19
इफिस शहरमा पौल
मंग अस व्हयनं की अपुल्लो करिंथ शहरमा व्हता तवय पौल वरला प्रांतमातीन जाईन इफिसले पोहचना, तठे कितलातरी शिष्य त्याले दखायनात. त्यासले तो बोलना, “तुम्हीन ईश्वास धरा तवय तुमले पवित्र आत्मा भेटना का?”
त्यासनी त्याले सांगं, “पवित्र आत्मा शे अस आम्हीन ऐकेल सुध्दा नही.”
तो त्यासले बोलना, “तर मंग तुम्हीन कसाना बाप्तिस्मा लिधा?”
त्या बोलनात, “योहानना बाप्तिस्मा.”
पौलनी सांगं, “योहान पापसपाईन फिराना बाप्तिस्मा दे, तो लोकसले सांगे की, मना मांगतीन येणारावर म्हणजे येशुवर तुम्हीन ईश्वास ठेवाना.”
हाई ऐकीसन त्यासनी प्रभु येशुना नावतीन बाप्तिस्मा लिधा. अनी पौलनी त्यासनावर हात ठेवा अनी पवित्र आत्मा त्यासनावर वना, त्या येगयेगळी भाषा बोलु लागनात अनी देवना संदेश देवु लागनात. त्या सर्व जवळजवळ बारा माणसे व्हतात.
नंतर पौल यहूदी सभास्थानमा जाईन देवन्या राज्यन्या गोष्टीसबद्दल संवाद करत अनी प्रमाण पटाडत बिनधास्त तीन महीना बोलत गया. मंग कितलातरी जण कठोर अनी विरोधी व्हईसन लोकसना समोर त्या देवमार्गनी निंदा करू लागनात; तवय त्यानी त्यासनामातीन निंघीन शिष्यसले बी येगळं करं अनी तुरन्नाना शिक्षणगृहमा तो दररोज संवाद करू लागना. 10 अस दोन वरीस चालामुये आशिया प्रांतमा राहणारा सर्व यहूदी अनी गैरयहूदी लोकसनी प्रभुनं वचन ऐकं.
स्किवाना पोऱ्या
11 देवनी पौलना हाततीन असाधारण चमत्कार करी लिधात. 12 त्या असा की, रूमाल किंवा फडकं त्याना आंगवरतीन आणीन रोगीवर टाका म्हणजे त्याना रोग बरा व्हई जाये अनी दुष्ट आत्मा व्हई तर तो बी निंघी जाये. 13 पण तवय काही यहूदी लोके दुष्ट आत्मा लागेल लोकसवर प्रभु येशुना नावना उपयोग करीसन दुष्ट आत्माले बोलु लागनात “ज्या येशुनी पौल सुवार्ता सांगस त्यानी मी तुमले शपथ घालस.” 14 अस करनारा माणसे एक यहूदी मुख्य याजक स्किवा याना सात पोऱ्या व्हतात.
15 त्यासले दुष्ट आत्मानी उत्तर दिधं, “मी येशुले अनी पौलले बी वळखस, पण तुम्हीन कोण शेतस?”
16 मंग ज्या माणुसले दुष्ट आत्मा लागेल व्हता त्यानी त्यासनावर उडी मारीन हमला करा, अनी त्यासनावर त्या इतला भारी पडनात की, त्या उघडानागडा अनी जखमी व्हईसन त्या घरमातीन पळी गयात. 17 तवय इफिसमा राहनारा यहूदी अनी गैरयहूदी या सर्वासले हाई माहीत व्हयनं तवय त्यासले भिती वाटनी अनी प्रभु येशुना नावना महिमा व्हयना. 18 ईश्वास ठेवणारा लोकसपैकी बराच जणसनी आपला पापं कबुल करीसन त्या उघडा करात. 19 जादु करनारामाधला बराच लोकसनी आपला पुस्तके जमा करीसन सर्वाससमोर जाळी टाकात, अनी त्यासना किम्मतनी बेरीज करी तर ती पन्नास हजार रूपया व्हयनी. 20 अस प्रभुनं वचन सामर्थ्यतीन वाढत जाईसन भक्कम व्हयनं.
इफिसमा चळवळ
21 हाई व्हवानंतर मासेदोनिया अनी अखया या प्रांतमातीन यरूशलेम शहरले जावानं अस पौलनी आपला मनमा निश्चय करा अनी बोलना, “तठे जावानंतर माले रोम शहर बी दखाले पाहिजे.” 22 मंग आपली सेवामा मदत करनारासपैकी तीमथ्य अनी एरास्त या दोन्हीसले मासेदोनिया धाडीन तो स्वतः काही दिन आशिया प्रांतमा राहीना.
23 त्या येळले इफिस शहरमा देवना त्या मार्गबद्दल बरीच चळवळ व्हयनी. 24 कारण की देमेत्रिय नावना कोणतरी एक सोनार अर्तमी नावनी देवीनं चांदीनं देव्हारं करीसन कारागीरसले बराच कामधंदा लाई दि राहींता. 25 त्यानी त्यासले अनी दुसरा बाकीना कारागीरसले जमाडीन सांगं, “भाऊसवन, हाऊ धंदामुये आपले पैसा भेटस हाई तुमले माहीत शे. 26 तुम्हीन दखतस अनी ऐकतस की इफिस शहरमाच नही तर जवळजवळ सर्व आशिया प्रांतमा, हातघाई बनाडेल मुर्ति देव नहीत, अस हाई पौलनी बोलीन अनी बराच लोकसले समजाडीसन त्यासले फिताडेल शे. 27 यामुये हाई आपला धंदाकरता धोकादायक शे; इतलंच नही तर, जी महादेवी अर्तमीनी भक्ती सर्व आशिया अनी जग बी करस तिनं देऊळ लोके तुच्छ मानतीन अनी तिले कोणीच महत्व देवाव नही, अशी भिती वाटस!”
28 हाई ऐकानंतर त्यासले भलताच राग वना अनी त्या वरडू लागनात की, “इफिसकरसनी अर्तमी देवी थोर शे!” 29 इतलामा शहरमा धांदल उडनी अनी पौलना सोबती ज्या व्हतात त्या मासेदोनियाना गायस अनं अरिस्तार्ख या दोन्हीसले पकडीसन वढत वढत त्यासले नाटकगृहमा लई गयात. 30 तवय ती गर्दीमा जावानं अस पौलना मनमा व्हतं, पण शिष्यसनी त्याले जावु दिधं नही. 31 प्रांतना अधिकारीसपैकी बराच त्याना मित्र व्हतात, त्यासनी त्याले ईनंती करीसन निरोप धाडा की, नाटकगृहमा जाईसन स्वतःले धोकामा टाकु नको. 32 तवय कोणी काय, कोणी काय, असा आरोळ्या मारी राहींतात, लोकसना एकच गोंधळ व्हयना अनी आपण कसाले जमनुत हाई बराच जणसले समजनं नही. 33 मंग अलेक्सांद्र नावना यहूदी माणुसले लोकसनी पुढे ढकलावर बराच जणसनी त्याले गर्दीमातीन बाहेर ओढीन काढं, तवय अलेक्सांद्र हातघाई इशारा करीसन लोकसनी समजुत घाली राहींता. 34 पण तो यहूदी शे, अस समजानंतर जवळजवळ दोन तासपावत, “इफिसकरसनी अर्तमी थोर!” असा सर्वासना एकच आवाज व्हता.
35 मंग शहरना लिपीक लोकसले शांत करीसन बोलना, “अहो इफिसकरसवन! हाई कोणले माहित नही की, इफिस शहर महान अर्तमी देवी अनी ज्युपितर देव या स्वर्गमातीन पडेल दगडनी रक्षा करनारा शेतस. 36 या गोष्टीसले अमान्य करनारा कोणीच नही शे म्हणीसन तुम्हीन शांत राहा, काहीच उतावळापणा करू नका. 37 कारण ज्या माणससले तुम्हीन आठे आनेल शे, त्या देवालय लुटनारा किंवा आपला देवसनी निंदा करनारा लोके नहीत. 38 यामुये देमेत्रिय अनी त्याना सोबतीसना यासना कोणसंगे काही वाद व्हई तर, न्यायगृह उघडा शेतस अनी न्यायाधीश बी शेतस, त्यासनापुढे त्यासनी एकमेकसवर आरोप ठेवाना. 39 पण दुसरी एखादी गोष्टनी मागणी व्हई तर तिनाबद्दल कायदेशीर सभामा ठरावामा ई. 40 या दंगानं कारण काय ह्याना जबाब तुमले देता ई नही राहीना त्यामुये आजनी या घटनामुये तुमनावर बंड कराना आरोप व्हवानी येळ येवु शकस.” 41 अस बोलीन त्यासनी सभा रद्द करी टाकी.
19:4 मत्तय ३:११; मार्क १:४,७,८; लूक ३:४,१६; योहान १:२६,२७