18
करिंथ शहरमा पौल
1 त्यानानंतर पौल अथेनैस सोडीसन करिंथ शहरले गया.
2 तवय पंत गावना कोणतरी अक्विला नावना यहूदी त्याले दिसना, कारण सर्व यहूदीसनी रोम शहर सोडीन जावानं अशी क्लौदिया नावना राजानी आदेश करामुये तो नुकताच इटलीतीन त्यानी बायको प्रिस्किल्ला हिनासंगे येल व्हता, त्यासनाकडे तो गया.
3 त्यासना अनी पौलना धंदा एकच व्हता म्हणीसन तो त्यासनाकडे राहीना अनी तठे त्यानी तो धंदा चालाडा; त्याना धंदा तंबु बनाडाना व्हता.
4 तो प्रत्येक शब्बाथ दिनले सभास्थानमा वाद करीसन यहूदीसनी अनी ग्रीक गैरयहूदी लोकसनी समजुत घाले.
5 जवय सीला अनी तिमथ्य या मासेदोनियातीन वनात तवय येशु हाऊच ख्रिस्त शे अशी साक्ष यहूदी लोकसले दिसन वचन सांगामा पौलनी पुरा येल दिधा.
6 अनी जवय त्या त्याले अडाईन अपशब्द बोलु लागनात तवय त्यानी आपला कपडा झटकीसन त्यासले सांगं, तुमनं रंगत तुमना माथावर, मी निर्दोष शे, आतेपाईन मी गैरयहूदी लोकसकडे जासु.
7 मंग तठेन निंघीसन सभास्थानना जोडे ज्यानं घर व्हतं असा कोणतरी तिता युस्त नावना गैरयहूदी देवभक्त व्हता त्याना घर तो गया.
8 तवय सभास्थानना अधिकारी क्रिस्प यानी आपला सर्व घराणासंगे प्रभुवर ईश्वास ठेवा अनी बराच करिंथकरसनी संदेश ऐकीसन ईश्वास ठेवा अनी बाप्तिस्मा लिधा.
9 तवय प्रभुनी रातले पौलले दृष्टांत दिसन सांगं, “भ्याऊ नको, बोलत जाय, उगा राहु नको,
10 मी तुनासंगे शे, तुनं वाईट कराले कोणी तुनावर येवाव नही, कारण या शहरमा मना बराच लोके शेतस.”
11 तो त्यासनामा दिड वरीस देवनं वचन शिकाडत राहीना.
12 नंतर गल्लियो हाऊ अखया प्रांतना रोमी राज्यपाल बनना तवय यहूदी लोके एकजुट करीसन पौलवर ऊठनात अनी त्याले न्यायसभापुढे लई वनात,
13 अनी बोलु लागनात “हाऊ माणुस, आमना नियमशास्त्रना विरूध्द देवनी उपासना कराकरता लोकसले भडकावस.”
14 तवय पौल तोंड उघडीन बोलणारच व्हता इतलामा गल्लियो यानी यहूदीसले सांगं, “अहो, यहूदीसवन, हाई प्रकरण गैरशिस्त वर्तननं किंवा दुष्ट कामनं ऱ्हातं, तर माले तुमनं म्हणनं मनवर लेवानं कारण व्हई जातं,
15 पण हाऊ वाद शब्दसना, नावसना किंवा तुमना नियमशास्त्रना शे, तर तुमनं तुम्हीनच दखा, असा गोष्टीसना माले न्यायनिवाडा करना नही शे!”
16 अस बोलीन त्यानी त्यासले न्यायसभामातीन हाकली दिधं.
17 तवय सर्वासनी सभाना अध्यक्ष सोस्थनेस याले धरीन न्यायसभासमोरच मार दिधा, पण गल्लियोनी यापैकी कोणतीच गोष्टीसनी पर्वा करी नही.
पौल सिरिया देशमा परत येस
18 यानानंतर पौल तठे बराच दिन राहवानंतर ईश्वासु बंधुसना निरोप लिसन जहाजमा बठीन सिरिया देशले गया; त्यानासंगे प्रिस्किल्ला अनी अक्विला या बी गयात, त्याना नवस व्हता म्हणीसन त्यानी क्रिंख्रिया शहरमा आपला डोकाना केस कापात.
19 मंग इफिस शहरमा येवावर त्यानी प्रिस्किल्ला अनी अक्विलाले तठे सोडं अनी स्वतः सभास्थानमा जाईसन यहूदी लोकससंगे संवाद करा.
20 नंतर त्यानी आखो थोडा दिन तठे राहाव अशी त्या ईनंती करी राहींतात तवय त्यानी त्यासनं ऐकं नही.
21 तवय त्यासना निरोप लेवावर, “देवनी ईच्छा व्हई तर मी तुमनाकडे परत फिरीन ईसु” अस बोलीन इफिसतीन जहाजमा बठीन तो निंघना.
22 मंग कैसरियाले पोहचानंतर तो वर यरूशलेमले गया अनी मंडळीले भेटीसन परत खाल अंत्युखिया गावमा गया.
23 तठे काही दिन राहीसन तो निंघना, अनी गलतिया प्रांत अनी फ्रुगिया प्रांत यामाधला सर्व शिष्यसले ईश्वासमा स्थिर करत फिरना.
इफिस अनी करिंथ शहरमा अपुल्लो
24 तवय अपुल्लो नावना मोठा वक्ता अनी शास्त्रसंपन्न असा एक आलेक्सांद्रिया गावना हाऊ यहूदी व्हता, तो इफिसले वना.
25 त्याले प्रभुना मार्गबद्दलनं शिक्षण भेटेल व्हतं अनी तो पवित्र आत्मातीन भरेल व्हता म्हणीसन येशुबद्दल गोष्टी नीट सांगीसन शिक्षण देत राहे, पण त्याले योहानना बाप्तिस्माबद्दल माहीत नव्हतं.
26 तो सभास्थानमा बिनधास्त बोलु लागना, तवय प्रिस्किल्ला अनी अक्विला यासनी त्यानं ऐकीसन त्याले जोडे लिधं, अनी देवना मार्ग त्याले चांगलाच स्पष्ट दखाडा.
27 नंतर अपुल्लोनी अखया प्रांतमा जावाना बेत करा तवय इफिसुसना ईश्वासु बंधुवर्गनी त्याले हिम्मत दिधी अनी त्यानं स्वागत कराकरता शिष्यसले लिखं; तो तठे पोहचावर ज्यासनी देवना कृपामुये ईश्वास धरा व्हता त्यासले त्यानी भलतीच मदत करी.
28 कारण येशु हाऊच ख्रिस्त शे, अस त्यानी शास्त्रवरतीन दखाडीन मोठा सामर्थ्यतीन सर्वासना समोर यहूदीसनं तोंड बंद करं व्हतं.