25
फेस्त राजासमोर पौलनी चौकशी
1 मंग फेस्त त्या प्रांतमा ईसन तीन दिन नंतर कैसरियातीन यरूशलेमले गया.
2 तवय प्रमुख याजक अनी यहूदी लोकसमाधला मुख्य माणसे यासनी त्यानाकडे पौलवर फिर्याद करी.
3 अनी मेहरबानी करीसन त्याले यरूशलेममा बलाई ल्या, अशी त्यानाकडे ईनंती करी; कारण त्या वाटमा त्याले मारी टाकाना तयारीमा व्हतात.
4 फेस्तानी उत्तर दिधं, “पौल कैसरियामा कैदमा शे, मी स्वतः तिकडे लवकरच जावाव शे.
5 म्हणीन त्या माणुसना काही अपराध व्हई तर तुमनामाधला प्रमुखसनी मनासंगे कैसरियामा ईसन त्यानावर आरोप ठेवाना.”
6 मंग तो त्यासनामा आठदहा दिन राहीसन कैसरियाले गया अनी दुसरा दिन न्यायासनवर बठीसन त्यानी पौलले आणानं हुकूम करा.
7 पौल येवावर यरूशलेममातीन येल यहूदीसनी त्याना आजुबाजू उभं राहीसन ज्यासना पुरावा त्यासनाघाई देवाई नही राहींता असा बराच अनी भयानक आरोप त्यानावर ठेवात.
8 पण पौलनी स्वतःना बचावमा उत्तर दिधं की, “मी यहूदीसना नियमशास्त्रना, मंदिरना किंवा कैसरना काही अपराध करा नही.”
9 तवय यहूदीसले खूश करानी ईच्छातीन फेस्त हाऊ पौलले बोलना, “यरूशलेमले जाईसन तठे मनापुढे या गोष्टीसबद्दल तुना न्याय व्हावा अशी तुनी ईच्छा शे का?”
10 तवय पौल बोलना, “कैसरना न्यायासनपुढे मी उभा शे, आठेच मना न्याय व्हवाले पाहिजे; मी यहूदी लोकसना काहीच बिघाडेल नही शे, हाई तुमले बी चांगलच माहीत शे;
11 मी अन्याय करेल व्हई किंवा मरणदंडकरता योग्य अस काही करेल व्हई तर मना मराले नकार नही शे; पण त्या मनावर ज्या आरोप लयतस, त्यामा जर एक बी खरा ठरी नही राहीना, तर त्यासना स्वाधीन माले कराना कोणलेच अधिकार नही; मी कैसरजोडे न्याय मांगस.”
12 तवय फेस्तनी सभाकडतीन चर्चा करीसन उत्तर दिधं, “कैसरकडे न्याय मांगेल शे, तर तु कैसरकडे जाशी.”
पौल अग्रिप्पा अनी बर्णीका यासनापुढे
13 मंग काही दिन नंतर अग्रिप्पा राजा अनी बर्णीका या कैसरिया शहरमा ईसन फेस्तले भेटनात.
14 तठे त्या बराच दिनपावत राहीनात; तवय फेस्तनी राजापुढे पौलनं प्रकरण काढीन सांगं, “फेलिक्सनी कैदमा ठेयल असा एक माणुस आठे शे.
15 मी यरूशलेमले गवु तवय त्यानावर यहूदीसना मुख्य याजक अनी वडील मंडळीनी फिर्याद करीसन त्यानाविरोधमा ठराव व्हवाले पाहिजे म्हणीसन ईनंती करी.
16 त्यासले मी उत्तर दिधं की, आरोपी अनी आरोप ठेवणारा समोरा समोर ईसन, आरोपसबद्दल प्रतीउत्तर देवाना आरोपीले येळ देवाना पहिले कोणताच माणुसले दंडकरता सोपी देवानं, अशी रोमी लोकसनी रित नही.
17 यामुये त्या तठे येवानंतर उशीर नही करता, दुसरा दिन न्यायासनवर बठीन मी त्या माणुसले आणाकरता हुकूम करा.
18 आरोप करनारा उभा व्हतात, त्यासनी ज्या वाईट गोष्टीसना मना मनमा संशय येल व्हता, त्यासनापैकी कोणताच आरोप त्यासनी त्यानावर ठेवा नही.
19 फक्त त्यासना यहूदी विधीसबद्दल अनी जो जिवत शे म्हणीसन पौल म्हणस असा कोणी मरेल येशुबद्दल त्याना अनी त्यासना वाद व्हता.
20 तवय यानी चौकशी कशी करानी हाई माले सुची नही राहींतात त्यामुये मी त्याले ईचारं, ‘यरूशलेमले जाईसन तठे या गोष्टीसबद्दल तुना न्याय व्हवाले पाहिजे अशी तुनी ईच्छा शे का?’
21 तवय बादशाहाना निकालकरता माले ठेवानं अशी पौलनी मागणी करामुये मी हुकूम करा की याले कैसर अधिकारीकडे धाडतच तोपावत कैसरिया शहरमा ठेवानं.”
22 अग्रिप्पा फेस्तले बोलना, “त्या माणुसनं ऐकावं अस मना बी मनमा शे”
त्यानी उत्तर दिधं, “सकाय त्यानं ऐकाले तुमले भेटी.”
23 दुसरा दिन अग्रिप्पा अनी बर्णीका या मोठा थाटमा ईसन सेनापती अनी शहरमातील मुख्य लोक यासनासंगे दरबारमा गयात, अनी फेस्तनी हुकूम देवावर पौलले तठे आणं.
24 तवय फेस्त बोलना, अग्रिप्पा महाराजा, अनी आमनासंगे राहणारा सर्व लोकसवन, या माणुसले तुम्हीन दखतस ना? यानी यापुढे जिवत राहवाले नको अस वरडीसन यहूदीसना सर्व गर्दीनी यरूशलेममा अनी आठे बी माले अर्ज करा.
25 पण त्यानी मरणदंडना योग्य अस काही करं नही अस माले समजनं अनी त्यानी स्वतः कैसरकडे न्याय मांगा, म्हणीसन त्याले धाडाना निश्चय मी करा,
26 पण याबद्दल मी कैसरले काय लिखानं अस काही ठरायेल नही, म्हणीसन राजा अग्रिप्पा, तुमनापुढे याले आणेल शे; याकरता की, चौकशी व्हयनी म्हणजे माले काहीतरी लिखाले सापडी.
27 कारण कैदीले धाडतांना त्यानावरला दोषारोप स्पष्ट रितीतीन नही सांगनं, हाई माले ठिक दखास नही.