17
थेस्सलनीका शहरमा पौल अनी सीला
नंतर पौल अनी सीला अंफिपुलीस अनी अपुल्लोनिया यासनामातीन जाईन थेस्सलनीका शहरले गयात, तठे यहूदीसनं सभास्थान व्हतं. तठे पौलनी आपला कायमनी पध्दतप्रमाणे सभास्थानमा जाईसन शास्त्रवरतीन तीन शब्बाथ दिनसले त्यासनासंगे संवाद करा. त्यानी नियमशास्त्रना उलगडा करीसन स्पष्टीकरण करं की, ख्रिस्तनी दुःख सोसावं अनी मरेलस मातीन परत जिवत व्हणं हाई आवश्यकच व्हतं अनी ज्या येशुबद्दल मी तुमले सांगस तोच ख्रिस्त शे. तवय त्यासनामातीन बराच जण अनी ग्रीक भक्तीमान लोकसनी मोठी गर्दी अनी बऱ्याच ज्या मुख्य बाया व्हत्यात त्यासनी खात्री पटीन त्या पौल अनी सीला यासनामा ईसन मिसळण्यात.
पण यहूदी लोकसनी हेवा करीसन आपलाकडे काही बजारमाधला रिकामटासले लिसन अनी गर्दी जमाडीन शहरमा बंगावा करा; अनी यासोना नावना माणुसना घरवर हल्ला करीसन पौल अनी सीलाले लोकसकडे बाहेर काढीन आणानं प्रयत्न करा. पण त्यासना शोध लागना नही, तवय त्यासनी यासोनले अनं बराच ईश्वासु बंधुसले शहरना अधिकारीसकडे ओढत ली जाईसन आरडाओरड करीसन बोलनात, “ज्यासनी सर्वीकडे उलटपलट करी, त्या आठे येल शेतस.” त्यासले यासोननी आपला घरमा ठेयल शे अनी या सर्व कैसर राजाना हुकूमना विरोधमा वागतस, म्हणजे येशु नावना कोणतरी एक दुसरा राजा शे अस म्हणतस. हाई ऐकाडीन त्यासनी लोकसले अनी शहरना अधिकारीसले कावरबावरा करी सोडं. मंग त्यासनी यासोनले अनी बाकीनासले पैसा लिसन सोडी दिधं.
बिरूया शहरमा पौल अनी सीला
10 यामुये ईश्वासु लोकसनी पौल अनी सीला यासले लगेच रातोरात बिरूयाले धाडी दिधं; त्या तठे पोहचनात तवय यहूदीसना सभास्थानमा गयात. 11 तठला लोके थेस्सलनी शहरना लोकसपेक्षा मोठा मनना व्हतात, त्यासनी मोठी आतुरतातीन देवना वचनना स्विकार करा अनी पौलनी सांगेल या गोष्टी असाच शेतस का याना रोज त्या शास्त्रमा शोध करत गयात. 12 यावरतीन तठला बराच जणसनी अनी रोमी मुख्य ज्या बाया व्हत्यात त्यासनी अनी माणससमातील बराच जणसनी ईश्वास धरा. 13 पौल देवनं वचन बिरूया शहरमा बी सांगी राहीना शे, हाई थेस्सलनी शहरमाधला यहूदीसले समजनं तवय त्यासनी तिकडे बी जाईसन लोकसले चिंगाडीन खवळाई दिधं. 14 त्यावरतीन ईश्वासी भाऊसनी पौलले समुद्रकडे लगेच धाडं, पण सीला अनी तिमथ्य हाई तठेच राहिनात. 15 तवय पौलले पोहचाडणारासनी त्याले अथनै शहरपावत लई गयात, सीला अनी तिमथ्य यासनी मनाकडे जितलं लवकर व्हई तितलं लवकर यावं अशी पौलनी आज्ञा मानीसन त्या निंघनात.
अथेनै शहरमा पौल
16 पौल अथेनैस शहरमा सीला अनी तिमथ्य यासनी वाट दखी राहींता तठे ते शहर पुरं आत्माघाई भरेल दखीसन तो भलताच नाराज व्हयेल व्हता. 17 यामुये तो सभास्थानमा यहूदीससंगे, देवनी भक्ती करेत असा गैरयहूदी लोकससंगे अनी बजारमा ज्या भेटेत त्यासनासंगे तो रोज वाद करे.
18 तवय *एपिकुर पंथना अनी स्तोयिक पंथना बराच तत्त्वज्ञानी लोके त्याले आडवा वनात, त्यासनामातीन काहीजण बोलनात, “हाऊ अज्ञानी काय बोलस?” तर दुसरा काहीजण बोलनात, “हाऊ परका देवनी वार्ता सांगणारा दखास” कारण तो त्यासले येशु अनी पुनरूत्थान यानाबद्दल सुवार्ता सांगे. 19 नंतर त्यासनी पौलले धरीसन अरीयपगानी सभामा म्हणजे शहरनी सभामा लई जाईन सांगं, “तु हाई देयल नवं शिक्षण काय शे ते आमले समजाडशी का?” 20 कारण तु आमले ज्या गोष्टी माहीत नही त्या ऐकाडी राहीना, त्या काय शेतस ते आमले समजाले पाहिजे, अशी आमनी ईच्छा शे. 21 सर्व अथेनैसकर अनं तठे राहनारा बाहेरगावना लोके यासले काही नविनविशेष सांगनं किंवा ऐकानं यानाशिवाय आपला रिकामा येळ दुसरा कसामाच घालता ये नही.
22 तवय पौल अरीयपगानी सभाना मझारमा उभा राहीसन बोलना, अहो, अथेनैसकरसवन, तुम्हीन देवदेवतासले भलताच माणनारा शेतस, अस माले दखायनं. 23 कसावरतीन, कारण मी शहरमा फिरता फिरता तुमनी भक्ती करणाऱ्या जागा दख्यात, त्यामा माहीत नही असा देवले बी काही अक्षर लिखेल वेदी माले दखायनी, त्यानी भक्ती तुम्हीन करतस त्या देवबद्दल मी तुमले घोषणा करस, 24 ज्या देवनी जग अनी त्यामाधलं सर्वकाही बनाडं तो आकाशना अनी पृथ्वीना प्रभु शे, म्हणीसन तो हातसघाई बनाडेल मंदिरसमा राहस नही, 25 अनी त्याले काय उणं शे, म्हणीसन माणुसना हाततीन त्यानी सेवा व्हवाले पाहिजे अस नही, तर जिवन, प्राण अनी सर्वकाही तोच सर्वासले देस; 26 अनी एक माणुसपाईन त्यानी सर्व लोकसले उत्पन्न करीसन, त्यासनी सर्व पृथ्वीवर राहवाले पाहिजे, अस त्यानी करं, अनी त्यासले नेमेल येळ अनी त्यासनी वस्तीसन्या सीमा त्यानी ठरायेल शेतस. 27 हाई यानाकरता की, लोकसनी देवना शोध कराले पाहिजे, म्हणजे त्यानापावत जाईसन त्याले कसतरी शोधी लेवानं, तो आपलामाधला कोणताच माणुसपाईन दुर नही शे.
28 कारण कोणतरी सांगेल शे की, आपण त्यानामा जगतस, वागतस अनी शेतस.
तसच तुमनामाधला बराच कवीसनी म्हणेल शे की,
आपण त्याना वंश शेतस.
29 तर आपण दैवी वंश राहिसन, आमले हाई वाटाले नको की, देव सोनं, चांदी किंवा दगडमा कोरेल आकृतीनामायक शे जे मनुष्यनी कला अनी कल्पना करीसन बनाडेल शे. 30 देवनी बराच काळमा दखं की, लोकसनी त्याले वळख नही, पण आते सर्वासनी सर्वीकडे पश्चाताप कराना, अशी तो मनुष्यले आज्ञा करस. 31 त्यानी एक दिन असा नेमी ठेयल शे की, त्या दिन आपण नेमेल माणुसनाद्वारा तो जगना न्यायनिवाडा सत्यतातीन करी ली, ज्यानी त्याले मरेलस मातीन जिवत करीसन याबद्दल सर्वासले प्रमाण पटाडी देयल शे!
32 तवय मरेलसनं परत जिवत व्हनं हाई ऐकीसन काही जणसनी थट्टा करी, पण काहीजण पौलले बोलनात, “यानाबद्दल आम्हीन तुनं आखो परत ऐकसुत.” 33 इतलं व्हवानंतर पौल त्यासनामातीन निंघी गया. 34 तरी त्यानासंगे राहीसन कितलातरी लोकसनी ईश्वास धरा, त्यामा अरीयपगीय गावना दिओनुस्य अनी कोणतरी दामारी नावनी बाई अनी त्यासनासंगे बाकीना बराच व्हतात.
* 17:18 एपिकुर पंथ अनी स्तोयिक पंथ, ह्या निसर्गनी पुजा करनारा लोके (पंथ) व्हतात 17:24 प्रेषित ७:४८