं विवाह (यहो 15:15-19) ११ तेथून दबीराच्या रहिवाश्यांवर तो चालून गेला. दबीरचें पूर्वीचें नांव किर्याथ-सेफर होते. १२ कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन. १३ तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्यानें तें नगर घेतले; म्हणून कालेबानें आपली मूलगी अखसा त्याला दिली. १४ ती आली तेव्हां आपल्या बापापासून कांही जमीन मागून घेण्यासाठी तिनें त्याला चिथावलें. ती गाढवावरून उतरली तेव्हां कालेबानें तिला विचारलें, तुला काय पाहिजे? १५ ती त्याला म्हणाली, मला एक देणगी द्दा; तुम्हीं मला नेगेब प्रदेशांत स्थायिक केलें आहे तेव्हां मला पाण्याचे झरेहि द्या; तेव्हां कालेबानें तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. यहूदा आणि बन्यामीन ह्यांनीं पादाक्रांत केलेले प्रदेश १६ मोशेचा सासरा केनी ह्याने वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून् यहूदाच्या रानांत गेले; हें रान अरादाजवळील नेगेबांत आहे; तेथें जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले. १७ मग यहूदानें आपला भाऊ शिमोन ह्याच्याबरोबर जाऊन सफात येथें राहणा-यां कनान्यांना पराभूत करून त्यांच्या समूळ नाश केला; म्हणून त्या नगराचें नाव हर्मा (समूळ नाश) असें पडले. १८ ह्याखेरीज यहूदानें गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरें त्यांच्या शिवारांसह घेतली. १९ यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्यानें डोंगराळ प्रदेश ताब्यांत घेतला; पण तळवटींत राहणा-या लोकांजवळ लोंखडी रथ असल्यानें त्यांना हाकून देणे त्याला जमेना. २० मोशेच्या सांगण्याप्रमाणें हेब्रोन नगर कालेबाला देण्यांत आलें व त्यानें तेथून अनाकाच्या तिघां मुलांना हाकून दिलें. २१ यरूशलेमेंत राहणा-या यबूसी लोकांना हाकून देणें बन्यामिनाच्या वंशजाना जमेना, म्हणून आजपर्यत यबूसी लोक यरूशलेमेंत बन्यामिनाच्या वंशजाबरोबर राहत आहेत. योसेफ बेथेल घेतो. २२ योसेफाच्या वंशजांनींहि बेथेलावर स्वारी केली; परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. २३ बेथेल हेरावयाला योसेफाच्या वंशजांनी माणसें पाठविलीं. त्या नगराचें पूर्वीचें नांव लूज होतेत. २४ त्या हेरांनीं नगरांतून एक मनुष्य बाहेर निघतांना पाहिला; त्याला त्यांनी म्हटलें, नगरात शिरण्याची वाट आम्हाला दाखीव म्हणजे आम्ही तुला अभय देऊं. २५ तेव्हां त्यानें त्यांना नगरांत शिरण्याची वाट दाखविली आणि त्यांनीं त्या नगरावर तरवार चालविली; पण त्या मनुष्याला व त्याच्यां परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊं दिलें. २६ त्या मनुष्यानें हित्ती लोकांच्या देशांत जाऊन एक नगर वसविलें व त्याचें नांव लूज ठेवलें. त्या नगराचें नांव आजपर्यंत तेंच आहे. मनश्शे आणि एफ्राईम ह्यांनीं पादाक्रांत केलेले प्रदेश. २७ मनश्शेनें बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाश्यांना घालवून दिलें नाहीं कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशांत राहण्याचा हट्ट धरला. २८ पुढे इस्त्राएल समर्थ झाले तेव्हा त्यानी कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावलें; एकदमच हांकून दिले नाही. २९ एफ्राइमानें रोजेर येथे राहणा-या कनान्यांना घालवून दिले नाहि, ते कनानी गेजेर येथें त्यांच्य़ामध्येच राहिले. इतर वंशानीं पादाक्रांत केलेले प्रदेश ३० जबुलूनानें कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाहि; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले. ३१ अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकबीज, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवश्यांना घालवून दिले नाही; ३२ म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाश्यामध्ये राहिले; कारण त्यांनी त्याना घालवून दिले नाहिं. ३३ नफतालीने बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाहि; ते त्या देशच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले. ३४ अमो-यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशांत मागे रेटलें; ते त्यांना तळवटीत उतरू देईनात; ३५ अमो-यांनी हेरेस पहाड अयालोन व शालबीम येथें राहण्याचा हट्ट धरला; पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यानी अमो-यांना वेठबिगार करावयाला लावलें. ३६ अमो-यांची सरहद्द अक्रब्बीमची चढणी आणि सेला येथून वर गेली होती.