35
 1 एलीहू पुढे म्हणाला:   
 2 “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय?  
तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’   
 3 तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने  
मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’   
 4 “तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना  
मला उत्तर द्यायला आवडेल.   
 5 वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा;  
तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा.   
 6 जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार?  
तुझी पापे जरी पुष्कळ आहेत, तरी त्याचे त्यांना काय?   
 7 जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार,  
किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?   
 8 तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर,  
आणि तुझे न्यायीपण इतर लोकांवर परिणाम करू शकतात.   
 9 “अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात;  
बलवान मनुष्याच्या हातून सुटकेसाठी आरोळी करतात.   
 10 तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे,  
जे रात्रीच्या वेळी गीत देतात, ते कुठे आहेत,   
 11 जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात,  
आणि आकाशातील पक्ष्यांपेक्षा आम्हाला अधिक ज्ञानी बनवितात?’   
 12 परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे  
जेव्हा ते लोक आरोळी मारतात तेव्हा परमेश्वर उत्तर देत नाहीत.   
 13 खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत;  
सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.   
 14 मग ते तुझे कसे ऐकतील,  
जेव्हा तू म्हणतो की तुला ते दिसत नाहीत,  
की तुझा वाद त्यांच्यासमोर आहे  
आणि तू त्यांची वाट पाहावी,   
 15 आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही  
आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही.   
 16 म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो;  
आणि ज्ञानाशिवाय शब्द वाढवित राहतो.”