स्तोत्र 134
प्रवाशांचे आराधना गीत. 
  1 अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.  
तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.   
 2 पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा  
आणि याहवेहचे स्तवन करा.   
 3 स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह,  
तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.