8
दावीदाने मिळविलेले विजय
काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर कब्जा केला आणि त्याने मेथेग-अम्माह पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतले.
दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.
याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना*किंवा ताबा घेण्यास करण्यास फरातफरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वारकाही मूळ प्रतींनुसार एक हजार सातशे आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.
जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ§तेबाह काही मूळ प्रतींमध्ये बेताह आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले.
हमाथाचा राजा तोई*तोई काही मूळ प्रतींनुसार तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, 10 तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या.
11 दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: 12 अरामकाही मूळ प्रतींनुसार एदोम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.
13 क्षार खोर्‍यातील अठरा हजार अरामीकाही मूळ प्रतींनुसार एदोमी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले.
14 त्याने एदोमात सर्वठिकाणी ठाणे बसविले आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथे कुठे गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
दावीदाचे अधिकारी
15 दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे. 16 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता. 17 अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता; 18 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार§काही मूळ प्रतींनुसार याजक होते.

*8:3 किंवा ताबा घेण्यास

8:3 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते

8:4 काही मूळ प्रतींनुसार एक हजार सातशे

§8:8 तेबाह काही मूळ प्रतींमध्ये बेताह

*8:9 तोई काही मूळ प्रतींनुसार तोऊ

8:12 काही मूळ प्रतींनुसार एदोम

8:13 काही मूळ प्रतींनुसार एदोमी

§8:18 काही मूळ प्रतींनुसार याजक