12
स्तुतिगीत
त्या दिवशी तुम्ही म्हणाल:
“याहवेह, मी तुमची स्तुती करेन,
जरी तुम्ही माझ्यावर रागावला होता,
तरी तुमचा राग दूर झाला आहे
आणि तुम्ही माझे सांत्वन केले आहे.
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत;
मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही.
याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण*किंवा गीत आहेत;
ते माझे तारण झाले आहेत.”
तारणाच्या विहिरींतून
तुम्ही आनंदाने पाणी काढाल.
त्या दिवशी तुम्ही म्हणाल:
“याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;
त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या,
आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.
याहवेहसाठी गीत गा, कारण त्यांनी गौरवशाली कार्ये केली आहेत;
हे सर्व जगाला माहीत करून द्या.
सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा,
कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

*12:2 किंवा गीत