स्तोत्र 125
प्रवाशांचे आराधना गीत. 
  1 ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत,  
कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.   
 2 यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात,  
तसेच आता आणि सदासर्वकाळ,  
याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.   
 3 नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर  
दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही,  
नाहीतर नीतिमान लोकही  
त्यांच्या हाताने दुष्टता करतील.   
 4 हे याहवेह, जे नीतिमान आहेत,  
ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.   
 5 परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात,  
त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील.  
इस्राएलावर शांती असो.