25
बिल्दद
मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:
“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे;
तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.
त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय?
आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?
मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल?
स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?
जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही
आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे—
मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”