20
मासेदोनिया अनी हेल्लास प्रांतमा पौल
1 नंतर गोंधळ बंद व्हयना तवय पौलनी शिष्यसले बलाईन त्यासले प्रोत्साहन दिधं अनी त्यासना निरोप लिसन तो मासेदोनिया जावाले निंघना.
2 त्या प्रांतमातीन जातांना तठला लोकसले बरच प्रोत्साहन दिसन तो आखया प्रांतमा गया
3 तठे तीन महीना रावानंतर तो सिरिया देशले जहाजमा बठीन जाणार व्हता, तवय यहूदी लोकसनी त्यानाविरोधमा कट करा, म्हणीसन त्यानी मासेदोनियातीन परत जावाना बेत करा.
4 बिरूया गावना पुर्रा ह्याना पोऱ्या सोपत्र, थेस्सलनी शहरना अरिस्तार्ख अनं सकूंद, दर्बे गावना गायस, तीमथ्य अनी आशिया देशमधला तुखिक अनी त्रफिम या आशियापावत त्यानासंगे गयात.
5 त्या जाईसन त्रोवासा शहरमा आमनी वाट दखत राहीनात.
6 अनी बेखमीर भाकरना दिन नंतर आम्हीन फिलीप्पै शहरतीन जहाजमा बठीन पाच दिनना प्रवास करीसन त्रोवासाले त्यासनाकडे वनुत, तठे आम्हीन सात दिन राहीनुत.
युतुख
7 मंग आम्हीन आठवडाना पहिला दिन संध्याळले जेवाले एकत्र जमनुत, तवय पौल दुसरा दिन जाणार व्हता, म्हणीसन त्यानी त्यासनासंगे संभाषण करं, ते आर्धी रातपावत चालनं.
8 ज्या माडीवर आम्हीन एकत्र जमेल व्हतुत, तठे बराच दिवा व्हतात,
9 अनी युतुख नावना एक तरूण पोऱ्या खिडकीमा बठेल व्हता, त्याले डुलकी ईसन गाढ झोप लागनी, तवय पौल एकसारखा बोलत राहीना त्यामुये तो त्या झोपमाच तिसरा मजलावरतीन खाल पडना अनी जवय त्यासनी त्याले उचलं तर तो मरेल व्हता.
10 तवय पौल खाल उतरना अनी त्यानी त्याले कवटाळीन झाकी लिधं अनी बोलना, “घाबरू नका, कारण ह्यानामा जीव शे!”
11 मंग त्यानी वर ईसन जेवण करावर बराच येळ म्हणजे पहाटपावत त्यासनासंगे संभाषण करं अनी तो निंघना.
12 त्या तरूण पोऱ्याले जिवत लई जाता वनं म्हणीसन त्यासले भलतच समाधान वाटनं.
मिलेता शहरमा प्रवास
13 आम्हीन पहिलेच जहाजमा बठीन अस्सा शहरकडे गवुत, तठे पोहचानंतर पौलले जहाजमा लई जावानं व्हतं, कारण त्यानीच तसं ठरायेल व्हत अनी तो पायवाटतीन तठपावत येणार व्हता.
14 तो अस्सा शहरले आमले भेटना, तवय त्याले जहाजमा लिसन आम्हीन मितुलेना शहरले वनुत.
15 तठेन जहाजमा आम्हीन दुसरा दिन खिया शहरसमोर वनुत अनी त्याना पुढला दिनले समा नावना बंदरले गवुत, मंग त्रोगुला गावमा ऱ्हावानंतर त्याना पुढला दिनले मिलेता गावले वनुत.
16 आपले आशिया प्रांतमा जास्त दिन लागाले नको म्हणीसन इफिस शहरले बाजुले सोडीन जावाना निश्चय पौलनी करा, कारण कसं बी करीसन पन्नासावा दिनना सणमा आपले यरूशलेममा पाहिजेत यानाकरता तो घाई करी राहींता.
पौलनी इफिसमधला वडील लोकेसकरता करेल भाषण
17 मंग पौलनी मिलेता शहरमातीन इफिस शहरमा निरोप धाडीसन मंडळीना वडील लोकसले बलाई लिधं.
18 त्या त्यानाकडे येवानंतर त्यानी त्यासले सांगं की, “मी आशिया प्रांतमा पहिलींदाव पाय टाका त्या दिनपाईन तुमनासंगे कायम कसा वागनु;
19 म्हणजे भलताच नम्रतातीन, आश्रु गाळत अनी यहूदीसनी करेल कट यामुये मनावर येल संकट भोगत मी प्रभुनी सेवा कशी करी, हाई तुमले माहीत शे;
20 जे हितनं शे ते तुमले सांगाकरता अनी चार लोकसमा अनी घरोघर शिकाडाकरता मी माघार लिधी नही;
21 पश्चाताप करीसन देवकडे वळनं अनी आपला प्रभु येशु ख्रिस्तवर ईश्वास ठेवनं यानाबद्दल यहूदी अनी गैरयहूदी यासले मी साक्ष दि राहींतु;
22 पण आते, मी आत्माना आज्ञातीन यरूशलेममा जाई राहीनु, तठे माले काय काय व्हई हाई माले माहीत नही.
23 फक्त येवढंच समजी राहीनं की, बंधनं अनी संकटे मनी वाट दखी राहीनात, अनी पवित्र आत्मा यानाबद्दल माले शहरोशहरी साक्ष दि राहीना;
24 पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं.”
25 “आते, मी ज्यासनामझार ह्या देवराज्यनी घोषणा करत फिरनु त्या तुमनामाधला कोणलेच मनं तोंड दिसाव नही, हाई माले चांगलच माहीत शे,
26 म्हणीसन आजना दिनले तुमले स्पष्ट करस की, मी सर्वासना रक्तबद्दल निर्दोष शे.
27 कारण देवनी पुरी ईच्छा तुमले सांगाकरता मी माघार लिधी नही.
28 अनी तुम्हीन आपलाकडे अनी ज्या कळपमा पवित्र आत्मानी तुमले त्यासनी चिंता करनारा बनाडीन ठेयल शे त्या सर्वासकडे लक्ष द्या, यानाकरता की, देवनी जी मंडळी त्यानी आपला रक्तघाई कमाडी तिनं पालन तुम्हीन करानं.
29 मी जावानंतर कळपसवर दया नही करनारा असा क्रुर लांडगा तुमनामा घुसतीन हाई माले कळस;
30 अशी येळ की, तुमनामातीनच काही लोके ऊठीसन ईश्वासीसले आपलामांगे ओढाकरता खोट्या गोष्टी सांगतीन.
31 यामुये सावध राहा, अनी मी तीन वरीसपावत रातदिन आश्रु गाळत प्रत्येकसले शिकाडानं थांबाडं नही यानी आठवण ठेवा.”
32 “अनी आते मी तुमले देवकडे अनी त्याना पवित्र संदेशकडे सोपी देस, तो तुमनी प्रगती कराले अनी त्याना सर्व लोकसमा तुमले वारसहक्क देवाले समर्थ शे.
33 मी कोणाच सोना, चांदिना किंवा कपडासना लोभ धरा नही.
34 मी मना अनी मना सोबतीसन्या गरजा भागाडाकरता याच हातघाई सेवा करी, हाई तुमले स्वतःले माहीतच शे.
35 सर्व गोष्टीसमा मी तुमले कित्ता घालीन दखाडी देयल शे की, तशीच मेहनत करीसन तुम्हीन अशक्त लोकसले मदत करानी, अनी ‘लेवापेक्षा देवामा धन्यता शे, अस जे प्रभु येशु स्वतः बोलना, त्या वचननी आठवण ठेवानी.’ ”
36 अस बोलानंतर पौलनी गुडघा टेकीन त्या सर्वाससंगे प्रार्थना करी.
37 तवय त्या सर्व भलताच रडनात अनी त्यासनी पौलना गळामा गळा घालीन त्याना मुका लिधात अनी निरोप लिधा.
38 मनं तोंड परत तुमले यानापुढे दिसाव नही, अस जे त्यानी सांगेल व्हतं त्यावरतीन त्यासले विशेष दुःख वाटनं, मंग त्यासनी त्याले जहाजपावत पोहचाडं.